कशी मुलगी पाहिजे?

Tuesday, June 26, 2012

कशी मुलगी पाहिजे?
तसा फारच सोपा वाटणारा प्रश्न आहे.
उत्तर तितकंच अवघड.
हा प्रश्न आम्हाला कोण विचारतं, कधी विचारतं त्यावर आमचं उत्तर अवलंबुन असतं.
म्हणजे आईनी रविवारी दुपारी मस्त आम्रस-पुरीचं जेवण झाल्यावर विचारलं की आमचं उत्तर असतं,
"असंच मे महिन्यात रविवारी दुपारी आम्रस-पुरी जेवायला घालणारी मुलगी पाहिजे."
पण जरा serious उत्तर द्यायचं झालं, तर आईला दाखवायला घरी घेऊन जाण्यासारखी ideal
पोरगी जशी असते - शांत, सोज्वळ ("सोज्वळ" अशा पोरी आणि पोरं आता अस्तित्वातच नसतात),
सगळ्यांशी मिळुन-मिसळुन राहणारी, घरातलं आणि बाहेरचं उत्तमरित्या सांभाळणारी, घरातल्या
थोरल्यांचा मान राखणारी, लहानांचे लाड पुरवणारी, सणासुदीला उत्साहानी पुढाकार घेणारी,
ई. हे सर्वोत्तम उत्तर असतं. थोडक्यात म्हणजे काय, ही मुलगी म्हणजे 'बायको कॅटेगरी'!
जवळच्या नातेवाईकांनी विचारलं की तेव्हा थोड्याफार फरकानी आईला दिलेलं उत्तरातली 'बायको
कॅटेगरी' उपयोगी पडते. हं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या लग्नात गेल्यावर आईच्या
मावशीच्या पुतण्याच्या आत्यच्या नव्वदीच्या पुढच्या सासुनी विचारलं तर जोरात त्यांच्या कानात
जाऊन म्हणायचं,
"घरातल्या देवाची पुजा तिनी मनोभावानी करायला पाहिजे, आणि रविवारी दुपारी जेवण
झाल्यावर आमच्या आजीचे पाय चेपुन द्यायला पाहिजे - अशी मुलगी मला हवी आहे!"
~"मिळेल हो, नक्की मिळेल!" असा आशीर्वाद हमखास मिळतोच!
मित्रांपैकी कुणी विचारलं की उत्तर 'बायको कॅटेगरी' (BC) वरुन 'अप्सरा कॅटेगरी' (AC) मधे
बदलतं. शेवटी लग्न करायचं असतं म्हणुन 'माल कॅटेगरी'तली मुलगी कितीही आवडली तरी लग्न AC
किंवा BC शीच करायचं असतं.
'अप्सरा कॅटेगरी' म्हणजे रोमन हॉलिडे मधली अतिशय ग्रेसफुल आणि रॉयल दिसणारी ऑड्रे हेपबर्न,
किंवा 'जाने क्यों लोग प्यार करते हैं' अशा सुंदर खळीतुन प्रेमात पाडणारी प्रिटी झिंटा, किंवा
'पल, पल, हर पल' मधे आपल्याकडे हर पल प्रेमाच्या अपेक्षेने पाहणारी विद्या बालन!
चुकुन जर हे AC-वालं उत्तर आईला दिलं की,
"अरे! जमिनीवर उतर! स्वत:कडे पाहिलं आहेस का कधी आरशात? अरे, त्या फक्‍त सिनेमात असतात.
खरं आयुष्य खूप वेगळं असतं!"
सगळ्यात अवघड परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा एखादी मैत्रिण असा प्रश्न विचारते.
कशी मुलगी पाहिजे?
तिला पण बिन्दास्त AC-वालं उत्तर देऊन टाकायचं.
मित्राला 'AC' म्हट्लं की पटकन समजतं, पण मैत्रिणीला त्यातले बारकावे पाहिजे असतात.
मग ते बारकावे सांगीतले, की ती तिची कोण एक 'जवळची' मैत्रिण ती तुम्हाला सुचवते.
मग स्वत:हूनच सांगते,
'ती तशी छान आहे, पण अप्सरा नाहीये रे... साधीच आहे...' (म्हणजे तुमचा शोध पुन्हा सुरु)
किंवा
'अरे! अगदी अप्सरा आहे! ऐश्वर्याच!' (अशी शक्यता जवळ-जवळ शून्य असते - तुम्हाला भेटेपर्यंत
सलमान, विवेक नाहीतर अभिषेकचा नंबर आधीच लागलेला असतो)
म्हणजे एवढं सगळं करुन उपयोग काहीच नाही!! :-(((
अप्सरा आणि बायको कॅटेगरी दोन्ही वेगवेगळ्या असतात का?
Can I not have best of both the worlds?
आम्हाला कशी मुलगी पाहिजे?
1) सर्व प्रथम म्हणजे ती हुशार, confident आणि independent पाहिजे - ती कशी ओळखायची?
ह्या करता "हीथ्रो टेस्ट" वापरायची. समज ती मुलगी हीथ्रो एरपोर्टवर एकटीच मागे राहिली.
तर हीथ्रो वरुन तिला एकटं घरी येता आलं पाहिजे. मग आमचं घर लंडन मधे असो, मुंबई मधे असो,
किंवा झुमरीतलैय्या मधे! तिला तिथे एकटं येता आलं पाहिजे! म्हणजे ही टेस्ट करायाला आम्ही तिला
मुद्दामुन एकटं नाही सोडणार, पण मुद्दा हा आहे की ती तेवढी हुशार, confident आणि
independent पाहिजे.
२) दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिला मस्त चहा करता आला पाहिजे. स्वयंपाक जमला, नाही जमला तरी
चालेल. पण रोज सकाळी एक कप, आणि संध्याकाळी घरी परत आलं की एक कप असा तिच्या हातचा
बुंगाट चहा मिळाला, तर स्वर्ग-सुखच लाभलं असं समजायचं. आणि चहा बरोबर तिला मस्त गप्पा
मारता आल्या पाहिजेत!
३) आम्हाला लग्नात हुंड्यात ३ नव्या गाड्या पाहिजेत - एक काळी BMW, एक सिल्वर मर्सिडीज,
आणि एखादी तिच्या आवडीची - ह्या सगळ्या गाड्या Leo Mattel कंपनीच्याच पाहिजेत, आणि
आकार इतका मोठा पाहिजे की त्यातली प्रत्येक गाडी आमच्या तळहातावर मावली पाहिजे! म्हणजे
काय की आमच्या घरच्या शोकेस मधे त्या गाड्या पार्क करता येतील. शोकेस मधे आमच्या
बालपणातल्या इतर गाड्या आहेत, आणि आताच्या जगात पार्किंगच्या जागेचा इतका अभाव आहे,
त्याला आम्ही तरी काय करणार?
४) आवडतं पुस्तक आणि सिनेमाबद्दल विचारलं की तिनी पहिलंच उत्तर 'प्राईड आणि प्रेजुडाईस'
आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सोडुन काहीही सांगितलेलं चालेल. "चंपक / चांदोबा" आणि
"डॉक्टर कोतनीस की अमर कहानी" हे उत्तर पण चालेल! अहो, जशी आमची अप्सरा अस्तित्वात
नाही तसाच तो जेन ऑस्टेनचा "मिस्टर डार्सी" आणि शाहरुखचा "राहुल" फक्‍त पुस्तकात किंवा
सिनेमा विश्वातच सापडतो हो!
५) तिला आमचं टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल ह्या खेळांबद्दलचं असीम प्रेम चाललं पाहिजे
- तिला पण हे खेळ आवडत असतील, तर उत्तमच! खेळता येत असतील तर absolutely nothing
like it!
६) तिला फ्रेंच येत असेल तर लई भारी, कारण फ्रेंच इतकी romantic भाषा नाही. आमच्या
तुटक्या-फुटक्या फ्रेंचचे शब्द तिला एखाद्या शायरी किंवा प्रेमगीतातले भासले पाहिजेत. अहो शेवटी
म्हणतात ना,
"nothing else, but an honest intent matters".
७) आम्हाला salsa, jive हे नृत्य प्रकार येत नाहीत, पण शिकायची तीव्र इच्छा आहे. तिला
येत असेल, तर आम्हाला शिकवायचं, किंवा आमच्या बरोबर शिकण्याची तयारी पाहिजे. नाहीतर
आमचा भगवान स्टाईल गणपती डान्स चालला पाहिजे.
८) हिंदी सिनेमा बद्दलचं आमचं अफाट वेड तिला पटलं पाहिजे. अमिताभ, राहुल देव बर्मन, रेहमान
, गुल्जार, किशोर हे आमचे दैवत आवडत नसतील तर निदान बघायची/ऐकायची तयारी पाहिजे.
अधुन-मधुन आम्हाला गोविंदा आणि हिमेश पण आवडतो. (आधीच सांगितलेलं बरं!)
९) आमचं आयुष्यभराचा एकमेव मौल्यवान खजिना म्हणजे आम्ही बालपणापासुन जमवलेली पुस्तकं. आमच्या
खोलीतल्या प्रत्येक कपाटात, बॅगेत, पलंगाखाली, डेस्कवर, बॉक्स मधे, माळ्यावर, फरशीवर, नजर
जिथे जाईल तिथे आमचा खजिना पसरलेला आहे. त्या खजिन्याबद्दलचं आमचं प्रेम तिला पण असावं,
नाहीतर "काय ही रद्दी जमा केली आहे" असले विधान आम्ही खपवुन घेणार नाही.
१०) सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही पत्रिका पाहतो. आम्हाला मुलगी फक्‍त
"हास्य" राशीची पाहिजे. आणि तिचा रक्‍तगट कोणताही असु दे, पण attitude मात्र 'B+'
पाहिजे.
चला, आजच आमच्या मातोश्रींना ही १० गुणांची यादी आम्ही कळवतो. म्हणजे त्यांना शोधायला
बरं. आणि तुमच्या पैकी कोणाला ह्या "अप्सरा + बायको" कॅटेगरीत मोडणारी एखादी मुलगी
माहिती असेल, तर आम्हाला त्वरीत कळवावे, म्हणजे पुढच्या बोलणीला सुरुवात करता येईल.
तो पर्यंत आम्ही गुल्जार भाईंच्या नविन गाण्यावर झूम बराबर झूम करत बसतो,
धागे तोड लाओ चांदनी से नूर के,
घुंघट ही बना लो रौशनी से नूर के,
शर्म आ गयी तो आघोष में लो,
हो सांसों से उलझी रहें मेरी सांसें,
बोल ना हलके, हलके
बोल ना हलके, हलके...!!!!!!!!!!!!!!
READ MORE - कशी मुलगी पाहिजे?

विनोदी फी माफीची अर्ज



" आदरणीय सर,
गोष्ट
अशी झाली कि माझ्या वडिलांनी मला फी भरायला ५०० रु. दिले होते,
..
..
पण मी १०० रु.ची Movie बघितली,
..
१५० रु. ची बियर प्यालो,
..
..
५० रु. चा girlfriend चा mobile recharge
केला, .आणि
२०० रु. Science च्या Madam वर
शर्यत हरलो, कि त्यांचा Maths च्या सरांबरोबर
लफडा आहे,


पण त्यांचा तर लफडा तुमच्याबरोबर निघाला.., .
आता तुमच्या समोर दोनच पर्याय आहेत......
.
१. माझी फी माफ....
२. नाही तर तुमचा पर्दाफाश....!!
.
तुमचा आज्ञाकारी.
.
तुमच्या मुलीचा Boyfriend.
- फालतू
READ MORE - विनोदी फी माफीची अर्ज

मराठी ग्राफिटी - Marathi Graffiti - Part 2

Sunday, June 24, 2012
Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

READ MORE - मराठी ग्राफिटी - Marathi Graffiti - Part 2

महाराष्ट्र सरकार च्या मंत्रालयाला आग लागली त्यावर आलेले विनोदी फेसबुक स्टेटस

Friday, June 22, 2012





- मिञानोँ एक वाईट बातमी
मंञालयात लागलेल्या आगीत
सर्वच मंञी वाचले
-नेमकी सरकारी दप्तरे, कपडे मिल ह्यांनाच कश्या आगी लागता हे शेंबडे पोर पण सांगेल ..
मिथुनच्या प्रत्येक चित्रपटात ह्याच ट्रिक वापरल्या जातात व्हिलन मार्फत .. By: असाच एकजण
- आपले मुख्यमंञी खालुन बघतायेत आग कशी लागली आहे ते. बिचारी बाकी जनता आत अडकली आहे
- बाकी काही जळले नाही तरी चालेल पण आदर्श'ची फाईल मात्र जळाली पाहिजे, शेवटी राज्याच्या अब्रूचा प्रश्न आहे.
- उद्यापासून "आदर्श सोसायटीची इमारत" महाराष्ट्राचे "नवीन मंत्रालय" म्हणून वापरण्यात येणार...!!! :P
-मंत्रालयाला लागली आग..! पण मंत्र्यांची फुलेल बाग..!! फायरमन करतील कष्ट..! घोटाळ्यांचे पुरावे होतील नष्ट..!!
-मंत्रालयाला लागली आग…पण घोटाळ्याचे पुरावे झाले खाक. फायरमन करत आहेत आग विझवण्याचे काम… पण मंत्र्यांना मिळणार घसघसीत दाम… लोकहो..सर्व विसरून करा आता तुम्ही कष्ट…आणि घसा ओरडून म्हणा “जय महाराष्ट्र”
-
अजून तुम्ही पण खूप उडविली असेल


READ MORE - महाराष्ट्र सरकार च्या मंत्रालयाला आग लागली त्यावर आलेले विनोदी फेसबुक स्टेटस

काही गमतीदार शब्द..

Thursday, June 21, 2012


कधी कधी एकाच अर्थाचे दोन किंवा अनेक शब्द एकाच वाक्यात वापरले जातात..
त्यातलेच काही निवडक..
*************** *************** ***********
१) जेंटस वॉर्डबॉय़,
२) खिडकीजवळची विंडोसीट,
३) आजारी पेशंट,
४) चुकीचा गैरसमज,
५) रिअल फॅक्ट्,
६) गाईचे गोमुत्र,
७) खाली अंडरलाईन
८) गोल राऊंड
९) खाली सीट डाऊन
१०) खराब Bad-Luck
११) टिफीनचा डबा
१२) आइडीयाची कल्पना
१३) Bracket च्या कंसात


१४) शेवटचा एंड प्वाईंट
१५) पिवळा पीतांबर
१६) आल्याचा आलेपाक
१७) आंब्याचा आमरस
१८) खरोखर सत्य
१९) सुंदर अप्सरा
२०) बिभत्स राक्षस
२१) हुशार प्राध्यापक
२२) डॉक्टर वैद्य
२३) नालायक पुढारी
२४) पाठिमागची बॅक्-ग्राऊंड
२५) पांढरा व्हाईटनर
२६) लेडी सेल्सगर्ल
२७) जंटल मॅन / मेन (सगळे मॅन / मेनजंटलच असतात)
तुमच्या कडे काही असतील तर सांगा..........



READ MORE - काही गमतीदार शब्द..

गमतीदार राशीचक्र............



१. मेष - हेच करतात सर्वांचा द्वेष.
२. वृषभ - याचं दर्शन कायम दुर्लभ
३. मिथुन - सगळी कामे करतात कुंथून.
४. कर्क - नेहमीच असतात, स्वतःत गर्क.
५. सिंह - बायकोपुढे झुरळ,बाहेर मात्र सिंह.
६. कन्या - चौकात मारी, नेहमीच बात्या.
७. तूळ - डोक्यात नेहमी नवीनच खूळ.
८. वृश्चिक - विंचवाला म्हणे, माझ्याकडून  शिक.
९. धनू - माझ्यापुढे कोणाला शहाणे मानू?
१०. मकर - नेहमी चुकवतो"आयकर".
११. कुंभ - कधीही पाहा, नेहमी सुंभ.
१२. मीन - आवडतो पाहायला, हॉट सीन
तुम्ही कोणत्या गटात मोडता..............


READ MORE - गमतीदार राशीचक्र............

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर

Wednesday, June 20, 2012


आज लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्मदिन. लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर (इ.स. १८६९ - २६ सप्टेंबर, इ.स. १९५६;) हे मराठी, भारतीय उद्योजक होते. भारतातील एका प्रमुख असणा-या किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक.
इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकलदुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. बेळगावात प्लेगची साथ आल्याने दुकान शहरा बाहेर हलवावे लागले. मात्र परदेशी नागरिक भीतीने न आल्याने हा धंदाही बसला. नुसते सायकलवर अवलंबून राहण्यासारखे नव्हते म्हणून त्यांनी आजूबाजूच्या परिसरावर लक्ष केंद्रित केले. त्यातून त्यांना शेतक-याची अडचण लक्षात आली. शेतकरी जनावरांना कोंडा घालत. त्यात धान्याची पाती व फांद्याचे तुकडे असत. जनावरे ते खात नसत. ते तुकडे तसेच बाहेर टाकत त्यामुळे जनावरांनाही त्रास होत असे. त्यामुळे लक्ष्मणरावांनी चा-याचे बारीक तुकडे करणारे यंत्र बनवले. त्यांनी ते मशीन खेड्यापाड्यात जाऊन चालवून दाखवले. लोकांना ते पसंत पडले. जनावरांचाही त्रास कमी झाला. मात्र गुरांसाठी पैसे खर्च करण्याची मानसिकता शेतक-यात नव्हती. कारण रानात चा-याचा तुटवडा नव्हता.
हा प्रयोग फेल झाल्यावर त्यांनी विचार केला की, शेतक-यांना आवश्यक असणारी वस्तू बनविली पाहिजे. त्याप्रमाणे त्यांचे लक्ष नांगरकडे वळले. पारंपरिक नांगर खोलवर शेत नांगरत नव्हते. त्यामुळे पिक चांगले जोम धरत नसायचे म्हणून त्यांनी अधिक लोखंड घालून मजबूत नांगर बनविला. मात्र नवा नांगर आपल्या जमिनीत घालावा ही मानसिकता शेतक-यांची नव्हती. मात्र लक्ष्मणरावांना नांगर चालेल असा विश्वास होता. अनेकांनी तो नांगर नाकारला. शेतकी खात्याने त्यांच्या नावाची शिफारस न करता त्यात चुका काढल्या. लक्ष्मणरावांनी ते आव्हान स्वीकारले त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. परदेशी नांगराचा अभ्यास करून आपल्या नांगरात सुधारणा केल्या. मात्र तरीही त्याची किंमत त्याकाळी ४० रु. होती. सामान्य नांगर ६ रु. ला पडत होता. ही मोठी अडचण होती. मात्र येणारे पिक जमा धरल्यास हा खर्च सहज परवडणारा होता. म्हणून किर्लोस्करांना विश्वास वाटत होता. त्यांच्या नांगराची माहिती मिळाल्यावर काही शेतकरी आले व त्यांनी मोठी ऑर्डर दिली. त्यातून त्यांना उत्साह वाढला. नांगर हळूहळू प्रसिद्ध होऊ लागले. यानंतर मात्र सरकारच्या शिफारसीत किर्लोस्कर नांगराचा समावेश झाला. अनेक व्यापा-यांनी ते खरेदी केले व इतर शेतक-यांना ते भाड्याने वापरण्यास दिले. अशाप्रकारे व्यवसाय वाढत गेला.
कारखाण्याच्या जमिनीचा प्रश्न निर्माण झाल्याने ती जागा जाणार होती. दरम्यान त्यांनी एका मित्राला औंध येथे सभागृह बांधकामात चांगले काम करून दिल्याबद्दल त्या मित्राने किर्लोस्कर यांना पडीक जमीन कारखान्यासाठी दिली. त्या जमिनीत साप विंचू फार होते. रेल्वे दूर अंतरावर होती. रस्तेही चांगले नव्हते. अन्य सुविधा नव्हत्या, मात्र ओंध येथील त्या पडीक जमिनीत त्यांनी कारखाना उभारण्याचे आव्हान स्वीकारले.
बेळगावहून रेल्वेने यंत्रसामग्री आणली. तेथून बैल गाडीतून ते सामान आणले व कारखाना सुरु केला. हा कारखाना एवढा वाढला की, ही जमीन म्हणजेच प्रसिद्ध उद्योग वसाहत किर्लोस्कर वाडी बनली. एक प्रसिद्ध उद्योग नगरी. शून्यातून आकाराला आलेल्या उद्योगाची कर्मभूमी.
येथे ३ वर्षे चांगला व्यवसाय केल्यावर १९१४ मध्ये युद्ध सुरु झाले. त्यामुळे परदेशी रंग, लोखंड मिळणे कठीण झाले. मात्र किर्लोस्कर यांनी तोडगा काढला. त्याकाळी कोल्हापुरात बिनकामाच्या तोफा पडून होत्या, त्या त्यांनी मिळविल्या आणि त्या वितळवून कच्चे लोखंड मिळवून नांगर तयार केले. त्याच दरम्यान जवळच भद्रावती येथे कच्च्या लोखंडाचा कारखाना सुरु झाला होता. त्यामुळे लोखंडाची गरज मिटली. कोळसा लाकडाच्य वखारीतून त्यांनी मिळविला. रंगाचा कारखाना स्वत:च सुरु केला.
या युद्धकाळात अनेक वस्तूंची मागणी वाढते व व्यापारी उद्योगपती तरले जातात. त्याप्रमाणे किर्लोस्कर उद्योगही तरला. १९१८ पर्यंत त्याचे भांडवल ५ लाख झाले होते. त्याकाळी ही रक्कम गडगंज होती. यानंतर मात्र किर्लोस्कर यांनी उद्योगात भरारी घेण्यास सुरुवात केली. १२ लाखाचे भांडवल उभे करून किर्लोस्कर ब्रदर्स लि. कंपनी स्थापन केली. तिची व्यवस्था पाहण्यासाठी किर्लोस्कर सन्स एन्ड कंपनी उभारण्यात आली. लोकाचा विश्वास् बसावा यासाठी कंपनी गुंतवणुक दारांना ९% डिव्हिडंड देणार नाही तोपर्यंत संचालक मोबदला घेणार नाहीत असे जाहीर केले. याचा चांगला परिणाम झाला. मोठे भांडवल उभे राहिले.
१९२० च्या सुमारास आणखी दोन यंत्रे बाजारात आणली. उसाचा रस काढण्याचे मशीन आणि ड्रिलिंग मशीन. त्याचबरोबर इतरही शेतकी कामात उपयोगी पडणारी साधने तयार करण्यात येत होती.
किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली.


READ MORE - लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर

मुली देता अश्या १११ मराठी सभ्य - शिव्या।

Monday, June 18, 2012



१) नालायक
२) मुर्खा
३) बावळट
४) डुक्कर :) ५) टरमळया
६) नरसाळया
७) सुरनळया
८)दळभद्री
९) दलिंदर
१० )फुकटया ११) कुत्र्या
१२) वकटया
१३) बावळया
१४) गाढव
१५) बुचकळ्या
१६) ये गाजर १७) उड़ानटप्पू
१८)छमिया
१९) बोंगाडया
२०) पोंग्या
२१) माठया
२२)बैल २३) बैलोबा
२४) सुक्क्या
२५) ठोल्या
२६) मोट्या
२७) म्हासाड
२८) सांड २९) हूडडिंगा
३०) धटिंगन
३१) आवाकाळी
३२)मंद
३३) ढिल्या
३४) च्यायला ३५) मायला

३६) बायल्या
३७) गाभ्न्या
३८) च्यामारी
३९) चूक मारी च्या ( नटरंग मधेय होती हि शिवी )
४०) कापिंदर ४१) एपितर
४२) झेंडू
४३) जाड्या
४४) बाचक्या
४५) ढेरपोट्या
४५) थेरड्या ४६) शेळपट
४७) मेंगळट
४८) ढेम्स्या
४९) सुक्कड
५०) खेकड्या
५१) डुरक्या ५२) झिन्ग्या
५३) बेडूक
५४) झिपऱ्या
५५) टकल्या
५६) बेशरम
५७) बदमाश ५८) निर्लज्ज
६०) निलाजरा
६१) बिनडोक
६२) टमरेल
६३) खटारा
६४) भागुन्या ६५) टपरी

६६) छपरी
६७) तुसाड्या
६८) नसान्या
६९)बडबड्या
७०) सापळ्या 71)मोक्कर
72)बधीर
73)गेंड्या
74)वेड्या
75)येड्या
76)येडपट 77)मेंटल
78)सर्किट
79)चक्रम
८०) भेकड
८२) घनचक्कर
८३) फाटीचर ८४) फाटक्या
८५) खुळ्या
८६) भामट्या
८७) राक्षसा
८८) कडमडया
८९) दारुड्या ९०) बेवड्या
९९) पेताड
१००) डाम्बिस
१०१) भवाने
१०२) डाकिन
१०३) चेटकीण १०४)
१०५) मरतुकड्या

१०६) ढोरा
१०७) खप्पड
१०८) बहिऱ्या
१०९) मुक्या ११०) फुकड्या
१११) अल्लड
READ MORE - मुली देता अश्या १११ मराठी सभ्य - शिव्या।

अहो ऐकलं का ? आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

Saturday, June 16, 2012





गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमान
आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
आणी बाईक पुसण्याचे आम्ही काधिच श्रम घेत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!
सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तास भर खातो
आणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!
वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो
काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो
आणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!
आमचे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,
आणी आमचा फोन कधीच जास्त एंगेज येत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!
मित्रांच्या सगळ्या प्लान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दुसर्यांच्या प्लान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!
लोकांना टाळयायला आमच्या कडे बहाने नसतात,
आमचे तर बूवा अड्डे सगळ्याननाच  माहीत असतात,
अणी ठरल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!
सुट्ट्या आणि एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नसते,
बाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बर्थडेत असते,
बाकी तारखा लक्ष्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!




आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,
टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,
अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,
कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!
बघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,
तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,
सांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,
आणि अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,
कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही...!
READ MORE - अहो ऐकलं का ? आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही...!

एका लग्नाची गोष्ट - मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं

Friday, June 15, 2012



मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं
दान घेतानाही झोळी हवी रिकामी
भरता भरता, थोडी पुन्हा वाढलेली
आपण फक्त घेताना, लाजायचं नसतं
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं
देव देतो तेव्हा, छप्पर फाडून देतो
हवयं, नको ते म्हणणं, प्रश्नच नसतो
आपण फक्त दोन्ही हात, भरुन घ्यायचं नुसतं
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं..!!


READ MORE - एका लग्नाची गोष्ट - मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं

भंकस कविता - ओळखले का सर मला विडंबन



ओळखलत का मुलीनो..?
" गुलाबासह " आला कोणी,
केस होते सलमानसारखे कानात होती बाळी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला शर्ट काढुन ’
काल तुझा भाऊ ... भेटला गेला बरगड्या तोडुन,
गाढवाला मारल्यासारख खालुन- वरुन चोपल
रिकाम्या हाती जाईल कसा अँतर्वस्त्र तेवढे वाचल!!
चपले कडे हात जाताच तावा - तावात  बोललो,
चप्पल , बुट नको मुळी फ़क्त ड्रेस तेवढा पाठवा!!
मोडुन पडली प्रेम स्टोरी तरी मोडला नाही चाळा
एखादी ’ बीन भावाची ’ पोरगी असेल तर... तेवढ नक्की कळवा....
Source : Facebook (Heart Hacker)


READ MORE - भंकस कविता - ओळखले का सर मला विडंबन

आचार्य अत्रे ह्यांचे १ से एक किस्से - Acharya Atre

Monday, June 11, 2012


एकदा अत्रे रेलवे रूला शेजारून चालले असतात !त्यांच्या शेजारून कोलेज ची
मुले चालली असतात !
त्यातला एक मुलगा अत्रे याना सतवायाचे थरावातो ! तो अत्रे ना विचारतो हे
काय आहे? (रुळ दाखवून )
अत्रे : रुळ आहेत !
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : लाकडी स्लिप्पर आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : खडी आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माती आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : मुरुम आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माझा बाप आहे .
मुलगा विचार करतो अत्रे आता चिडले आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : तुझी आई आहे .
मुलगा लगेच तिथून सतकतो

--------------------------------------------------------------
हौशी नाटकांच्या प्रयोगाबिषयी बोलताना आचार्य अत्रे भाषणात म्हणाले, "नाटकाच्या तालमी करायच्या नाहीत अन आयत्या वेळी कशीतरी वेळ मारून नेली म्हणजे स्वतःला कृतकृत्य मानायचे हे हौशी नाटकवाल्यांचे एक ठराविक तंत्र होऊन बसले आहे. नाटक बसवायचे म्हणजे वाच्यार्थ्याने अक्षरशः ते खाली बसवूनच दाखवतात." पुढे ते म्हणाले, "अशाच एका हौशी नाटकाच्या प्रयोगाला गेलो असता सर्वात कोणाचे काम चांगले झाले असे सांगण्याची माझ्यावर वेळ आली, तेव्हा प्रॉम्पटरचे काम सर्वान चांगले झाले, असे सांगणे मला भाग पडले..."
--------------------------------------------------------------
एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते; मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ विरोधकांपेक्षा बरेच जास्त होते. अत्रे मात्र एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवीत असत.
एकदा अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असताना पत्रकारांनी त्यांना छेडले. “अत्रेसाहेब, तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता खरे; पण त्यांच्या एवढ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?”
बाजुला वळून अत्र्यांनी ज्याच्या शेताला भेट द्यायला ते आले होते त्या मालकाला विचारले, “बळवंतराव, कोंबड्या पाळता की नाही?”
“व्हय तर!”
“किती कोंबड्या आहेत?”
“चांगल्या शंभरएक कोंबड्या हायेत की!”
“आणि कोंबडे किती?”
“कोंबडा फक्त एकच हाये.”
”एकटा पुरतो ना?”
उपस्थितांमध्ये प्रचंड हशा उसळला आणि सर्व पत्रकारही त्या हशांत सामील झाले.

--------------------------------------------------------------
१९६५ सालची गोष्ट असावी. नक्की मला आठवत नाही.सांगली मध्ये अत्रे यांचे भाषण होते गावभागात.मी नुकताच खेड्यातून य़ा शहरात आलो होतो,त्यामुळे अत्र्यांच्या भाषणास जायचेच असं ठरवून च सभेस गेलो होतो.दूर अंतरावर उभे राहून त्यांचे भाषण ऐकत होतो.एवढ्यात गर्दीतून “अत्रेसाहेब खिशातला हात काढा” असा आवाज ऐकू आला. अत्र्य़ाना खिशात हात घालून बोलण्याची संवय असावी.पण अत्रे महोदयानी शान्तपणे उत्तर दिले कि “तुमच्या मनात जे आहे ते माझ्या हातात नाही”गर्दीतून प्रचंड हशा नि टाळ्या पडल्या आणि अत्र्यांचे भाषण शांतपणे तसेच पुढे चालू राहिले.
READ MORE - आचार्य अत्रे ह्यांचे १ से एक किस्से - Acharya Atre

खरा तो एकची धर्म - साने गुरुजी




खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
----------------------------------------------------
पांडुरंग सदाशिव साने
टोपणनाव: सानेगुरुजी
जन्म: डिसेंबर २४, इ.स. १८९९
पालगड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: जून ११, इ.स. १९५०
के.इ.एम.रुग्णाल य मुंबई
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: छात्रालय दैनिक, साधना, साप्ताहिक
प्रमुख स्मारके: वाडघर-गोरेगाव, माणगाव तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
धर्म: हिंदू
प्रभाव: महात्मा गांधी
वडील: सदाशिव
आई: यशोदाबाई
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनि क, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठीसाहित्यिक होते


READ MORE - खरा तो एकची धर्म - साने गुरुजी

ये रे ये रे पावसा चे विडंबन

Friday, June 8, 2012


ये रे ये रे पावसा ऐवजी लहान मुलांना हि कविता शिकवा आता ..
ये ग ये ग वीज
का जाते रोज
असते नुसती येवून जावून
ते पण पैसे जास्त घेवून
ये ग ये ग घरी
मग फॅन आमचा फिरी
वीज आली धावून
बल्ब गेला उडून
वीज येते डीम डीम
ट्यूब करते झिम झिम
विजेवर लावला अधिभार
बिल आता येणार फार
असाच एकजण (हि पोष्ट फेसबुक वरील असाच  एकजण पेज वरून साभार घेण्यात आली आहे )


READ MORE - ये रे ये रे पावसा चे विडंबन

व्यंगचिञकार वॉल्ट डिस्ने याच्या आयुष्यातील ही गोष्ट आहे....

Thursday, June 7, 2012


उमेदवारीच्या काळात वृत्तपञाच्या संपादकाकडून त्याची चिञं साभार परत येत.
ते म्हणतं वॉल्ट डिस्नेजवळ प्रतिभा, सर्जनशीलता नाही.
एक दिवस चर्चमधील एका धर्मोपदेशकाने काही व्यंगचिञ काढण्यासाठी त्याला बोलावलं.
चर्चशेजारील उंदरांचा सुळसुळाट असलेल्या एका खोलीत डिस्ने काम करीत होता.
तेथील एक छोटा उंदीर खेळताना पाहून त्याला उंदरावर आधारित चिञमालिका तयार करण्याची प्रेरणा मिळाली;
हीच आज जगभर आबालवृद्धांना आवडणाऱ्‍या “मिकी माऊस” ची सुरुवात.
यशस्वी लोक हे काही अवाढव्य ,अचाट करीत नाहीत; तर ते साध्या साध्या गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने व्यवस्थित करतात.


READ MORE - व्यंगचिञकार वॉल्ट डिस्ने याच्या आयुष्यातील ही गोष्ट आहे....

भाज्यांपासून केलेली अप्रतिम सजावट चित्रे - Design made from vegetables

















READ MORE - भाज्यांपासून केलेली अप्रतिम सजावट चित्रे - Design made from vegetables

जे आपल्या माथाडी कामगाराला जमले ते जर्मन तंत्रज्ञांना सुद्धा जमले नाही.......

Wednesday, June 6, 2012



बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एका कंपनीच्या ईमारतीच्या तळ्घरात एक अवाढव्य यंत्र उतरवायचे होते......त्या काळात ते यंत्र पेलणारी मोबाईल क्रेन नव्हती. मुंबई पोर्ट कडे तशा क्रेन होत्या पण फिक्स्ड होत्या. ऐन पावसाळ्याच्या दिवसात ते यंत्रच प्रचंड मोठ आणि महागड  जर्मनी मधुन मागवले होते....
माथाडे कामगाराणी ओंडक्यांच्या मदतीने ते ट्रेलर वरुन उतरवल......पण ते तळघरात ३६ फुट खोल ढकलायचे कसे यावर जर्मन आणि भारतिय तंत्रज्ञ खल करीत बसले होते.....अखेरीस जम्शेदपुर वरुन क्रेम मागवायचे असे ठरले.....पण त्यासाठी किमान २ आठवडे ईतका तरी वेळ लागणार होता.......
माथाडे कामगारांच्या टोळीचा कंत्राटदार ही मजा पाहत होता....तो म्हणाला
''साहेब मला आणी माझ्या माणसांना कशापायी ईथे थांबवुन थेवलय.....?''
त्याला सगळी परिस्थीती समजावून सांगितल्यावर तो चटदीशी म्हणाला
''हत्तीच्या....!!! एवढंच  ना ....? मी सोडुन दाखवतो यंत्र खाली....''
इंजिनियर म्हणाले एवढे सोपे नाही राव ते....जर्मन प्रमुखांनीही सुरुवातीला हसण्यावारीच नेल....एवढे भले भले  इंजिनियर डोक खाजवतायत तिथे हा अडाणी माथाडी कामगार काय करणार....???
पण त्याचा कॉन्फीडन्स जोरावर होता...त्याला गमतीनेच ती ऑफर देण्यात आली....निदान त्यच्या डोक्यात काय आहे ते जाणुन घेण्यासाठी,,,,,
कंत्राटदाराने एकाच वेळी आईस फॅक्टरीमधुन ५-६ ट्रक बर्फ मागवाला...आणि तो तळ्घरात ढकलून दीला....
आणि खडा बर्फाने भरुन घेतला.....मग ओंडक्यावरुन ते यन्त्र ढकलत त्या बर्फावर आणले....आणि एकाबाजुने पाणी बाहेर काढण्यसाठी पंप सुरु ठेवला.....जस जसा बर्फ वितळत राहीला तस तस त्याने पंपाने पाणि बाहेर काढता राहिला...आणि हळु हळु यंत्र खाली जात राहिल.....
ही साधी युक्ती आपल्याला का नाही सुचली म्हणुन् तो जर्मन डोक्याला हात लावुन बसला......
Source: Facebook


READ MORE - जे आपल्या माथाडी कामगाराला जमले ते जर्मन तंत्रज्ञांना सुद्धा जमले नाही.......

मराठी ग्राफिटी - Marathi Graffiti - Part 1

Tuesday, June 5, 2012
Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

READ MORE - मराठी ग्राफिटी - Marathi Graffiti - Part 1