अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन - आठवा गणपती- श्री बल्लाळेश्वर (श्रीक्षेत्र पाली,रायगड)

Thursday, September 27, 2012

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन -  आठवा गणपती- श्री बल्लाळेश्वर (श्रीक्षेत्र पाली,रायगड)

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.

-आख्यायिका-

विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबात बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासून ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे.

हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन - आठवा गणपती- श्री बल्लाळेश्वर (श्रीक्षेत्र पाली,रायगड)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन सातवा गणपती- श्री वरदविनायक (श्रीक्षेत्र महड,जि.रायगड)

Wednesday, September 26, 2012
हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते.गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले.

-मंदिर-

या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.

-आख्यायिका-

पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते. गुत्समद ऋषींनी या गणपतीची स्थापना केली असल्याची आख्यायिका आहे.वचकनवी नावाचे ऋषी होते. एकदा त्याच्या आश्रमाला राजा रूक्मांगदाने भेट दिली. त्यावेळी ऋषीपत्नी त्याच्या रूपावर मोहित झाली. तिने त्याला आपल्या आश्रमात बोलावले मात्र त्याने तिकडे जायला नकार दिला.हे देवांचा राजा इंद्राला कळाले तेव्हा त्याने रूक्मांगदाचे रूप घेऊन तिचा उपभोग घेतला. ऋषीपत्नी मुकुंदा हिला इंद्रापासून झालेला पुत्र म्हणजे गुत्समद. त्याला अनौरस पुत्र म्हणून हिणवले गेल्याने त्याने चिडून 'तू बोरीचे झाड होशील' असा शाप मातेला दिला, मात्र मातेला शाप दिल्याचे प्रायश्चित्त म्हणून गुत्समद ऋषिंनी मणिभद्र येथील अरण्यात 'ओम गंगणपतये नमः 'या मंत्र जपाने अनेक वर्षे घोर तपश्यर्या केली. त्यामुळे गणपती प्रसन्न झाले. त्यांनी गणपतीला 'इथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी' अशी विनंती केली. गणपतींनी आशिर्वाद दिल्या नंतर गुत्समद ऋषींनी गणपतीची स्थापना केली व त्याचे नांव वरदविनायक ठेवले.त्याला तेथे देऊळ सापडले तेच हे वरदविनायक देऊळ.

-कसे जाल-

मुंबई-पनवेल-खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलिकडे ६ कि.मी. अंतरावर उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुंबई-महड अंतर ८३ कि.मी आहे.
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड २४ कि.मी. आहे.
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन सातवा गणपती- श्री वरदविनायक (श्रीक्षेत्र महड,जि.रायगड)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन सहावा गणपती- श्री गिरिजात्मक (श्रीक्षेत्र लेण्याद्री)

Tuesday, September 25, 2012

अष्टविनायक दर्शन-

सहावा गणपती- श्री गिरिजात्मक (श्रीक्षेत्र लेण्याद्री)

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्‍या आहेत.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन सहावा गणपती- श्री गिरिजात्मक (श्रीक्षेत्र लेण्याद्री)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पाचवा गणपती- श्री विघ्नेश्वर (श्रीक्षेत्र ओझर,पुणे)

Monday, September 24, 2012
अष्टविनायक दर्शन-

पाचवा गणपती- श्री विघ्नेश्वर (श्रीक्षेत्र ओझर,पुणे)

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पाचवा गणपती- श्री विघ्नेश्वर (श्रीक्षेत्र ओझर,पुणे)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन चौथा गणपती- महागणपती (श्रीक्षेत्र रांजणगाव,पुणे)

Sunday, September 23, 2012

अष्टविनायक दर्शन- चौथा गणपती- महागणपती (श्रीक्षेत्र रांजणगाव,पुणे)

अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की - त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.

हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे..
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन चौथा गणपती- महागणपती (श्रीक्षेत्र रांजणगाव,पुणे)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन तिसरा गणपती- श्री सिद्धिविनायक (श्री क्षेत्र सिद्धटेक,अहमदनगर)

Saturday, September 22, 2012



-अष्टविनायक दर्शन- तिसरा गणपती- श्री सिद्धिविनायक (श्री क्षेत्र सिद्धटेक,अहमदनगर)

सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकामधील दुसरा गणपती.

-इतिहास-

पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असूरांशी भगवान विष्णु अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करन विष्णूने असुरांचा वध केला.

छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. 15 फूट उंचीचे व 10 फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. 3 फूट उंच व 2.5 फूट लांबीची ही मूर्ती स्वयंभू आहे.

हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास 21 प्रदक्षिणा घातल्या. त्यांतर 21 दिवसांनी त्यांची सरदारकी परत मिळाल्याची अख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.

-कसे जाल-

पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक जवळपास १०० कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते.)
सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरुन शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते.
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन तिसरा गणपती- श्री सिद्धिविनायक (श्री क्षेत्र सिद्धटेक,अहमदनगर)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन दुसरा गणपती- 'श्री चिंतामणी'

Thursday, September 20, 2012




अष्टविनायक दर्शन- दुसरा गणपती- 'श्री चिंतामणी' (श्री क्षेत्र थेऊर,पुणे)


अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. या गणेशाला डाव्या बाजुला सोंड आहे.

पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.

थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन दुसरा गणपती- 'श्री चिंतामणी'

दगडूशेठ हलवाई गणपती पुणे २०१२ देखावा (Dagdu Sheth Ganpati)


READ MORE - दगडूशेठ हलवाई गणपती पुणे २०१२ देखावा (Dagdu Sheth Ganpati)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पहिला गणपती- मोरगावचा 'श्री मोरेश्वर'

Wednesday, September 19, 2012

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पहिला गणपती- मोरगावचा 'श्री मोरेश्वर' (ता.बारामती जि.पुणे)


अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
जवळच कर्‍हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे.

आख्यायिका (इतिहास):-

असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.

या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.

सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

-पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पहिला गणपती- मोरगावचा 'श्री मोरेश्वर'

गणेशाच्या नावांपासून तयार केलेली गणेश मूर्ती - शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को

Tuesday, September 18, 2012


शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को 
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहर को
हाथ लिये गुड लद्दू साई सुखर को
महिमा काहे न जाय लागत हून पद को
जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धान्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव

अस्थ सिधी दासी संकट को बैरी
विघ्न विनाशन मंगल मुरत अधिकारी
कोटी सुरज प्रकाश ऐसी छबी तेरी
गंडस्थळ मदमस्तक झूल शशी बेहारी
जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धान्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता
जय देव जय देव

भावाभागात से कोई शरणागत आवे
संतती संपत्ती सबही भरपूर पावे
ऐसे तुम महाराज मोको अति भावे
ग़ोसावीनन्दन निशिदिन गुण गावे
जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धान्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता
जय देव जय देव
READ MORE - गणेशाच्या नावांपासून तयार केलेली गणेश मूर्ती - शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को

अग्निपथ चित्रपटामध्ये वापरल्या गेलेल्या गणेश मूर्तीची औरंगाबाद (संभाजीनगर ) मधे स्थापना ..



अग्निपथ' सिनेमातील भव्यदिव्य, बहुबाहू गणरायाची मूर्ती औरंगाबादेत आली आहे. नागेश्वरवाडी गणेश मंडळाने ती आणली असून, मूर्तीचे आठ वेगवेगळे भाग शहरात आणल्यानंतर जोडण्यात आले. फायबरच्या या मूर्तीची कसेबकर तेल भांडारासमोर स्थापना केली जाईल. 




READ MORE - अग्निपथ चित्रपटामध्ये वापरल्या गेलेल्या गणेश मूर्तीची औरंगाबाद (संभाजीनगर ) मधे स्थापना ..

साबणाचे पत्र

Tuesday, September 11, 2012


प्रिय निरमा ताईस 
सप्रेम नमस्कार विनंती विशेष 
पत्र लिहण्यास कारण कि बरेच दिवस झाले तुझे पत्र नाही,इकडे लाईफबोय लंडन हून परत आला आहे .त्याने स्वतः चे नाव बदलून  लाईफबोय प्लस केल्याने सनलाईट   आणि त्याचे भांडण झाले आहे ...भांडण सोडवण्यासाठी फेयरग्लोव मधे पडलं त्यामुळे त्यालाही मार पडला..त्याला लगेचच डॉक्टर डेटोल कडे नेण्यात आले ..
आनंदाची बातमी म्हणजे लक्स आणि पीयर्स चे लग्न ठरले आहे .. हमाम काका आणि गोदरेज काका लग्नाची तयारी करत आहे ..आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे रेक्सोना वाहिनीला जुळ्या मुली झाल्या आहे एकीचे नाव कॅमे क्लासिक तर दुसरीचे कॅमे न्याचरल ठेवण्यात आले आहे ...संतूर तिलाही मुलगा झाला ..
पामोलिव्ह मामाची तब्येत मध्यंतरी बरी नव्हती .. तसेच मोतीकाकांच्या मुलाचे लग्न शिकेकाईशी झाले .. लग्न समारंभाला सर्व साबण परिवार उपस्थित होतं ..ससा भटजींनीच लग्न लावले ..व्हील बाईंनी कपड्यांची व्यवस्था केली , मेडीमिक्स ने सर्वांना वाढले तर विमबार ने भांडी घासली ..
पोंडस  आणि जोन्सन आता शाळेत जाऊ लागले आहे .. सर्फ मावशीची तब्येत कशी आहे पत्र लिहून कळवणे ..

                                                                                                                                 - तुझा 
                                                                                                                                 सिंथोल 


READ MORE - साबणाचे पत्र

निबंध लिहा विषय - 'गाय'...

Sunday, September 9, 2012




प्रश्न : निबंध लिहा
विषय - 'गाय'...
एका मुलाने लिहिलेला निबंध :
"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात. भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गाय तोंडे सरांसारखे असते.
गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात. मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात. ते टेस्टी असते. गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात. गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूधपितो.
गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात. शीला ताई शेणाच्या गौ-या करते. गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वसु बारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पूजा होते.
पूजा मला आवडते. ती माझ्या शेजारी बसते. गाईला माता म्हणतात.
भारत माता की जय!!!! 
READ MORE - निबंध लिहा विषय - 'गाय'...

दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही

Friday, September 7, 2012


दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही



सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पेग पाशी गाडी अडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते
रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती
सकाळच्या आत विसरते


मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पेग बनवणारा त्यदिवशी
जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो


स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाची फेरी घडते


आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते


आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात


शेवटी काय
दारु दारु असते
कोणतीही चढते...

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते


पिणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे
देवदासचे खरे प्रेम 'पारो की दारु '
याचा मला अजून संशय आहे


प्रत्येक पेग मागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते


तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भिडते...

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !


चुकून कधीतरी गंभीर विषयावरही
चर्चा चालतात
सगळे जण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात


प्रत्येकाला वाटते की त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते


जसा मुद्दा बदलतो
तशी आवाजाची पातळी वाढते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

फेकणे, मोठेपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सिंगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही


पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करण्यासाठीच असतात
पेगजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात


रात्री थोडी जास्त झाली
की मग त्याला कळते

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !


यांच्यामते मद्यपान हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे


यामुळे धीर येतो, ताकद येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्यभराची मवाळ व्यक्ती
त्या क्षणी राजा असते

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते...

परंतु दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते !!!
READ MORE - दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही

Marathi Graffiti - Navratri Special

Thursday, September 6, 2012

Note: if an image is copyrighted ©

READ MORE - Marathi Graffiti - Navratri Special

आंधळा भिकारी आणि लेखक !





एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला... त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही... तो एव्हढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत.... गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.
.
.
एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला...
.
.
.
खिचात दमडादेखील नसतांना तो लेखक फिरायला बाहेर पडतो.
.
.
त्याची नजर त्या भिका-याकडे आणी त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.
.
.
त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले.
.
.
हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो..
.
.
"मित्रा, मी एक लेखक आहे,ज्याच्याकडे एक दमडादेखील नाही, पण माझ्याकडे  कला आहे,...माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे.. ती मी तुला देउ शकतो...तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?"
.
.
"साहेब" भिकारी म्हणतो " माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही ...मी एक गरीब आंधळा भिकारी ...तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा."
.
.
तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो.
.
.
त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापूढ्यात पैसे टाकू लागलाय.
.
.
थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते...
.
.
तो भिकारी बेचैन होतो...नाण्यांची रास वाढतच जाते...
.
.
तो एव्हढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-यांपैकी एकचा हात पकडतो आणि म्हणतो " साहेब माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल ... मी एक गरीब आंधळा भिकारी आहे...मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील."
.
.
तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो...
.
.
.
.
"वसंत ऋतू, बहरलेली सृष्टी, आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."
.
.
.
.
भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.
.
.
.
आयुष्य कुणी जास्त जाणलं?

या ओळी लिहीणा-या लेखकानं? त्या ओळी वाचून पैसे टाकणा-या लोकांनी? कि इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं??
READ MORE - आंधळा भिकारी आणि लेखक !

Happy Teacher's Day

Tuesday, September 4, 2012



आज शिक्षक दिन ..
योग्य शिक्षण माणसाच्या वैचारिक प्रक्रियेला सक्षम बनवते तर आणि मूल्य शिक्षण त्याला योग्य वैचारिक प्रक्रीये मधे विचार करायला प्रेरित करते ..
अजूनही समाजात शिक्षणाबद्दल अनास्था आहेच आणि कुठल्याही व्यक्तीचा विकास हा प्रथम त्याला शिक्षित करण्या पासूनच सुरु होतो ..
ज्या शिक्षकांचा आपण शिक्षण दिन साजरा करतो त्यांना आज नोकरी मिळवायला सरकारी अधिकार्यांना पैसे चारावे लागता ..
पगार वेळेवर मि
ळत नाही .. 
नेत्यांच्या प्रचार सभेला गर्दी करावी लागते कारण त्यांच्याच एखाद्या शिक्षण संस्थेत ते नोकरी करत असता ..
मतदान प्रक्रिया,लोकसंख्या नोंदणी आणि सर्व गोष्टीन मधे सरकारला पाहिजे असलेला एक रिकामटेकडा पगारी माणूस म्हणून शिक्षकाकडे पाहायचा दृष्टीकोन आहे ..
सरकारी कार्यालयात २०-२० लाखाचे वीज बिल पडता पण गावातल्या शाळेवर काही छत पडत नाही ..
एवढे असून पण महाराष्ट्र ८२% साक्षर आहे ,हा आनंद 
READ MORE - Happy Teacher's Day

नव्या पिढीचा लाकुडतोड्या

Monday, September 3, 2012



लाकूडतोड्याची गोष्ट सर्वांनाच माहित असेल...
तसंच काहीसं एकदा झालं...
चम्प्या त्याच्या बायकोबरोबर जंगलात जातो..आणि त्याची बायको तलावात पडते.
तो रडत असतो इतक्यातएक देवी येते..
तो देवीला सगळी कहाणी सांगतो..
देवी पाण्यात जाते आणि येताना कॅटरीना घेऊन येते..
देवी - हीच आहे का तुझी बायको?
चम्प्या - हो हो हीच आहे..
देवी - खोटं बोललास तर तुला शिक्षा देईल..
चम्प्या - देवी मला माफ कर..मी खोटं बोललो..
देवी - का बोललास खोटं...आता तुला शिक्षा देणार मी..
चम्प्या - माफ कर देवी.. मी जर कॅटरीना ला नाही म्हणालो असतो..तर तू करीना घेऊन आली असतीस..आणि मी तिलाही नाही म्हणालो असतो तर तू मला माझी बायको दिलीअसतीस..

आणि मी बायकोला हो म्हणालो असतो तर तू माझ्यावर खुश होऊन मला तिन्ही बायका दिल्या असत्यास..
मी खूप गरीब आहे..मला एकच परवडत नाही...३ कधी परवडणार?
देवी - अब रुलायेगा क्या पगले... घेऊन जा जा कॅटरीना ला..
मॉरल - माणसं इमानदारीने गेम खेळतात..
READ MORE - नव्या पिढीचा लाकुडतोड्या

स्त्रियांना नक्की काय हवे असते?

Sunday, September 2, 2012
हे नेहमी लक्षात ठेवा! (स्त्रियांनो) जरा यावर विचार करा. (पुरुषांनो) कथेची मजा घ्या.

तरुण आर्थर राजाला शेजारच्या साम्राज्याच्या राजाने पकडले होते आणि कैद करून ठेवले होते. त्या राजाने आर्थरला ठार मारले असते; परंतु तो त्याच्या तरुणाईने आणि आदर्शांनी प्रभावित झाला होता. त्यामुळे राजाने त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला, अर्थात जर त्याने एका खूपच कठीण प्रश्नाचे उत्तर दिले तर. आर्थरकडे उत्तरावर विचार करण्यासाठी एक वर्ष होते. आणि जर वर्षानंतर त्याच्याकडे उत्तर नसेल तर त्याला फासावर चढवण्यात येणार होते.

****  ****प्रश्न होता : स्त्रियांना नक्की काय हवे असते?


****  ****अशा प्रश्नाने खरे तर अत्यंत बुद्धिमान माणूसही गोंधळून गेला असता. तरुण आर्थरसाठी तर याचे उत्तर शोधणे अशक्यप्राय होते; पण मृत्यूला सामोरे जाण्यापेक्षा उत्तर शोधणे जास्त सोयीस्कर होते, म्हणून त्याने राजाचे आव्हान स्वीकारले. तो त्याच्या राज्यात परतला आणि त्याने सर्वांना हा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. राजकुमारी, राजगुरू, बुद्धिवंत आणि अगदी दरबारी विदूषकालादेखील त्याने हा प्रश्न विचारला. मात्र, एकाकडेही त्याचे समाधान होईल असे उत्तर नव्हते.

****  **** अनेक जणांनी त्याला म्हाता-या चेटकिणीचा सल्ला घेण्याचे सुचवले. आता फक्त तीच याचे उत्तर देऊ शकेल, असे ब-याच जणांचे मत होते. मात्र, चेटकिणीने त्यासाठी खूप मोठी किंमत मागितली असती.


****  ****असे होता होता शेवटी वर्षाचा अखेरचा दिवस उजाडला. आता आर्थरकडे चेटकिणीकडे जाऊन तिलाच या प्रश्नाचे उत्तर विचारण्याशिवाय पर्याय नव्हता. तिने या प्रश्नाचे उत्तर देण्याचे कबूल केले, मात्र, त्या आधी राजाला तिने मागितलेली किंमत चुकवण्याचे कबूल करावे लागणार होते.

****  **** त्या म्हाता-या चेटकिणीला सर लॅन्सलोटशी लग्न करायचे होते! सर लॅन्सलोट म्हणजे राजाच्या खास माणसांमधील सर्वात प्रामाणिक व्यक्ती आणि मुख्य म्हणजे राजा आर्थरचा सर्वात जिवलग मित्र! आर्थर नुसत्या कल्पनेनेच शहारला. चेटकीण पाठीला कुबड आलेली आणि सुरकुतलेल्या चेह-याची म्हातारी होती. तिच्या तोंडात एकच दात होता. तिच्या अंगाला असह्य वास येई. तिला चित्रविचित्र आवाज काढण्याचीदेखील सवय होती. आर्थर राजाने त्याच्या उभ्या आयुष्यात असा नमुना पाहिला नव्हता.त्याने आपल्या जिवलग मित्राच्या गळ्यात अशा चेटकिणीला बांधण्यास नकार दिला आणि जे काही परिणाम होतील ते भोगण्याची तयारी दर्शवली.


**** ****लॅन्सलोटला जेव्हा ही अट समजली, तेव्हा त्याने तडक राजा आर्थरला गाठले आणि त्याला समजावले की, आर्थरच्या आयुष्यापुढे हा त्याग काहीच नाही व तो चेटकिणीशी लग्न करायला तयार आहे. अखेरीस लग्नाची जाहीरपणे घोषणा केली गेली आणि आर्थरने चेटकिणीला प्रश्न विचारला :

****  ***‘तर, स्त्रियांना नेमके काय हवे असते?’

****  **** चेटकीण म्हणाली, ‘*स्त्रियांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय स्वत: घ्यायला हवेअसतात.’

*****  **** राज्यातल्या प्रत्येकाला जाणवले की, चेटकिणीने खरोखरच खूप समर्पक असे उत्तर दिले आहे आणि आता आपल्या राजाचा जीव वाचणार. तसेच झाले. शेजारच्या राजाने आर्थर राजाला मुक्त केले आणि लॅन्सलोट व चेटकिणीचे लग्न धूमधडाक्यात झाले.

****  **** मिलनाची घटिका जसजशी समीप येऊ लागली, तसा लॅन्सलोटने आता पुढे काय वाढून ठेवले आहे, असा विचार करत शयनकक्षात प्रवेश केला; पण शयनकक्षात पाऊल ठेवताच तो विस्मयचकित झाला. पलंगावर सुरकुतलेल्या, खंगलेल्या चेटकिणीच्या जागी एक सुंदर तरुण स्त्री बसली होती.

****  **** आश्चर्यचकित झालेल्या लॅन्सलोटने तिला घडला प्रकार विचारला. तेव्हा ती म्हणाली की, ती एका विद्रूप चेटकिणीच्या रूपात असतानादेखील लॅन्सलोट तिच्याशी आदराने आणि सौजन्याने वागला म्हणून यापुढे ती केवळ अर्धा दिवस विद्रूप चेटकिणीच्या रूपात वावरेल आणि उरलेला अर्धा दिवस सुंदर पत्नीच्या रूपात.

****  **** ‘तुम्हाला कसे आवडेल?’ तिने विचारले, ‘दिवसा सुंदर असणे की रात्री?’

****  **** लॅन्सलोट क्षणभर अडखळला.

****  **** दिवसा त्याला एक सुंदर पत्नी मिळाली असती, जिच्यासोबत तो समारंभांमध्ये मिरवू शकला असता; पण घरी परतल्यावर मात्र एका म्हाता-या चेटकिणीसोबत त्याला रात्र काढावी लागली असती.

****  **** किंवा

****  **** जर ती दिवसभर म्हातारी चेटकीण बनून वावरली असती तर त्याला एका सुंदर स्त्रीसोबत रात्री घालवता येणार होत्या.

****  **** (जर तुम्ही पुरुष असाल तर) तुम्ही काय निवडले असते?


****  **** (जर तुम्ही स्त्री असाल तर) तुमच्या पतीने काय निवडले असते?

****  ****  ****  ****  ****  ****  ****  **** लॅन्सलोटने काय निवडले ते खाली दिलेलेच आहे; परंतु प्रथम तुमची निवड ठरवा आणि मग खाली पाहा.

****  **** सर लॅन्सलोट हुशार होता. त्याला चेटकिणीने राजा आर्थरला दिलेले उत्तर आठवले.त्याने उत्तर दिले की, त्या स्त्रीने स्वत:च ठरवावे की तिला कसे राहायचे आहे.

****  **** हे ऐकल्यावर ती म्हणाली की ती सर्वकाळ सुंदर राहील. कारण लॅन्सलोटने तिला स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते.

****  **** तर, कथेचे सार काय?

****  **** कथेचे सार असे आहे की,

****  **** *प्रत्येक स्त्री कितीही सुंदर असली तरीही तिच्यामध्ये एक चेटकीण असते!

****  *****जर तुम्ही स्त्रीला तिच्या मताप्रमाणे वागू दिले नाही, तर तुमचे आयुष्य खडतर होऊन बसेल.

****  **** जर एखादी गोष्ट व्हायची असेल तर तिच्या पद्धतीने; नाही तर कोणत्याच पद्धतीने नाही! :)



READ MORE - स्त्रियांना नक्की काय हवे असते?

फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती

Saturday, September 1, 2012

१. फेसबुक कोंबडा : यांना वाटते कि रोज सकाळी ,”गुड मोर्निंग”ची पोस्ट टाकावीआणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.
२. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्णवापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अड्ड करत सुटतात.

३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .
4. फेसबुक चोर : हे लोक दुसर्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून , पटकन आपल्या नावावर टाकतात.
५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.


६. फेसबुक न्वूज रीडर : जागत काय चालू, ह्या न्वूज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्वूज सांगत सुटतात.
७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसर्याच्य ा चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.
८. फेसबुक विदुषक : हेलोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवतअसतात.
९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कमेंट करायला कधीयेत नाही.
१०. फेसबुक कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.
११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागलेविचार आपल्यापोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याच ा प्रयत्न करतात.
१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.
१३. फेसबुक टपोरी : हेलोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कमेंट करत असतात. आणि मुलींच्या मागे लागतात.
१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.
१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,
१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्टब्लोक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणूनलोकांना भिक मागत फिरत असतात.
१७ . फेसबुक लिंग परिवर्तक: हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.
१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.


१९. फेसबुक माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा …….. हि हि करत असतात.
२० . फेसबुक कलेक्टर :हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात.
आणि तुम्ही यातील कोणत्या वर्गात मोडता….. ………. इकडे कमेंट करा.
READ MORE - फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती