१. शरद पवार ह्यांची UNO च्या अध्यक्ष पदी निवड.UN च्या कामकाजात पारदर्शकता आणण्याचा विचार.
IPL ३० मध्ये UN ची टीम खेळवण्याचा प्रस्ताव.
२. ज्येष्ठ राज्यकर्ते अबू असीम आझमी ह्यांना भारताचे राष्ट्रपती बनण्याची ऑफर
३. विख्यात अतिरेकी दावूद इब्राहीम ला अतिरेकी कारभारात उत्कृष्ट कामगिरी साठी पद्म विभूषण जाहीर !! वयोमानाने स्वास्थ्य बिघड्ल्याने पुरस्कार त्यांच्याघरी सुपूर्त .
४. प्रियंका गांधी - वढेरा ह्या कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षा बनल्या .
५. लाल कृष्ण अडवानींचा १०६ वा वाढदिवस साजरा ,पुढल्या निवडणुका जिंकून पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा कायम .
६. कारागृहाधीराज भारत मान्य उच्च अतिथी श्रीमंत. अजमलआमीर कसाब ह्यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात
साजरा,त्याच बरोबर त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार निशान-ए-हैदर प्रदान करण्यात आला !!
हा पुरस्कार स्वीकारताना कसाब ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले " मी भारताचा ऋणी आहे.गेली पंचवीस वर्ष जे प्रेम,भारतीय सरकार ने आणि पोलिसांनी मला दिले त्या बद्दल
मी त्यांचा आभारी आहे.हे जेल म्हणजे माझे जणू माहेरघरच आहे .मला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्याची भारतीय सरकार नि गेली पंचवीस वर्ष काळजी घेतली आहे.माझ्या सर्व
पाकिस्तानी मित्रांना माझे एकच आवाहन आहे कि तुम्ही पाकिस्तानचा नाद सोडा आणि भारता कडे लक्ष द्या.इथली माणसे खूप चांगली आहेत.इथे फार छान पाहुणचार केला जातो.अतिथी देवो भव: हे जणू ह्या जेल चं ब्रीद वाक्यच आहे.श्रीमंत आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी भारतीय जेल ची स्वारी करा,तिकडे इस्लामाबाद मध्ये खिटपत बसू नका.परत एकदा मी भारतीय
न्यायव्यवस्था आणि सरकार ह्यांचे आभार मानतो आणि आपले भाषणइथेच संपवतो,पण फक्त एकच तक्रार आहे,ती म्हणजे माझ्या रूम चा AC बिघडला आहे ,तो जरा दुरुस्त करून
द्यावा ,धन्यवाद !!"
७. काश्मीर प्रश्न हा चर्चेतून सोडवू असे आश्वासन पंत प्रधानांनी आज दिल्लीत दिलं. खेळ संबंधित बातम्या
८. सचिन तेंडूलकर ला भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी;परंतु घटनेत खेळ कारकिर्दीला ह्या पुरस्कारासाठी अद्याप सोय
नाही,त्या साठी नियमबदलावे लागतील !!
९. पुढल्या वर्षी होणारा क्रिकेट विश्व चषक हा सचिन चा शेवटचा विश्व चषक असेल असे तर्क मांडले जात आहेत . ह्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर
काही ज्योतिषी चक्कर येऊन पडले,तर निवृत्त होण्याचा विचार अद्याप मनात आला नाही असे मास्टरब्लास्टर चे मत.
१०. ग्रेग चाप्पेल ह्यांचे आज त्यांच्या निवास्थानी हृदय विकाराने दुखद निधन.हृदय विकाराचे कारण कदाचित स्वप्नात भारतीय टीम आली असावी असे
वर्तविले जात आहे.
११. भारताचे माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंघ च्या दोन्ही कुत्र्यांचे स्वास्थ्य खालावले, त्यांना पाहण्यास काल रात्री symonds आणि ponting पोहचले.
१२. विक्रम गोखलेंनीवयाच्या ८५ व्या वर्षी सर्वात जलध एका तासात ३० शब्द बोलण्याचा विश्व विक्रम केला....त्यांचे मनोगत रेकॉर्ड करून रिमिक्स केल्यानंतरच
प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ...त्यांचे मनोगत हे २०० शब्दांचे आहे ...
१३. जेष्ठ सूत्र संचालिका पल्लवी जोशी ह्यांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड.त्यांच्या साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!
१४. चार दिवस सासूचे ह्या मालिकेचा ५०००० वा प्रयोग प्रदर्शित .. देशमुख घराण्यातील सर्व मंडळी ठणठणित असून पुढली १० वर्ष कोणाच्याही जीवाला धोका नसल्याचे
दिग्दर्शकाने सांगितले आहे.
१५. सलमान खान साठी मुली शोधण्यासाठी आरंभ झालेला आहे..पुढल्या ५ एक वर्षात त्याचे लग्न करण्याचे त्याच्या घरच्यांनी योजिले आहे.
आजच्या बातम्या इथेच समाप्त पुन्हा भेटूया १० वर्षांनंतर - बातमीदार कोण आहे ते माहित नाही.