Showing posts with label कुठेतरी छानसे वाचलेले. Show all posts
Showing posts with label कुठेतरी छानसे वाचलेले. Show all posts

बिल गेट्स बद्दल - हे वाचा झोप लागणार नाही...!! .

Saturday, July 27, 2013



१) बिल गेट्स हा प्रत्येक सेकंदाला यु.एस.$ २५० कमावतो, म्हणजेच दिवसाला यु.एस.$ २० मिलियन, आणी यु.एस.$ 7.8 बिलीयन दर वर्षी…!
२) बरं जर समजा याच्या हातुन जर १ हजार डॉलर हरवले तर हा माहाभाग तेशोधण्याचाही प्रयत्न करणार नाही,कारण येत्या चार सेकंदांनी हा ते कमाउन बसलेला असेल…!
३) याने जर १५ डॉलर जगातल्या प्रत्येक व्यक्तीस देउन दिले, तरीही याच्या खिशात यु.एस.$ ५ मिलियन इतकी रक्कम उरलेली असेल.
४) अमेरिकेत मायकाल जॉर्डन हा सर्वात जास्त पैसे कमावणारा खेळाडु आहे. जर याने आयुष्यभर काही न खाता-पीता आपले वार्षीक उत्पन्न वाचवले जे की ३० मिलीयन डॉलर इतके आहे, तरिही त्याला बिल गेट्स इतके श्रीमंत होण्यासाठी, २७७ वर्षे वाट पाहवी लागेल.
५) समजा बिल गेट्स हा जर एखादा देशअसता, तर जगातला ३७ वा श्रीमंत देश होण्याचा मान याने पटकावला असता.
६) विचार करा जर बिल गेट्स ने आपलापैसा १ डॉलर च्या नोटांमधे रुपांतरीत केला, तर तो चंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनउ शकतो. तेही एक रस्ता नाही, असे २८ रस्ते तो बनउ शकतो. पण हा रस्ताबनवायला १४०० वर्ष लागतील, आणी तेही जवळपास ८००, बोइंग ७४७ विमानांचा वापर करावा लागेल पैसापोहचवण्यासा ठी.


७) बिल गेट्स आता जवळपास ५४ वर्षांचा झाला आहे, ग्रुहीत धरा तो आणखी ३५ आणखी जग़ेल, जर पुर्ण संपत्ती खर्च करायची असल्यास, वेळात त्याला दर दीवशी जवळपास ७ मिलियन डॉलर खर्च करवे लागतील.
आता शेवट:
८) मायक्रोसॉफ्ट ही प्रणाली वापरणार्या जगातल्या प्रत्येक माणसाने, जेव्हाही त्यांचा संगणककाम करायचा थांबल्यास(म्हणज ेच हॅंग झाल्यास) जर फक्त १ डॉलर इतका दावा मायक्रोसॉफ्ट या कंपनिवर केला, तर फक्त ३ दिवसांच्या कालावधीत बिल गेट्स चे दिवाळे नीघेल.
READ MORE - बिल गेट्स बद्दल - हे वाचा झोप लागणार नाही...!! .

Marathi Mulgi - मराठी मुलगी कशी ओळखाल...??

Monday, July 22, 2013
Shruti Marathe Marathi Mulgi

१) ओढणी (पदर) चुकून
थोडीशी जरी काही पडली तरी विजेच्या वेगाने लगेच
सावरणारी !!! ...
२) पुण्याच्या गर्दीने भरलेया बसमध्ये सुद्धा,
किवा मुंबईच्या गर्दीतसुद्धा आपले सत्व सांभाळणारी!!!
३) मुलगा कितीही आवडला तरी , भावना वक्त न
करणारी !!!
४) कॉर्पोरेट ऑफिस मध्ये कामाला असलीतरी छोटस
का होईना मंगल सूत्र घालणारी !!!
५) कितीही मोठ्या हुद्यावर कामाला असली तरी आपले
आई वडील , सासू सासरे,नवरा , भाऊ यांना मान देणारी !!!
६) समाज्यात वावरताना सगळ्यांना भाऊ, दादा म्हणून हाक
मारणारी !!!
READ MORE - Marathi Mulgi - मराठी मुलगी कशी ओळखाल...??

थोडस डोक खाजवा आणि विचार करा. . .

Wednesday, July 3, 2013
Opening beer can with teeth



- कोलगेट नव्हता तेंव्हा भारतात कुणी दात घासत नव्हतं का ?
- चहा नव्हता तेंव्हा भारतात सगळे सुस्त
आणि आळशी होते ?
- क्रिकेट नव्हता तेंव्हा भारतात कुणी खेळत नव्हतं का?
- वैलेनटाइन डे नव्हता तेंव्हा भारतात कुणी प्रेम करत नव्हतं का ?
- फेअर अँड लवली नव्हती तेंव्हा सर्व भारतीय नारी काळ्या होत्या का ?
- स्कर्ट नव्हते तेंव्हा भारतात मुली शिकत नव्हत्या का ?
- अमूल माचो नव्हतं तेंव्हासर्व भारतीय नांगडे होते का?
- डिस्को नव्हतं तेंव्हा भारतात संगीत नव्हतं का ?
- ओह माय गॉड शब्द नव्हता तेंव्हा भारतीय लोक देवाला मानत नव्हते का ?
- लाइफ बाय, लक्स नव्हता तेंव्हा भारतात कुणी आंघोळ करत नव्हतं का ?
- पैंटीन नव्हतं तेंव्हा सर्व भारतीय टकले होते का ?
- इंग्रजी नव्हतं तेंव्हा भारतात सगळे बेअक्कल होते का ?
READ MORE - थोडस डोक खाजवा आणि विचार करा. . .

पोपट वाघ आणि डुक्कर - फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट

Friday, June 28, 2013

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे....

एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर राहत होते..
त्यांची खूप मैत्री होती, ते एक मेका शिवाय राहू शकत नव्हते.. .
एके दिवशी वादळ आल, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले..
.
आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले. .
आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजारात
त्याचा मृत्यू झाला.
.
... .
आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंत
राहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले...
.
.
खूप दिवसांनी ज्या ठिकाणी पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते
त्या ठिकाणी एक'मोहाचे' ( 'मव्हाचे') झाड रुजू लागले...
.
पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने''दारू'' बनवली.
..
..
आणि म्हणूनच ज्या वेळी माणूस दारू पितो त्यावेळी
पहिला त्याचा पोपट होतो..
आणि पोपटा सारख बोलू लागतो...
.
थोड्या वेळाने तो वाघ होतो..
आणि कुणालाही न घबराता तो वाट्टेल ते बोलू लागतो, कुणाचेच ऐकत नाही.. .
.
सरते शेवटी त्याचा डुक्कर होतो.
आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर लोळतो.. त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात लोळतो.......


READ MORE - पोपट वाघ आणि डुक्कर - फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट

दूरदर्शन वरच्या काही जुन्या आठवणी....

Wednesday, June 12, 2013
DoorDarshan Logo

.
१. तो दुरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो
२. दुरदर्शनचा तो पट्ट्या-पट्ट्या च स्र्कीनसेव्हर
३. मालगुडी डेज
... ४. देख भाई देख
५. रामायण
६. मिले सुर मेरा तुम्हारा
७. टर्निंग प्वाइंट
८. भारत एक खोज
९. आलिफ लैला
१०. ब्योमकेश बक्षी
११. तहकीकात
१२. ही मॅन
१३. सलमा सुलताना - ती दुरदर्शनवरची न्युज रीडर
१४. विको टरमरिक, नहीं कौस्मेटीक.... विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम
१५. ट्वँ.........ग!
वाशिंग पाउडर निरमा.. वाशिंग पाउडर निरमा.
दुध सी सफेदी, निरमा से आयी...
रंगीन कपडेभी खिल-खिल जायें!
१६. आय ऐम कौम्प्लॅन बौय [शाहिद कपुर] आणि आय ऐम कौम्प्लॅन गर्ल [आयेशा टाकिया]
१७. "सुरभि" वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ
१८. आणि त्यानंतरचे -"मुंगेरीलाल जे हसिन सपने",करमचंद, विक्रम वेताळ आणि असे बरे........च!


chanakya, mahabharat, tipu sultan, mahabharat, byomkesh bakshi,dekh bhai dekh,vikram vetal

READ MORE - दूरदर्शन वरच्या काही जुन्या आठवणी....

नवऱ्यांच्या विविध छटा दाखविणारे किस्से

Thursday, December 6, 2012



मध्यंतरी सहज वाटले, नवऱ्यांच्या विविध छटा दाखविणारे किस्से  गोळा करावेत. त्या ‘नाटय़’मय छटांचा हा गुलदस्ता!
ही नवऱ्यांची षट्कोनी आकृती!
१) एक राजनेता नवरा election मध्ये बिझी असतो.
बायको बाळंतपणासाठी गेलेली असते. 
निवडणुकीच्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या नवऱ्यास
मतमोजणीच्या निकालाऐवजी घरचा फोन आधी येतो-‘‘आपल्या पत्नीस ‘तिळे’ झाले आहे.’’ नेता काही विचार न करता इलेक्शन मूडच्या धुंदीत उत्तरतो, ``Oh no! I demand a recounting!!''


२) एक अरेरावी नवरा ऑफिसमधून घरी येतो. नेहमी स्वच्छ दिसणारे घर आज अस्ताव्यस्त पसरलेले दिसते. बिछाना तसाच, किचनमध्ये खरकटी भांडी, मुलांचे कपडे, खेळणी इकडेतिकडे and what not.
‘‘तू दिवसभर करतेस तरी काय?’’- तो पत्नीस फटकारतो.
बायको हुशार. ती म्हणते- ‘‘त्या प्रश्नाचेच हे उत्तर आहे! आज मी खरोखर काही काम केले नाही. वाटले, त्यामुळे तरी तुम्हाला कळेल की मी दिवसभर रोज काय करते!’’
३) रंगेल नवरा- संशयी बायको एका पार्टीत एक स्त्री Event Manager ला विचारते-
``Excuse me please! ती beautiful तरुणी drinks serve करत होती ती कोठे गेली? दिसत नाही इथे ती?’’
मॅनेजर- ‘‘आपणास काय हवे आहे, मॅडम? That girl or the drink?''
पत्नी- ‘‘दोन्ही नाही. Neither girl nor drink! I am searching for my husband!! माझा नवरा शोधते आहे मी!’’


४)Hen pecked नवरा- एका जोडप्याचा वादविवाद जोरात चालू असतो. शेवटी ते प्रकरण
संपवावे म्हणून नवरा ‘बरं! राहील!!’ असं म्हणून आपले ‘स्थान’ ग्रहण करतो व पुटपुटतो- ``I am a man of few words!'
पण त्यानेही बायकोचे समाधान होत नाही. ती टोमणा मारतेच- ``Yes! But you keep repeating them! समजलं?’’-

५) नवीन नवरा-
नुकत्याच लग्न झालेल्या नवरदेवाची त्याचे मित्र खूप तारीफ करतात- ‘‘तू खरंच भाग्यवान आहेस! तुझी बायको, आमची वहिनी, हरिणाक्षी आहे, her lips are like rose buds, तिचा आवाज
कोकिळेसारखा आहे, ती गजगामिनी आहे, सिंहकटी आहे!! you're very fortunate!' त्यावर नवरदेव काय म्हणतात- ``I am not so sure! she does not seem to have a single characteristic of a HUMAN BEING! नुसती जनावरे काय कामाची?’’



६) शेवटी.. हा प्रेमळ नवरा- प्रिन्सिपॉलसाहेबांशी झगडा झाल्यामुळे चिडलेली, नव्र्हस झालेली शिक्षिका टेन्शन घेऊन सायंकाळी घरी येते. नवरा तिला गरमागरम कॉफी देतो, इकडल्यातिकडल्या गमतीदार
गोष्टींनी तिला हसवतो, तिचा मूड change करतो व तिला ‘‘असं चालतेच गं! cheer up!' वगैरे म्हणून तिचे सांत्वन करतो. ती स्त्री उत्साहित होते व म्हणते- ``Dear! you are really MY STRENGTH!' नवरा हसतो व तितक्याच प्रेमाने म्हणतो- ``And you are really MY WEAKNESS!''
READ MORE - नवऱ्यांच्या विविध छटा दाखविणारे किस्से

जर प्राणी पण FACEBOOK वर असते तर

Wednesday, December 5, 2012




जर प्राणी पण FACEBOOK वर असते तर, त्यांचे Status Updates काही असते :

झुरळ: यार काल रात्री एक बाई माझ्याकडे बघुन एवढ्या जोरात किँचाळली की पुर्ण घर माझ्या पिछेच पडल पण तुमचा हिरो वाचला!"

पाल: U R RITE झुरळ Handsome. आज माझ्याकडे पण बघुन एक मुलगी इतक्या जोरात ओरडली कि मीच घाबरले ना!

कुत्रा:"मला आज 17वा मुलगा झाला पण मला मुलगी पाहिजे होती But m happy"....

मच्छर:"I am HIV positive.. हे सगळ माझ्या हवरटपणामुळे झालय मला वेगवेगळ्या माणसांच रक्त प्यायला आवडायच"




डुक्कर:"Oh gosh या माणसांना काय म्हणाव gossips करतात कि flu पसरवतोय. मी इतका स्वच्छ राहणारा!!"

बकरी :"Friends, जास्त बाहेर फिरु नका, Eid जवळ आहे"

कोँबडी:"जर उद्या मी STATUS UPDATE केल नाहि तर FRIENDS समजुन जा मी KFC मधे शहिद झाले."
प्राण्यांच्या फेसबुकगिरीसाठी किती LIKES!
READ MORE - जर प्राणी पण FACEBOOK वर असते तर

Quote of greates - काही विचार यशवंतांचे

Friday, November 30, 2012

 



जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.

- नारायण मूर्ती

यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.

-- विश्‍वनाथन आनंद

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे.** *

-- धीरूभाई अंबानी

पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. *

-- जे. आर. डी. टाटा

फोटोग्राफरच्या एका "क्‍लिक'मुळे जगणे चिरकाल होते.** *

-- रघू राय

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.*

- बिल गेट्‌स

मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *

- कल्पना चावला

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.*

-- बराक ओबामा

माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.

-- आयझॅक न्यूटन

मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.

-- सर्वपल्ली राधाकृष्णन* 



READ MORE - Quote of greates - काही विचार यशवंतांचे

मोबाईल कंपनी आणि आपले जीवन ह्यांचे मिळते जुळते

Saturday, November 24, 2012




कॉलेज लाइफ रिलायंस की तरह है.
‘कर लो दुनिया मुट्ठी में’

बैचलर लाइफ एयरटेल की तरह.
‘ऐसी आजादी और कहां’
एंगेजमेंट के बाद आइडिया की तरह.

‘जो बदल दे आपकी जिंदगी’
शादी के बाद वोडाफोन की तरह
‘आप जहां भी जाएं, नेटवर्क हमेशा साथ’
बच्चे के बाद BSNL की तरह
‘सभी लाइनें व्यस्त हैं’
READ MORE - मोबाईल कंपनी आणि आपले जीवन ह्यांचे मिळते जुळते

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.लं. चे काही किस्से - Pu La Deshpande Part 3

Saturday, November 10, 2012

३८)
काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.

गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,
' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत

३९)
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,
' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !'
पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.
त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !

४०)
एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?
एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता.
तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... '
पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल.



४१)
एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.
४२)
एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं.
' हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ' अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.

४३)
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. '


४४)
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं. '
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?'
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात


४५)
अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले,
' चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज.
' चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते.
जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. '

चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !'


४६)

पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल ' हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !'

४७)
१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.

४८)
' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा .
त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !


४९)
'' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... ''

'' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?''

फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ...

बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा .


50)
एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले,
" ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? "
त्यावर पु ल लगेच म्हणाले,
" हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही. "

51)
एकदा शाळेत अर्ध-निद्रावस्थेत असताना गुरुजींनी पु.लं.ना दरडावून विचारले, "पुर्श्या! ओपोझिटचे स्पेलिंग सांग बघू..."
पु.ल. घाबरून उठत म्हणाले, "ओ डबल प्पो.."


52)

‘पूल ७५’ हे पुस्तक पुलंना अर्पण करण्याचा समारंभ होता. त्या वेळी अगोदर जयंत नारळीकर यांचे भाषण झाले. आपल्या भाषणाच्या सुरवातीला ते म्हणाले, ” बंधू भगिनीनो असे मी म्हणत नाही. कारण श्रोत्यांमध्ये माझी पत्नी आहे.


पुलंची बोलण्याची पाळी आली तेव्हा ते म्हणाले, “मला बंधू आणि बघिनी म्हनायाले काहीच अडचण नाही. माझी पत्नीच मला ‘भाई’ म्हणते!”

53)
दिल्लीच्या प्रकाशकांच्या सभेत पुलं म्हणाले होते, “कसायानी आपल्या सभेचे अध्यक्षपद एखाद्या गायीला द्यावे तसे वाटतेय.


54)
नाशिकला कॉलेजच्या स्नेहसंमेलनात केलेले धमाल भाषण. या भाषणात पुलं म्हणाले होते, ‘मी आज सकाळीच तुमच्या कॉलेजच्या मुलीला विचारले, तुम्हाला ज्ञानेश्वरांचे काय काय आहे? त्यावर ती म्हणाली, ‘ १० मार्कांचा ज्ञानेश्वर आहे’ मी पुढे विचारणार होतो कि, ‘माझे साहित्य किती आहे?” पण पहिल्या उत्तराने मला पहिला प्रश्न विचारण्याचा धीर झाला नाही. कारण द्यानेश्वारच १० मार्कांचा तर मला एक लक्षांश मार्क असेल कि नाही कोणास ठाऊक!”
याच भाषणात पालकांच्या अज्ञाना बद्दल पुलं म्हणाले, एखाद्या मुलाने जर म्हटले कि, ‘मी ‘अर्धमागधी घेतो’ कारण ते स्कॉरिंग आहे.’ तर पालक म्हणतात, मग ‘पूर्णमागधी’ का नाही घेत?’ अर्धमागधीच का घेतो?’ पालकांच्या (पूर्ण) अगाध ज्ञानावर याहून वेगळे भाष्य करण्याची काहीच गरज नाही.

55)
पु. ल. गेल्यावर आमचा कलकत्त्याचा समीक्षक मित्र शमिक बॅनर्जी पुण्यात आला होता त्याने ही आठवण सांगितली. पु. ल. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पाच वर्षे मानद उपाध्यक्ष होते. एका बैठकीनंतरच्या भोजनोत्तर मैफलीत एक प्रसिद्ध नाटककार खूप सात्विक संतापले होते. त्यांना न विचारता त्यांच्या नाटकांचे कोणी अन्य भाषेत प्रयोग केले होते. त्यामुळे कॉपीराईटचा भंग होतो असा प्रकार होता. त्यांची अनेकांनी समजूत घातली पण त्यांचा राग धुमसत होताच. वाद वाढल्यावर पु. ल. तेथे असलेली हार्मोनियम काढून म्हणाले, मी आता तुम्हाला माझा प्रयोग करुन दाखवतो. त्याचा मात्र कॉपीराईट कोणाकडे नाही. कोणीही हा प्रयोग गावोगाव कोणत्याही भाषेत करावा, असे म्हणून पु. लं.नी हार्मोनियम वाजवणे सुरु केले. जरा रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले. त्याला अर्थातच अभिनयाची जोड होती. पण एकही शब्द नव्हता. नंतर सर्वांच्या लक्षात येऊ लागले की आलापी आणि तानांमधून एक तरुण आपल्या प्रेयसीकडे प्रेमयाचना करतो आहे, तानांमधून ती तरुणी लाजते आहे. मग ताना मारीत त्यांचे प्रेम चालते. मग दोघांचे ताना आणि आलापीमधून लग्न होते. ताना मारीत बाळंतपण होते. मग भांडण... पुन्हा ताना... पुन्हा प्रेम जमते. ताना मारीत संसार फुलतो असा मामला पु. लं.नी एकही शब्द न उच्चारता केवळ ताना आणि आलापीमधून अर्धा तास जिवंत केला. समोरचे सगळे गडाबडा लोळायचे तेवढे राहिले होते. शमिक म्हणाला, 'कोणतीही तयारी, पूर्वसूचना नसताना हा माणूस इतका चोख परफॉर्मन्स देत असेल तर त्यांचे परफॉर्मन्स विषयीचे चिंतन किती परिपक्व असेल? ह्या माणसाभोवती महाराष्ट्राचे सांस्कृतिक जग केंद्रित का होते, ह्याचे जणू उत्तरच पु. लं.नी आम्हाला त्या अर्ध्या तासात दिले. '




READ MORE - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.लं. चे काही किस्से - Pu La Deshpande Part 3

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.लं. चे काही किस्से - Pu La Deshpande Part 2

Friday, November 9, 2012


१८)
एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी 'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे"

१९)
एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!"

२०)
एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या.
सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली
" अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?"
त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!"


२१)
पु.लं. चा वाढदिवस होता,
एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला.
पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.

हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"?

पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही"

घरात हशा पिकला होता !

२२)
एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की

माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.

माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.

तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?"

२३)
पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?"

२४)
एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली.

ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही."

पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल"

२५)
डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र.

"आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता."

२६)
स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे"

२७)
आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू ’उपदेश-पांडे’ आहेस."

२८)
भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!"

२९)
पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी?

३०)
पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही.

३१)
एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!"

३२)
पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून
उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले "अगदी
बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!"

३३)
'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.


३४)
पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग .
महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले.

३५)
एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु लं नि आशीर्वाद दिला .......
'कदम कदम बढाये जा'

३६)
सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।'

३७)
एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.

’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।"


READ MORE - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.लं. चे काही किस्से - Pu La Deshpande Part 2

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.लं. चे काही किस्से - Pu La Deshpande Part 1

Thursday, November 8, 2012

१)
त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

२)
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच
घाव घातला' .

३)
वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,
"हा मझा मित्र शरद तळवलकर"
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,
हा चांगलाच असणार!"
"हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.
"अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.
म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!"

४)
पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद

" मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा
आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे
भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा
मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज
खाली येतो की नाही बघ."

५)
पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा
र्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान
होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती.


त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती.
शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं,
की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला.

त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही."
तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला,
"पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं.

६)
एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.
बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार".

ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.
"तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?"

७)
पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात.
'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती.
समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते.
मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं
ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये."

८)
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!"

९)
माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका.
एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.
हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?"
लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या.
ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!"

१०)
कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.

११)
एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!"


१२)
नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा. कयाssssळs!'

१३)
हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.'

१४)
साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले.

१५)
कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली.

१६)
'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल.

१७)
एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!!





READ MORE - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.लं. चे काही किस्से - Pu La Deshpande Part 1

लव यु पुणे

Wednesday, October 31, 2012





लव यु पुणे

वो गर्मियो कि शाम,
वो लक्ष्मी रोड का ट्राफिक जाम,
वो खडकवासला कि हवा,
वो बी जे मेडिकल कि दवा,
वो सर्दियो कि ठंडक,
वो क्लासरूम का मजा,
वो चितळे कि बाकरवडी,
वो तुळशी बाग मे शॉपिंग,
वो लेट रात कि पढाई,
वो चाचा हलवाई कि मिठाई,
वो डेक्कन कि कच्ची दाबेली,
वो के एन पी कि कॅड बी,
वो जोशी का वडा पाव,
वो रूपाली कि चाय,
वो Z ब्रिज के नजारे,
वो F C कि सडके जहा दिल है धडके,
वो A BC कि किताबे,
वो दगडूशेठ का मंदिर,
वो सारस बाग कि भेल,
वो मस्ती कि बाते
ऐसी है कूच पुणे कि यादे
READ MORE - लव यु पुणे

◀◀◀◀ सर्वसामान्य माणूस ▶▶▶▶

Tuesday, October 23, 2012





सुख शोधणारा.... पण नशीब साथीला नाही म्हणून.... छोट्या छोट्या गोष्टीत सुख मानणारा.... ...

१)आज बसमध्ये/ ट्रेनमध्ये खिडकी कडची सीट मिळाली
२)अरे,आज ट्राफिक नव्हतं....
३)आज भाजीवाल्याने १ रुपया कमी घेतला...५ ची जुडी ४ लाच दिली.

४)आज ट्रेनला गर्दी नव्हती.
५)आज रस्त्यात फेरीवाले नव्हते.
६)आज strike नाही झाला कोणताच.
७)आज नळाला पाणी आले.....आणि ते पण खूप...
८)आज दिवसभरात एकदा पण लाईट नाही गेली
९)आज दुधवाला वेळेवर आला.
१०)आज ७:३० ची ट्रेन डॉट टाईमवर आली.
रात्री थकून जमिनीवर पाठ टेकवणारा सर्वसामान्य माणूस....
१)Mall मध्ये फक्त फिरायला जाणारा...आणि किंमती पाहून हताश होणारा...
२)हॉटेल चे मेनू कार्ड उजव्या बाजूच्या किमती पासून वाचायला सुरुवात करणारा आणि शेवटी वडापाव 7RS /- वर येऊन थांबणारा
३)दिवाळी,गणपती खूप साजरे करण्याची इच्छा असणारा पण.... सण संपल्यावर खाली होणाऱ्या खिश्याचे Tension असणारा... .
४)२ रुपयाची कटिंग चहा पण आनंदाने पिणारा....
¦¦¦¦¦¦एक एकटा एकटाच.¦¦¦¦¦¦ सर्वसामान्य माणूस.... आणि अंथरुणात पडल्यावर दिवसभराच्या खर्चाचे आणि दु:खांचा हिशोब करणारा सर्वसामान्य माणूस.... "सर्वसामान्य माणूस....सर्वसामान्य असून हि असामान्य असा सर्वसामान्य माणूस....!
READ MORE - ◀◀◀◀ सर्वसामान्य माणूस ▶▶▶▶

आंधळा भिकारी आणि लेखक !

Thursday, September 6, 2012




एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला... त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही... तो एव्हढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत.... गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.
.
.
एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला...
.
.
.
खिचात दमडादेखील नसतांना तो लेखक फिरायला बाहेर पडतो.
.
.
त्याची नजर त्या भिका-याकडे आणी त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.
.
.
त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले.
.
.
हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो..
.
.
"मित्रा, मी एक लेखक आहे,ज्याच्याकडे एक दमडादेखील नाही, पण माझ्याकडे  कला आहे,...माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे.. ती मी तुला देउ शकतो...तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?"
.
.
"साहेब" भिकारी म्हणतो " माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही ...मी एक गरीब आंधळा भिकारी ...तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा."
.
.
तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो.
.
.
त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापूढ्यात पैसे टाकू लागलाय.
.
.
थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते...
.
.
तो भिकारी बेचैन होतो...नाण्यांची रास वाढतच जाते...
.
.
तो एव्हढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-यांपैकी एकचा हात पकडतो आणि म्हणतो " साहेब माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल ... मी एक गरीब आंधळा भिकारी आहे...मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील."
.
.
तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो...
.
.
.
.
"वसंत ऋतू, बहरलेली सृष्टी, आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."
.
.
.
.
भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.
.
.
.
आयुष्य कुणी जास्त जाणलं?

या ओळी लिहीणा-या लेखकानं? त्या ओळी वाचून पैसे टाकणा-या लोकांनी? कि इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं??
READ MORE - आंधळा भिकारी आणि लेखक !

पुणे बॉम्बस्फ़ोटावर विविध लोकांच्या मनात आणि ओठात काय असेल त्याची एक झलक (Pune Bomb Blast)

Friday, August 24, 2012
मिडिया: (ओठात)ब्रेकिंग न्युज.पुण्यात दहशतवादी हल्ला
(मनात)चला दोन दिवस बातम्या शोधण्याचा त्रास नाही.
------------------------------------------------------------------
पोलिस:(ओठात)कृपया काळजी करु नये परिस्थीती नियंत्रणाखाली आहे.
(मनात)बोंबला,आता आठवडाभर डे,नाईट ड्युटी...या अतिरेक्यांच्या आयला *****
------------------------
-----------------------------------------------------
पुढारी:(ओठात)जखमींना ५ कोटी आणि मृतांना ५० कोटी सरकारी मदत जाहिर करण्यात येत आहे.(मनात)आहे त्या योजनांवर खर्च करायला पैसा नाही आणि यांना कुठुन पैसे द्यायचे,असो बोलायला काय जातयं,बाकी माझा बाईट ओके झाला,****ची जळुन लाल झाली असेल
------------------------------------------------------------------
स्वयंसेवी संस्था : (ओठात)पुण्याला शांततेचा ईतिहास आहे कृपया समाजात दुही माजवु नये असे आवाहन.
(मनात) दोन दिवसांनी मेणबत्ती मोर्चा काढुन त्याचे फ़ोटो पेपरात कसे छापुन येतिल ते पाहिल पाहिजे.साला तो ****चा बातमीदार बातमी लावायला आजकाल खुप पैसे मागतो
----------------------------------------------------------------------
हिंदु नागरिक:(ओठात)दहशतवाद्यांना जात नसते त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे.
(मनात)च्यामायला हे मुसलमान खुप माजलेत,साल्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत
---------------------------------------------------------------------
मुस्लिम नागरिक:(ओठात)हम अमन और शांती कायम रखने के लिये दुआ करते है
(मनात)साले हिंदु इस बात का मुद्दा उठाकर अब हमारी ठासने को देखेंगे पर हम भी कच्ची गोलियों से नही खेलते.
-------------------------------------------------------------
आणि शेवटी या भारताचा गरिब आणि आम नागरीक काय म्हणतो ते पाहु
घरातुन निघताना हा कच्च्या बच्च्यांना पाहुन घेतो,पत्नीला उद्देशुन :(ओठात) येतो गं.................
(मनात)जातोय ,.....पण सुखरुप परत आलो तर तुमचा.......................
READ MORE - पुणे बॉम्बस्फ़ोटावर विविध लोकांच्या मनात आणि ओठात काय असेल त्याची एक झलक (Pune Bomb Blast)

सम्पूर्ण जन-गण-मन आपले राष्ट्रगीत Complete Jana Gana Mana

Wednesday, August 15, 2012


आपण फक्त एक कडवे गातो पण खरे तर जन गण मन आहे ५ कडव्यांचे .. चला माहिती करून घेऊ

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे


अहरह तव आह्वान प्रचारित
शुनि तव उदार वाणी
हिन्दु बौद्ध शिख जैन
पारसिक मुसलमान खृष्टानी
पूरब पश्चिम आशे
तव सिंहासन पाशे
प्रेमहार हय गाँथा
जन गण ऐक्य विधायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे

पतन-अभ्युदय-बन्धुर-पंथा
युगयुग धावित यात्री,
हे चिर-सारथी,
तव रथचक्रे मुखरित पथ दिन-रात्रि
दारुण विप्लव-माझे
तव शंखध्वनि बाजे,
संकट-दुख-त्राता,
जन-गण-पथ-परिचायक जय हे
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे

घोर-तिमिर-घन-निविड़-निशीथे
पीड़ित मुर्च्छित-देशे
जाग्रत छिल तव अविचल मंगल
नत-नयने अनिमेष
दुःस्वप्ने आतंके
रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमि माता,
जन-गण-दुखत्रायक जय हे
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे
रात्रि प्रभातिल उदिल रविछवि
पूर्व-उदय-गिरि-भाले,
गाहे विहन्गम, पुण्य समीरण
नव-जीवन-रस ढाले,
तव करुणारुण-रागे
निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा,
जय जय जय हे, जय राजेश्वर,
भारत-भाग्य-विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे

- रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर)


READ MORE - सम्पूर्ण जन-गण-मन आपले राष्ट्रगीत Complete Jana Gana Mana

दहीहंडी उत्सव - एक थरार

Saturday, August 11, 2012


'वरच्या थरावरील व्यक्ती ऐवजी आपण स्वतः उभे आहे अशी कल्पना करा मग तुम्हाला जाणवेल दही हंडीचा थरार म्हणजे काय ..!'
'वरच्या थरावरील व्यक्ती ऐवजी आपण स्वतः उभे आहे अशी कल्पना करा मग तुम्हाला जाणवेल दही हंडीचा थरार म्हणजे काय ..!'
दहीहंडी हा असा उत्सव आहे .. ज्याचा थरार,रोमांच हा जगातील अनेक उत्सवान पेक्षा खूप पटीने अधिक आहे असे मला वाटते ..
जर ह्या उत्सवाला योग्य प्रसिद्धी मिळाली तर नक्कीच हा जग भर लोकप्रिय होऊ शकतो आणि काही अंशी होत पण आहे ..
फक्त युवक युवतीच नाही तर अनेक वयोवृद्ध महिला पण आपल्या कडे दहीहंडी साजरी करता ..
अनेक महिने दही हंडी साठी घेतले जाणारे प्रशिक्षण .. त्यासाठी घडणारी पथके आणि त्याचे केले जाणारे सूत्र संचालन सर्व काही नोंद घेण्यासारखे आहे ..
युरोपात काय साधे टमाटे फेकण्याचा उत्सव होतो तर त्याला जग भरातून लोक जातात ..
त्यामानाने आपले दही हंडी सारखे सण तर अनेक प्रकारे जास्त रोमांचित आहे ..
ह्या उत्सवाचे व्यापारीकरण,राजकीयीकरण झाले अशी टीका होते पण माझ्या मते त्यानेच हा उत्सव जिवंत आहे ..
आता ह्याला सुदैव म्हणायचे का दुर्दैव हा वेगळा मुद्दा आहे पण
कृष्णजन्म जरी मथुरेला झाला तरी त्याचा थरार आहे तो महाराष्ट्रातच ..

This information is taken from Faceboook page असाच एकजण 
READ MORE - दहीहंडी उत्सव - एक थरार

महाराष्ट्रातील धबधबे आणि पिकनिक स्पॉट.. Tourist Spot in Maharashtra

Friday, August 3, 2012


पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. रिमझिम बरसलेल्या
पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे.
कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही
औरच असते. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यांसारख्या गजबजलेल्या
ठिकाणांबरोबरचं जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू झालीये.
- भिवपुरी - माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण मुंब
ईपासून अगदी हाकेच्या
अंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ हॉटेल्स आहेत. गावकर्यांना
सांगितल्यास ते जेवणाची सोय करतात.
- चिंचोटी - इथे पोहोचताना हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या
मार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतील.मुख्य धबधब्याजवळ पोहचायला
सुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर ‘कामन’ जंक्शनजवळ हे
ठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जावे
लागते.
- तुंगारेश्वर - नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो.
मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी
डोंगरावर कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही.
- रांधा फॉल - सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा
धबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरीजवळ
असलेल्या विल्सन डॅमजवळ हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय
नसली तरी इगतपुरीजवळ जेवणाची व्यवस्था होते.
- पांडवकडा - खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा गेल्या दहा वर्षांंत
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या लीस्टमध्ये अग्रभागी आहे. या
धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असली तरी अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट
देतात. आजूबाजूच्या डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत
असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.
- झेनिथ - खोपोली शहरापासून २ किमीवर असलेल्या झेनिथ धबधब्याच्या
पाण्याचा फोर्स खूप आहे, पण तरीही तरुणाईला पिकनिकसाठी झेनिथला जाण्याचा
मोह काही आवरत नाही.म्हणूनच शनिवारी-रविवारी या धबधब्यावर मोठी गर्दी होत
असते. इथल्या प्रत्येक कोपर्यावर पंजाबी धाबे आहेत.
- पळसदरी - मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि
पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे.
रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते.
जेवणाची सोय या ठिकाणी होते.
- गाढेश्वर - पनवेल तालुक्यात पावसाळी गर्दी गाढेश्वर नदीकाठी पाहायला
मिळते. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून
येतात.
- फणसाड धबधबा - फणसाड अभयारण्यामधील या धबधब्यात चिंब होणं म्हणजे एक
रोमहर्षक अनुभव आहे. या धबधब्यात सचैल स्नानानंतर अभयारण्यात पक्ष्यांचा
किलबिलाट आणि झाडांची हिरवाई पाहण्यात एक वेगळा आनंद आहे.
- सवतकडा - मुरुड-जंजिरापासून ११ किमी अंतरावरील सवतकडा धबधबा पर्यटकांनी
शोधून काढला आहे. मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील शिघ्रे गावातून सवतकड्याची
पाऊलवाट जाते. या पाऊलवाटेवरून जाण्याचा थरार अविस्मरणीय आहे. जवळपास
खाण्याची सोय नाही.
- गवळीदेव - नवी मुंबईतील घणसोली गावाजवळ असणारा गवळीदेव धबधबाही
आसपासच्या पर्यटकांना खुणावत आहे. शहराच्या इतक्या जवळ असूनही हा धबधबा
आणि गवळीदेव डोंगर अनेक मूलभूत सोयीसुविधांपासूून वंचित आहे.
- कोंडेश्वर - बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे.
इथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध
आहेत. कुंडात डोह असून त्यात कपार्या असल्याने येथे पाण्यात उतरताना
पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.
- भगीरथ - वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण
ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट
आहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही.
- टपालवाडी - नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्या
आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ यथेच्छ पोहण्यासाठी छान डोह असणारा एक धबधबा
आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांपैकीच कुणीतरी ‘टपालवाडीचा धबधबा’ असे
त्याचे नाव ठेवले आहे. ठिकाण अतिशय निसर्गरम्य असले तरी येथे जेवण तसेच
कोणतेही खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था नाही.
- आषाणे - भिवपुरी-कर्जतदरम्यान भिवपुरीपासून पाच किमीवर असणार्या आषाणे
गावाजवळील धबधबा हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी
भिवपुरीपासून रिक्षा मिळते. आषाणे ग्रामस्थ पर्यटकांना मागणीनुसार जेवण
करून देतात.
- थिदबीचा धबधबा - पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात
खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. कल्याण-माळशेज रस्त्यावर
घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावापासून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी.
कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल.
- निवळी - निवळी घाट चढताना पर्यटकांना आकर्षित करतो तो हिरव्या दाट
झाडीतून कोसळणारा धबधबा. निवळी धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी
घाटातच पर्यटकांसाठी खास पॉइंट तयार करण्यात आला आहे. ज्या पर्यटकांना
प्रत्यक्ष धबधब्याजवळ जायचे असेल त्यांच्यासाठी पायर्यांचा मार्ग तयार
करण्यात आला आहे.

- मोहिली धबधबा - कर्जतपासून ६ ते ७ किमीवर उल्हास नदी पार करून मोहिलीत
प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई असे नयनरम्य
दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं, असे वाटते. धबधब्याजवळ थंड वातावरणात गरम
गरम वाफाळता चहा आणि मक्याची कणसे खाण्याची मजाच काही औरच आहे.
लोणावळ्याचे भुशी धरण,त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी
पावसाळ्यात बरेच पर्यटक जातात. इथून जवळच असलेला कोरीगड, तैलबैला,घनगड,
कैलासगड इत्यादीसारख्या किल्ल्यांना पावसाळ्यात भेट देण म्हणजे काही औरच
मजा आहे. लोणावळ्याजवळील कार्ला-भाजे लेण्या, लोहगड,विसापूर, राजमाची,
तुंग,तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच
रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो. हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी
धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे
धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल दर्याचा देखावा एक
अविस्मरणीय आनंद देतो.
- माळशेजघाटाआधी मुरबाडजवळ असणारा पळूचा धबधबा हे एक उत्तम स्थळ आहे.
याच्यामागे असणारी भीमाशंकरची डोंगररांग पावसाळ्यात विलोभनीय दिसते आणि
त्याचबरोबर आपण गोरखगड, सिद्धगड, मच्छिंद्रगड इत्यादी एक दिवसाचे
ट्रेकसुद्धा करू शकतो.
- ठाणे जिल्ह्यातील जव्हार म्हणजे डोंगरदर्या, असंख्य धबधबे, दूरवर
पसरलेली भातशेती, यांनी नटलेले छोटेसे हिल स्टेशन. इथला हनुमान टेकडी,
शिर्पा माळ, दाभोसा धबधबा ठिकाण पाहण्यासारखा आहे. कसारा घाटाअलीकडे
बळवंतगड हा छोटासा किल्लादेखील पाहण्यासारखा आहे.
- नाशिक त्र्यंबकेेशर परिसरात असणारे कावनई, गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर,
बसगड, अंजनेरी इत्यादीसारख्या बर्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते.
- ठाणे-नाशिक महामार्गावर आटगावहून तानसा आणि याच भातसा धारणाकडे जाणारा
रस्ता आहे. इथेदेखील एक दिवसीय पावसाळी सहलीला जाता येईल. कळसुबाई,
भंडारदरा आणि रंध धबधब्याला पावसाळ्यात भेट द्या. इथले अमृतेेशर मंदिर
आवर्जून पाहण्यासारखं आहे. साम्रात गावाजवळील सांधण दरी अप्रतिम आहे.
रतनगड किल्लादेखील याच परिसरात असून अनेक मंडळी रतनगड ते हरिश्चंद्रगड
असा ट्रेकदेखील करतात.
- धुळे-नंदुरबार इथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच
आहे.इथले जंगल, डोंगर, दर्या, पक्षी, रंगीबेरंगी फुले आपले मन प्रसन्न
करून टाकतील यात वादच नाही.
- नाशिकच्या पुढेच असणार्या चाळीसगावाजवळील पावणादेवी आणि त्या परिसरातील
जंगल हे पावसाळ्यात पर्यटनाचे आणखी काही पर्याय ठरू शकतात. इथे असलेला
कण्हेरगड किल्ला आणि केदारेेश्वर धबधबा पाहण्यासारखा आहे.
- चिखलदरा हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासीयांचे आवडते ठिकाण.
इथे असणारा गाविलगड किल्ला, किचकदरा यासारखी बरीच ठिकाणं पाहण्यासारखी
आहेत.चिखलदर्याहून जवळच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला नक्की भेट द्या.
- सातारा जिल्ह्यातलं कासचे पठार म्हणजे महाराष्ट्रातील व्हॅली ऑफ
फ्लॉवर्स. साधारण सप्टेंबर महिन्यात या पठारावर असंख्य विविधरंगी फुले
फुलतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक इथे भेट देतात.
कासबरोबरच सातार्याजवळ नदीकिनारी आणि जुन्या मंदिरांचा समूह असणार्या
माहुली तसेच अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा पाहण्यासारखा आहे.
सातारहून ८ कि.मी. असणार्या कण्हेर धरणाला सुद्धा भेट देता येईल.
- ट्रेकर्सनी पन्हाळगड ते विशाळगड हा पावसाळी ट्रेक नक्की करावा. मसाईचे
विस्तीर्ण पठार, शेती, जंगल, ओढे, नदी, नाले, छोटी छोटी गावे अशा
ठिकाणांहून हा ट्रेक पूर्ण होतो.
- पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणार्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटा
लगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येईल. डोंगरातून वाहणारे छोटे मोठे झरे,
धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारं छोटंसं गाव, आणि त्या
गावालगत वाहणारी नदी असे वेड लावणारं सौंदर्य वरंधाघाटात आहे. वरंधा घाट
उतरल्यावर शिवथरघळ इथली गुहा आणि त्या गुहेबाहेर पडणारा पाऊस, धबधबा
म्हणजे क्या बात!
- रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळील सुकेळी खिंडीजवळ खांबगाव नजीक सुरगड
किल्ल्याला देखील भेट देणं छान वाटेल. मुंबईहून महाडकडे जाताना याच
सुकेळी खिंडीपासून पायवाटेने साधारण २० मिनिटांनंतर एक उंच धबधबा दिसतो.
त्या धबधब्याचं पाणी आणि नदी हे एक अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे.
- रायगड जिल्ह्यात खोपोली पाली रस्त्यालगत दुरशेत गावाआधी उंबरखिंड हे
स्थान आहे. खंडाळ्याच्या डोंगरातून पडणारे पाणी उंबरखिंडीत येते आणि
नदीमार्गे कोकणात जाते.दुरशेतहून पुढे जांभूळपाड्यामार्गे भेलीव
गावालगतचा मृगगड हा किल्ला आणि त्याकडे जाणारा नदीलगतचा मार्गही
पर्यटकांना भुरळ पाडतो. गणपतीच्या पाली गावाआधी ठाणाळे हा लेणी समूह आणि
त्याच्या आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात आपले विलोभनीय रूप दाखवतो. पाली
गावालगतच सरसगड हा किल्ला आहे, आणि तेथून पुढे असणारा सुधागड किल्ल्याला
देखील पावसाळ्यात भेट देणं मस्तच.
READ MORE - महाराष्ट्रातील धबधबे आणि पिकनिक स्पॉट.. Tourist Spot in Maharashtra

आज नारळी पौर्णिमा - माहिती आणि महत्व (Narali paurnimechi mahiti aani mahatv)

Wednesday, August 1, 2012

सण, उत्सव व व्रते यांच्यामागचे शास्त्र लक्षात घेऊन श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे, पण तो पाळला जात नाही; म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रतांच्या दिवशी तरी तो पाळला जावा, म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. कर्मकांडाच्या दृष्टीने सण, धार्मिक उत्सव व व्
रते इतकी महत्त्वाची आहेत की, वर्षातील जवळजवळ ७५ टक्के तिथींना यांपैकी काही ना काही असतेच. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रतांचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणार्‍या सण, धार्मिक उत्सव व व्रतांमध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो.
नारळी पौर्णिमेला करण्यात येणारे वरूणदेवतेचे पूजन
पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण का करावा ?
(नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असल्याने व नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्याने जलावर ताबा मिळवणार्‍या सागररूपी वरुणदेवतेला नारळ अर्पण करतात.) या दिवशी ब्रह्मांडात आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवर्‍याप्रमाणे गतिमान असतात. वरूणदेवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्त्वाचे प्रमाण जास्त असणार्‍या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते; म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते. यमलहरींच्या वातावरणातील अधिक्यामुळे शरीरात अधोगामी वहाणारे वायु कार्यरत् झाल्याने पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक लहरी पटकन जिवाच्या तळपायाकडे आकृष्ट झाल्याने त्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
समुद्राला नारळ `अर्पण' कसा कराल ?
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा ! नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. ते करतांना काही जण नारळ पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; म्हणून तो भावपूर्णपणे हळुवार पाण्यात सोडावा.
READ MORE - आज नारळी पौर्णिमा - माहिती आणि महत्व (Narali paurnimechi mahiti aani mahatv)