गब्बर यांचे प्रेरणादायी चरित्र...

Sunday, June 30, 2013


साधे जीवन व उच्च विचार : गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने   आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला. आणि विचारांच्या परिपक्वते बद्दल काय सांगावे, 'जो डर गया, सो मर गया' या सारख्या संवादांनी त्याने जीवनातल्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकला आहे.
गब्बरची दयाळू प्रवृत्ती: ठाकूरने गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते. यामुळेच त्याने ठाकूरचे फक्त दोन हातच कापले. तो त्याचा गळा हि कापु शकला असता, पण त्याच्या ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू दिले नाही.
नृत्य आणि संगीताचा चाहता: 'मेहबूबा ओ मेहबूबा' यां गाण्याच्या वेळेस त्याच्या कलाकार हृदयाचा परिचय मिळतो. अन्य डाकुंसारखे त्याचे हृदय शुष्क नव्हते. तो जीवनात नृत्य-संगीत यां कलेंच महत्व जाणून होता. बसंतीला पकडल्या नंतर त्याच्यातला नृत्य प्रेमी खळबळून जागा झाला होता. त्याने बसंतीच्या आत दडलेल्या नर्तकीला ओळखल होत. तो कलेच्या प्रती आपले प्रेम अभिव्यक्त करण्याचे कोणतेही कारण सोडत नसे.
अनुशासन प्रिय गब्बर : जेव्हा कालिया आणि त्याचेमित्र आपल्यावर सोपविलेली कामगिरी पार न पडताच वापस आले होते, तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या अनुशासन प्रिय स्वभावाला साजेस वर्तन त्याने केल. आणि त्या तिन्ही जणांना शासन केले.


हास्य प्रेमी : त्याच्याकडे कमालीचा 'सेन्स ऑफ ह्युमर' होता. कालिया आणि त्याचे दोन मित्र यांना मारण्याच्या पहिले त्याने त्यांना खूपहसविले होते. कारण हसता हसता या जगाचा त्यांनी निरोप घ्यावा असे त्याला मना पासून वाटत होते. तो आधुनिक युगातला 'चार्ली चाप्लीन' होता.
नारीच्या प्रती संम्मान : बसंती सारख्या सुंदर मुलीला पकडल्या नंतर त्याने तिच्याकडे फक्त एका नृत्याची विनंती केली. आत्ताचा डाकू असता तर त्याने कदाचित वेगळंच काही तरी मागितल असत.
भिक्षुकी जीवन : त्याने हिंदू धर्म आणि महात्मा बुध्द यांनी दाखविलेला भिक्षुकी मार्ग स्वीकारला होता. रामपूर आणि इतर गावामधून त्याला जे काही मिळत त्यानेच तो आपले भगवत होता. सोने, चांदी, चिकन बिर्याणी, मलाई, पनीर टिक्का इ. भोगविलासी वस्तूंसाठी तो कधी शहराकडे नाही गेला.
सामाजिक कार्य : एकीकडे आपला डाकू पेशा संभाळत असताना तो लहान मुलांना झोपविण्याचे काम हि करत होता. शेकडो माता त्याचे नाव घेऊन आपल्या उनाड मुलांना झोपवत असत. सरकारने त्याच्यावर ५०,००० रुयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्या काळात 'कोन बनेगा करोडपती' नसल्याने लोकांना रातोरात श्रीमंत बनविण्याचा गब्बरचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. ..
READ MORE - गब्बर यांचे प्रेरणादायी चरित्र...

पोपट वाघ आणि डुक्कर - फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट

Friday, June 28, 2013

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे....

एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर राहत होते..
त्यांची खूप मैत्री होती, ते एक मेका शिवाय राहू शकत नव्हते.. .
एके दिवशी वादळ आल, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले..
.
आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले. .
आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजारात
त्याचा मृत्यू झाला.
.
... .
आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंत
राहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले...
.
.
खूप दिवसांनी ज्या ठिकाणी पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते
त्या ठिकाणी एक'मोहाचे' ( 'मव्हाचे') झाड रुजू लागले...
.
पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने''दारू'' बनवली.
..
..
आणि म्हणूनच ज्या वेळी माणूस दारू पितो त्यावेळी
पहिला त्याचा पोपट होतो..
आणि पोपटा सारख बोलू लागतो...
.
थोड्या वेळाने तो वाघ होतो..
आणि कुणालाही न घबराता तो वाट्टेल ते बोलू लागतो, कुणाचेच ऐकत नाही.. .
.
सरते शेवटी त्याचा डुक्कर होतो.
आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर लोळतो.. त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात लोळतो.......


READ MORE - पोपट वाघ आणि डुक्कर - फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट

Be aware of Dogs - पुणेरी पाटी - पुणेरी पाट्या (Puneri Pati - Puneri Patya)

Thursday, June 27, 2013

Beaware of Pune Dogs

READ MORE - Be aware of Dogs - पुणेरी पाटी - पुणेरी पाट्या (Puneri Pati - Puneri Patya)

Dance रे मोरा, Mangoच्या वनात [ नाच रे मोरा आंब्याच्या वनात ]

Wednesday, June 26, 2013

Dance रे मोरा, Mangoच्या वनात
Dance रे मोरा Dance...
ढगांशी wind झुंजला रे..
काळा काळा cotton पिंजला रे..
Now yours पाळी, Let megives you
...
...टाळी..
फुलव पिसाराss Dance..
Dance रे मोरा, Mangoच्या वनात
Dance रे मोरा Dance..
झरझर edge झरली रे..
झाडांची leaves भिजली रे.. Rainमध्ये
न्हाउ, Something गाऊ
करुन पुकारा Dance,
Dance रे मोरा, Mangoच्या वनात
Dance रे मोरा Dance...
थेंब थेंब तळ्यात dancing रे
टप टप पानांत sounding रे..
Rainच्या रेघांत, Play खेळु दोघांत Blue
सवंगड्या Dance,
Dance रे मोरा, Mangoच्या वनात
Dance रे मोरा Dance...
Rainची रिमझिम stop झाली रे
तुझी माझी pair जमलीरे
Skyमध्ये छान छान Seven रंगी कमान
कमानीखाली त्या Dance,
Dance रे मोरा, Mangoच्या वनात
Dance रे मोरा Dance...
READ MORE - Dance रे मोरा, Mangoच्या वनात [ नाच रे मोरा आंब्याच्या वनात ]

चावट चम्या आणि चिवट चिंगी चे २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स - मस्तीचा तडका

Tuesday, June 25, 2013

चम्याची आई:- चींगे, मला पहिली २० वर्षे मुलच नव्हते झाले.
चिंगी:- मग काय केले????
चम्याची आई:- मग काय, २१ व्या वर्षी माझे लग्न झाले....

चिंगी बेहोश....
चम्याची आई मदहोश....


---------------------------------------------------------------------------------------
गुरुजी: गावाच्या मधोमध ढ मुलगा असेल तर त्याला काय म्हणाल?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
चम्या : गाढव....
वाचक बेहोश.... चम्या मदहोश....
नाही कळला तर परत परत वाचू नका...

---------------------------------------------------------------------------------------
चम्या : नमस्कार सर, आपल्या संस्थेमार्फत माझा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम 'श्रीमंतीची गुरुकिल्ली' अर्थात 'श्रीमंत व्हा' हा आयोजित करावा अशी आपणांस विनंती आहे.
संस्थाचालक : अस्सं! बरं आता मला असं सांगा की, तुमच्या या कार्यक्रमामुळे कुणाला फायदा झाला आहे का? आणि खरोखरीच कुणी श्रीमंत झाले आहे का?
चम्या : (विनम्रपणे) या दोन्ही प्रश्नांचे उत्तर माझ्यारुपाने आपणासमोर उभे आहे सर!

---------------------------------------------------------------------------------------
चम्या घरी जातो आणि चिंगीला म्हणतो,
लवकर जेवायला वाढ, माझ्या पोटात कावळे ओरडतायेत.
चिंगी त्याच्या पोटाला हात लावत
चम्याः हे काय केलस?
चिंगीः काकस्पर्श.

---------------------------------------------------------------------------------------

बॉस:- चम्या, तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का रे?
चम्या:- अजिबात नाही, असे होऊच शकणार नाही.....
बॉस:- ओह्ह्ह, काही नाही... काल तू ज्या काकांचे मृत्यूचे कारण सांगून दुपार नंतर हाफ डे घेतलास ते संध्याकाळी ऑफिस मध्ये आले होते....
बॉस मदहोश.... चम्या. . . . बेहोश......

---------------------------------------------------------------------------------------

चम्याने लग्नात घेतलेला उखाणा...
उगवत्या चंद्राच्या साक्षीने,
लक्ष्मी आली घरी दाही दिशेने.....
चिंगीचे नाव घेतो...
चहा पीत कप बशीने....

---------------------------------------------------------------------------------------

चिंगी पेपर ला जाहीर करते कि ती लाखो लोकांच्या देखत कपडे बदलणार...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
मग काय हजारो लोक जमल्या वर.. दुकानदाराला कपडे बदलायला देते... आणि सांगते.... धुतल्यावर कलर फिका झाला ....

---------------------------------------------------------------------------------------

चम्या एकदा स्कूल बस ड्रायवर च्या मागे बसून
बडबडत असतो.
जर माझी आई हत्तीन, आणि बाबा हत्ती असते तर मी छोटा हत्ती असतो..
जर माझी आई वाघीण आणि बाबा वाघ असते तर मी छोटा वाघ असतो..
जर माझे आई वडील जिराफ असते तर मी पण छोटा जिराफ असतो..
.
.
ड्रायवर (हे सगळं ऐकून कंटाळून) :- आणि जर तुझी आई वेडी आणि बाबा बेवकुफ असले असते तर तू काय झाला असतास ?
.
.
चम्या - मग मी स्कूल बस ड्रायवर झालो असतो...

ड्रायवर बेहोश... चम्या मदहोश....

---------------------------------------------------------------------------------------

चम्या (चिंगीला) :- काय ग, चींगे तू किती वाजता रोज उठतेस?
चिंगी :- आपला काही वेळ काळ नाही, जेव्हा मनात येईल तेव्हा झोपते
जेव्हा मनात येईल तेव्हा उठते...

चम्या -आईला सेम टु सेम माझ्या कुत्र्यावर गेली आहेस ..
चिंगी बेहोश... चम्या मदहोश....

---------------------------------------------------------------------------------------

चम्या उवाच:-
कष्टाचे फळ कधी ना कधी, उशिराने का होईना, मिळतेच...
... आळसाचे फळ मात्र तात्काळ मिळते!!!!

---------------------------------------------------------------------------------------

चम्या : हिने नक्कीच माझी हुशारी घेतलीये!

चिंगी : हो ना! माझी अजूनही माझ्याकडे आहे!!

चम्या बेहोश..... चिंगी मदहोश...

---------------------------------------------------------------------------------------

चम्या - बाई..मला सु आलीये..
बाई - आधी सांग....नवर्याच्या आईला काय म्हणतात?
चम्या - सा..
बाई - काय?
चम्या - सा..
बाई - अरे 'सु' कुठाय?
चम्या - चड्डीत झाली..:-):-D:-)
बाई बेहोश.... चम्या. . . . मदहोश.....

---------------------------------------------------------------------------------------

चम्या चे लग्न होते.....
आणि एकदा तो पहाटे फिरायला (walk ) जातो... खूप थंडी असते म्हणून घरी परत येतो... आणि चिंगी जवळ जाऊन झोपतो.
चम्या :- आज बाहेर खूप खूप थंडी आहे.......
चिंगी :- तरी पण आमच बावळट बाहेर फिरायला गेलंय ..
चम्या बेहोश.... चिंगी मदहोश....

---------------------------------------------------------------------------------------

चम्या. . . . चे नातेवाईक : डॉक्टरसाहेब, लवकर या पेशंटला लवकर तपासा. सकाळपासून हा बेशुद्ध पडलाय.

डॉक्टर : काय झालंय याला?

चम्या. . . . चे नातेवाईक : डॉक्टर, हा फेसबुक पेशंट आहे. याच्या घरचं नेट कनेक्शन चार दिवसांपासून डाऊन आहे....

डॉक्टर खामोश...चम्या बेहोश... नातेवाईक मदहोश...

---------------------------------------------------------------------------------------

शिक्षक : हे जग नश्वर आहे.. आपल्या सगळ्यांना कधी ना कधी ही दुनिया सोडून जावं लागणार आहे... या वर्गातल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे......

चम्या : हेहेहे... पण मी या वर्गातला नाहीच्चे!!

शिक्षक बेहोश... चम्या मदहोश...

---------------------------------------------------------------------------------------

डॉक्टर चम्या

पेशंट : डॉक्टर असं वाटतं की मी वाळवी आहे... काय करू ?

डॉक्टर चम्या: ह्या खुचीर्वरून उतर आधी !

---------------------------------------------------------------------------------------

चिंगी : काय रे, जेवलास का?

चम्या : काय गं जेवलीस का?

चिंगी : तू माझी कॉपी करतोयस का?

चम्या : तू माझी कॉपी करतेयस का?

चिंगी : आय लव्ह यू.

चम्या : हो, माझं जेवून झालंय.

चिंगी बेहोश.... चम्या मदहोश.....

---------------------------------------------------------------------------------------

चम्या : चींगे, डार्लिंग माझ्यासाठी असं काही बोल की ज्याने मला एकाचवेळी आनंद आणि दु:ख दोन्ही होईल.

चिंगी : आय लव्ह यू, दादा!!

चम्या बेहोश.... चिंगी मदहोश.....

---------------------------------------------------------------------------------------

चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात...

चिंगी : कसं काय?

चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!!
चिंगी बेहोश.... चम्या मदहोश........

---------------------------------------------------------------------------------------

मँडम – पेपर खूपच सोप्पा आहे… लवकर लवकर उत्तरे लिहा…

चम्या – ओ मँडम…गप बसा…तुम्हाला आधीच उत्तरं माहित आहेत…

मँडम खामोश... चम्या मदहोश.....

---------------------------------------------------------------------------------------

रम्या आणि चम्या ला शाळेत यायला उशीर होतो....
गुरुजी :- रम्या का उशीर झाला रे....रम्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला ...उशीर झाला ..
शिक्षक: आणि चम्या तुला का रे उशीर झाला ??
चम्या : सर, मी रम्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो ....
शिक्षक खामोश.... रम्या-चम्या मदहोश....

---------------------------------------------------------------------------------------

चिंगी आणि झिंगी ह्या नवविवाहित बायका एकदा मयताच्या कार्यक्रमाला जातात. कार्यक्रम आटोपता आल्यावर...
चिंगी :- आयला आपल्यापेक्षा ह्या विधवा बायकाच जास्त खुश आणि निवांत असतीन नाही.
झिंगी :- ते कसे काय गं..?
चिंगी :- त्यांना, एवढेतरी नक्क्की माहिती असते कि आपला नवरा कुठे आहे ते...

---------------------------------------------------------------------------------------

चम्या ची अक्कल....
नारळाला इंग्रजी मध्ये कोकोनट म्हणतात.
कारण…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ते कोकणात जास्त मिळतात…..

---------------------------------------------------------------------------------------

एसीपी, दया, आणि अभिजीत असे तिघेही चम्या कडे सल्ला मागायला जातात....

एसीपी:- चम्या सर्, एक प्रेत मिळाले आहे, पण त्याचे दोन्ही हात तोडलेले आहेत, मग आम्हाल त्याचे फिंगर प्रिंट्स कसे घेता येतील....

चम्या:- (२ मीन विचार करून.....) एक काम करा, नाकाच्या आतल्या बाजूला ट्राय करून बघा... नक्कीच मिळतील बघा.....

एसीपी, दया, आणि अभिजीत असे तिघेही चम्या च्या पाया पडून पुढे कामाला लागले....

---------------------------------------------------------------------------------------



READ MORE - चावट चम्या आणि चिवट चिंगी चे २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स - मस्तीचा तडका

"धूमधडाका" मराठी विनोदी चित्रपट - संपूर्ण संवाद


संपूर्ण संवाद :
धनाजी रामचंद्र वाकडे आयला वाकड्यात शिराव लागणार वाटतंय
जवळकर: माळी...... मालक कुठंय ......
वाकडे: मीच मालक आपण कोण ....
जवळकर: मी.... मला ओळखल नाही.... अजब आहे हा हा हा
ती बाहेर उभी आहे ती मरसडीज गाडी कुनाचीये....
वाकडे: नाय माझी नाय...
जवळकर: तुमची नाय... माझिये ...
दिल्ली, कलकत्ता, मद्रास, बेंगलोर तिथे मोठमोठी पंचतारांकित
हॉटेल्स आहेत कुणाची आहेत माहितीये ....
वाकडे: नाय माझी नाय...
जवळकर: तुमची नाय... मग माझी असतील बहुतेक...
इंटरन्याशनल कनस्ट्रक्शन कंपनी कोणाचिये...
वाकडे: कुनाचीका आसना आपल्याला काय करायचं...
जवळकर: हाड त्याचा आयला... ए माझीये ...
दार्जीलिंग डायमंड हिऱ्यांचा व्यापार करणारी सर्वात मोठी कंपनी कुनाचीये

वाकडे: अर्थात हिऱ्यांची...
जवळकर: (विखी वूखू) माझीये ...
तसा मी दानवीर, कर्मवीर, धर्मवीर आणि बरेच काही वीर
उद्योग भूषण यदुनाथ जवळकर
जरा लांब उभे राहा... लांब उभे..... राहा लांब उभे राहा...
वाकडे: जवळकर म्हणजे तुम्ही आमचा महेश जवळकर....
जवळकर: बाप आहे त्याचा....

"धूमधडाका" हा मराठी मधला अशक्य विनोदी चित्रपट आहे. ज्यांनी हा चित्रपट बघितला नाही अशा लोकांचं आयुष्य फुकट आहे. आजही या चित्रपटामधल्या प्रत्येक डायलोग पाठ असणारे बरीच लोक आहेत. तुम्हीदेखील "धूमधडाका" या चित्रपटाचे चाहते असाल तर नक्की लाईक करा.
READ MORE - "धूमधडाका" मराठी विनोदी चित्रपट - संपूर्ण संवाद

पेपर कठीण आहे हे समजल्यानंतर परीक्षा हॉल मध्ये मुलांचे कारनामे..!!

Sunday, June 23, 2013

१) हॉल मधील मुली मोजणे
२) सुपरवायजर मॅडम असतील तर
त्यांच्याकडे पाहत बसने
३) समोरच्या-मागच्या मुलांना हे
दाखव- ते दाखव म्हणणे
४) उत्तर पत्रीकेच्या शेवटच्या पेज
वर खाडा-खोड करणे
५) दर १५
मिनिटांनी 'मॅडम ...झाला पेपर...म
का?' असे विचारणे
६) उत्तर पत्रिकेत गाणे लिहणे
७) बेंच वर डोकं ठेवून शांत झोपणे
८) आणि पुढच्या वेळी अभ्यास
करून पास होणार याचे स्वप्न
पाहणे
------------------------------
------------------------------
---------
आणि मुली काय करतात
माहितआहे???
१) उत्तर लिहणे
२) उत्तर लिहणे
३) उत्तर लिहणे
४) उत्तर लिहणे
स्वतःला येत नसेल तर
बाजूच्याला विचारणार...पण
पेपर मात्र पुर्ण सोडवणार!!
READ MORE - पेपर कठीण आहे हे समजल्यानंतर परीक्षा हॉल मध्ये मुलांचे कारनामे..!!

बायकांच्या या पाच गोष्टी कधीच समजत नाहीत .....

Friday, June 21, 2013

* तुम्ही ना अगदी "हे" आहात?
("हे" म्हणजे काय?)

*तुम्ही पहिल्या सारखे आता नाही राहिलात !! ( मग काय दुसऱ्या सारखेझालो ?)

* मला तुमच्या कडून
हि अपेक्षा नव्हती
(बये मग कसली अपेक्षा होती?)

* खरं सांगा ... मी कशी दिसते?
(खर सांगून का मार
खायचाय ?)

* मी खूप स्वार्थी आहे ना?
(हो म्हटलं तर झालच
.....आपलं कल्याण. ..)
READ MORE - बायकांच्या या पाच गोष्टी कधीच समजत नाहीत .....

मराठी वाकप्रचार - राहायला नाही घर म्हणे लग्न कर !!!!! - एक से एक :)

Monday, June 17, 2013


2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !!!!!

3) वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे जावा !!!!!

4) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !!!!!

5) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !!!!!

6) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !!!!!

7) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !!!!!

8) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !!!!!

9) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !!!!!

10) मनोरंजन नको रिंगटोन आवर !!!!!

11) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !!!!!

12) जागा लहान फ़र्निचर महान !!!!!

13) उचलला मोबाईल लावला कानाला !!!!!

14) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार!!!!!

15) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं...!!
READ MORE - मराठी वाकप्रचार - राहायला नाही घर म्हणे लग्न कर !!!!! - एक से एक :)

दूरदर्शन वरच्या काही जुन्या आठवणी....

Wednesday, June 12, 2013
DoorDarshan Logo

.
१. तो दुरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो
२. दुरदर्शनचा तो पट्ट्या-पट्ट्या च स्र्कीनसेव्हर
३. मालगुडी डेज
... ४. देख भाई देख
५. रामायण
६. मिले सुर मेरा तुम्हारा
७. टर्निंग प्वाइंट
८. भारत एक खोज
९. आलिफ लैला
१०. ब्योमकेश बक्षी
११. तहकीकात
१२. ही मॅन
१३. सलमा सुलताना - ती दुरदर्शनवरची न्युज रीडर
१४. विको टरमरिक, नहीं कौस्मेटीक.... विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम
१५. ट्वँ.........ग!
वाशिंग पाउडर निरमा.. वाशिंग पाउडर निरमा.
दुध सी सफेदी, निरमा से आयी...
रंगीन कपडेभी खिल-खिल जायें!
१६. आय ऐम कौम्प्लॅन बौय [शाहिद कपुर] आणि आय ऐम कौम्प्लॅन गर्ल [आयेशा टाकिया]
१७. "सुरभि" वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ
१८. आणि त्यानंतरचे -"मुंगेरीलाल जे हसिन सपने",करमचंद, विक्रम वेताळ आणि असे बरे........च!


chanakya, mahabharat, tipu sultan, mahabharat, byomkesh bakshi,dekh bhai dekh,vikram vetal

READ MORE - दूरदर्शन वरच्या काही जुन्या आठवणी....

मराठी माणसाला काय येत.?

Tuesday, June 11, 2013


मराठी माणसाला भारतीय राज्य घटनालिहिता येते.

मराठी माणसाला पहिला Indian Idol
बनता येते.

मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येत.

मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर
बनता येते.

मराठी माणसाला स्वराज्य उभं करतायेतं.

मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची
मुहूर्तमेढ रोवता येते.

मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.

मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.

मराठी माणसाला पार्श्वगायनात
सम्राज्ञी बनता येतं.

मराठी माणसाला संपूर्ण भारतात
पहिली मुलींची शाळा काढता येते.

मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.

मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर
बनता येतं.

मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.

**लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.*
अभिमानबाळगा मराठी असल्याचा.....
READ MORE - मराठी माणसाला काय येत.?

बाबा आरामदेव चे बोल वचन


READ MORE - बाबा आरामदेव चे बोल वचन

कॉम्प्यूटर इंजिनीअर ची प्रेम कविता

Saturday, June 8, 2013



READ MORE - कॉम्प्यूटर इंजिनीअर ची प्रेम कविता