“प्रपोज केल्यानंतर ” मुलीकडून साधारणता “कोणती उत्तरे”मिळू शकतात त्याबद्दल काही….

Monday, December 31, 2012


{"type":1,"tn":"K"}">
१. नाही SSSSSSS

२. शी………!!!!!! किती घाणेरडे
विचार आहेत तुझे ?

३. मी तर तुला ‘तसल्या नजरेने’ पाहिलेच… नाही … मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] मित्र मानते …

४. मी “ऑलरेडी एंगेज” आहे.

५. प्लीज, माझा असल्या”फालतू गोष्टींवर” विश्वास
नाही. माझ्यासाठी माझे ‘शिक्षण, करियर व कुटुंबिय’
महत्त्वाचे आहेत….

६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे
कदाचित “आकर्षण” असावे …

७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?

८. मागच्या वर्षीच तर मी तुला “राखी” बांधली होती !!!!

९. माझी अशा गोष्टींसाठ ी अजून ‘मानसीक तयारी’ झाली नाही ….

१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ….

११. मुर्ख माणसा….. …..,एवढी छोटीशी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?

१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ….

१३. सॉरी ….

१४.”आरश्या त तोंड बघ मेल्या … म्हणे तू मला आवडतेस !!!”

१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ] १६. होय, मला पण तू आवडतोस ,पण तू
माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?

१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरी चांगले "गाढव" सापडले ]

१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ….

१९. नालायका , तुझी हिंम्मतकशी झाली मला असे विचारायची ?” [ त्यानंतर कदाचित एक छानशी कानफाडीत ...]

२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे … तो :नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....] ती : ७ जन्म ….
[ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]

२१. नीच माणसा….. …………….तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?”

२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ….

२३. हा हा….हा हा हा…. हा हाहा हाही ही … ही ही ही … ही ही ही ही

२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचारनाही….



२५. मातीत जा … मला त्याची पर्वा नाही ….

२६. तु माझ्यासाठी काय करू शकशील ?

२७. मी कितवी आहे? हा हा हा….

२८. मी तुझ्याबद्द ल “तसला विचार’ कधी केलाच नाही …

२९. माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल….

३०. का ??? “स्वाती” नाही म्हणली का?

३१. पण तू तर “सपनाच्या” मागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?

३२. किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?

३३. “जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक, माझी जाण्याची वेळ झाली आहे…”

३४. कित्तीSSSS छान ….

३५. पुढच्या ४ महिन्यांची ‘वेटिंग लिस्ट ‘ पण फुल्ल आहे …

३६. क्काय SSSSS

३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ….

३८. मला वाटतयं कदाचित मी”एंगेज” असेन …

३९. माझ्याकडे तुझ्यापेक् षा जास्त चांगले “ऑप्शन” आहेत…

४०. मला ह्या गोष्टीबद्द ल काहिएक बोलायची इच्छा नाही. त्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते …..

४१. माझ्या “बॉयफ्रेंड ला” कळले तर तुला त्रास होईल कारण तो खूप तापट आहे …

४२. खरेतर माझ्या ‘चुलत बहिणीला’ तू खूप आवडतोस म्हणून मग …..

४३. माझ्या आईला तुझे वागणे, बोलणे, चालणे आवडणार नाही ………

४४. नाईस जोक …

४५. सन्नकन एक कानाखाली [ शब्दापेक्ष ा कृती अधिक बोलकी ...]

४६. हाहाहा … मला वाटलं नव्हत की तू येवढा चालू निघशीलं …..

४७. “काय पाहिलसं माझ्यात?????”

READ MORE - “प्रपोज केल्यानंतर ” मुलीकडून साधारणता “कोणती उत्तरे”मिळू शकतात त्याबद्दल काही….

चालू बाई भोला हवालदार - मराठी ठसका

Friday, December 28, 2012



एकदा एक बाई पोलिस स्टेशन मध्ये कम्प्लेट करायला जाते.

बाई : अहो साहेब माझा नवरा हरवला आहे हो..
(एवढ बोलून बाई रडायला लागते)

पोलिस : त्यांची उंची काय आहे ?

बाई : नाही हो माहिती नाही कधी मोजली नाही.

पोलिस : बर.. काटकुळे आहेत कि जाडे आहेत ?



बाई : जाडे ? काटकुळे ? नाही हो ते सुद्धा माहिती नाही ...

पोलिस : बर डोळ्यांचा कलर काय आहे ?

बाई : नाही हो खरच नाही माहिती ..

पोलिस : बर डोक्याच्या केसांचा कलर ?

बाई : कलर नेहेमी बदलत असतो हो आत्ताचा नाही माहिती ..

पोलिस : त्यांनी कोणती कपडे घातली आहेत हे ?

बाई : काही माहिती नाही हो... पण कृपा करून शोधा त्यांना

पोलिस : अहो बाई बर मला सांगा त्यांच्या बरोबर अजून कोणी होत का ?

बाई : हो आहे ना माझा कुत्रा आहे त्यांच्या सोबत. कलर पांढरा त्यावर काळे
ठिपके आहेत. डोळे अगदी काळे काळे आहेत. डोळ्यांच्या माध्येभागी कि
नाही एक लाल असा ठिपका आहे हो, गळ्यात चोकलेटी पट्टा आह.
आणि एक कि नाही तो भुंकत नाही हो कोणावर.
त्याची उंची कि नाही जेमतेम उभी मोजली तर १ फुट आणि अडवा ३फुट आहे.
त्याला नॉन वेज खूप आवडत, तस आम्ही सोबतच जेवत असतो हो.
एवढ बोलून ती बाई अजून रडायला लागते.

पोलिस (डोळ्यात आसव आणून ) : हवालदार तोंडे पहिलं त्या कुत्र्याला शोधा


READ MORE - चालू बाई भोला हवालदार - मराठी ठसका

आठवीतील मुलाने त्याच्या गर्लफ्रेँन्डसाठी लिहलेले लव्ह लेटर Love Letter

Wednesday, December 26, 2012





प्रिय. निशा. . . . .
.
लव्ह लेटर पाठवण्यास
कारण
की ?
.
मला तु खुप आवडतेस..
तु पण माझ्याकडे सारखी बघत
असतेस..
.
म्हणुन मला वाटतंय,
मी पण तुला आवडतो..
.
मी जर तुला आवडत असेन
तर,
मला गणिताच्या पेपरला मदत कर..
.
तु डोक्यात लाल रिबीन लावत नको
जाऊ,
तुझ्या मागं मंदाकिनी बसते
ना..
.
ती तुझ्या रिबीन वर पेनची शाई
सोडते,
मला तिचा खुप राग येतो..
.
ती माझ्या घराशेजारीचं राहते,
शाईचा बदला घ्यायचा
म्हणुन
मी..
.
तिच्या घराची बेल वाजवुन पळुन
जातो..
.
तु फेअर अँन्ड लव्हली लावत
जा,
आणखी गोरी होशील..
.
तुझ्या शेजारी बसणारी शीतल
आणि सोनाली दोघीही,
तुझ्यापेक्षा जास्त गो-या
आहेत..
.
पण त्या मला आवडत नाही..
पत्राचा राग आल्यास मला परत दे..
.
सरांना देऊ नकोस......

तुझा प्रियकर...:p:p:p बंड्या


READ MORE - आठवीतील मुलाने त्याच्या गर्लफ्रेँन्डसाठी लिहलेले लव्ह लेटर Love Letter

खान्देशी अहिराणी नवरा बायको तडका

Monday, December 17, 2012




नवरा: आज खावाले काय बनाडस ?
बायको: तुम्ही सांगश्यात ते.
नवरा: खिचडी बनाड.
बायको: रातनी अजून पडेल शे.
नवरा: मंग बट्ट बनाड
बायको: पोऱ्या तोंड नाही लावस
नवरा: बोंबील शेत का ?
बायको: सोमवार न इसड नको
नवरा: वरण चीकल्या बनाडस
बायको: रात ना खातस का काही भी


नवरा: नाहीतर मंग उडीद नि दाय बनाडस
बायको: तुमन पोट गरबा धरस
नवरा: कडी बनाडस
बायको: दही नही शे
नवरा: मंग काय बनाडस ?
बायको: तुम्ही सांगश्यात ते.
READ MORE - खान्देशी अहिराणी नवरा बायको तडका

कॉल सेंटर आणि भयानक ग्राहक

Thursday, December 13, 2012


उम्म्या कॉल सेंटर ला फोन करतो..
कॉल सेंटर - मी आपल्याला कश्या प्रकारे मदत करू शकतो?
उम्म्या - मी नोट पॅड वर टाईप करत होतो..अचानक सगळे
शब्द गायब झाले.. 

कॉल सेंटर - गायब झाले?
उम्म्या - हो..मी आता काहीही टाईप केलं तर ते स्क्रीन वर उमटत नाहीये..
कॉल सेंटर - तुम्ही नक्की नोट पॅड वर आहात की त्याच्या बाहेर आलात..
उम्म्या - माहित नाही..


कॉल सेंटर - बरं...तुम्हाला 'C ' प्रोम्प्ट दिसतोय का..
उम्म्या - 'C ' प्रोम्प्ट म्हणजे?

कॉल सेंटर - बरं..मला सांगा तुम्हाला कर्सर दिसतोय का स्क्रीन वर..
उम्म्या - अहो काहीच दिसत नाहीये..तेच तर सांगतोय कधीचं...

कॉल सेंटर - तुमचा मॉनिटर चालू आहे की बंद?
उम्म्या - मॉनिटर म्हणजे काय?

कॉल सेंटर - तुमच्या टेबल वर T .V सारखा जो डब्बा आहे तो..
उम्म्या - ते कसं ओळखू ? 

कॉल सेंटर - मॉनिटर च्या मागे पॉवर केबल आहे का कनेक्ट केलेली? आणि मॉनिटर
चा लाईट लागतो का?
उम्म्या - पॉवर केबल लावलेली आहे..पण लाईट नाही लागत आहे..


कॉल सेंटर - बरं..मॉनिटर च्या मागची दुसरी केबल तुमच्या कम्प्युटर ला जोडलेली आहे का?
उम्म्या -मला नाही दिसत..
कॉल सेंटर - म्हणजे ?
उम्म्या - अहो इथे अंधार आहे..फक्त खिडकीचा प्रकाश येतोय..
कॉल सेंटर - मग लाईट चालू करा ना..
उम्म्या - अहो..लाईट गेलीये कधीपासून....

कॉल सेंटर - ओह !!
मला आता कळाला प्रॉबलेम...एक काम करा..तुमचा कम्प्युटर पैक करा...आणि जिथून
आणलाय त्याला परत द्या..
उम्म्या - का हो काय झालं? आणि त्यांना काय सांगू परत देताना?
कॉल सेंटर - सांगा की मी कॉम्प्युटर घेण्याच्या लायकीचा नाहीये..
मला अक्कल आली की परत घेईन........


READ MORE - कॉल सेंटर आणि भयानक ग्राहक

या जगातील १० सत्य

Monday, December 10, 2012



1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हाबायका एकमेकींच्या साड्यादागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंतअसतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो !!





सुविचार
१. पैसा हेच सर्वस्वनव्हे... ­ ... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!
२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!
३. पाणी वाचवा...... बीअरप्या!!!
४. शेजाऱ्यावर प्रेमकरा......पकडले जाऊ नका म्हणजे झालं!!! :p


READ MORE - या जगातील १० सत्य

काही मजेशीर व्याख्या

Thursday, December 6, 2012

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखीहोतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्यागोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका



पासबुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव
गॅलरी - मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचागळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्यामधला काळ
दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव


नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचाबदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं ATM कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एकसाधन
चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारीसाखर
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना


READ MORE - काही मजेशीर व्याख्या

दुबईतील बस पेक्षा भारतीय बसच श्रेष्ठ !





१) दुबईतील बस पेक्षा भारतातील बस उंचीने मोठी आहे.

२) प्रवाश्याला थुंकता यावं म्हणुन खिडक्यापण उघडता येतात.

३) भारतातील बस मधे "लाल आणि पिवळा" असे दोन रंग वापरले आहेत तर दुबईच्या बस मधे केवळ एकच काळाकुट्ट रंग वापरलाय.


४) दुबईतील बस एखाद्या अळीप्रमाणे दिसते तर भारतातील बस बघुन ’हे एक बस’ आहे अस कोणीपण म्हणु शकेन.

आणखी काय काय दिसतय तुम्हाला.. कमेंट मधे लिहा...! 


READ MORE - दुबईतील बस पेक्षा भारतीय बसच श्रेष्ठ !

नवऱ्यांच्या विविध छटा दाखविणारे किस्से




मध्यंतरी सहज वाटले, नवऱ्यांच्या विविध छटा दाखविणारे किस्से  गोळा करावेत. त्या ‘नाटय़’मय छटांचा हा गुलदस्ता!
ही नवऱ्यांची षट्कोनी आकृती!
१) एक राजनेता नवरा election मध्ये बिझी असतो.
बायको बाळंतपणासाठी गेलेली असते. 
निवडणुकीच्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या नवऱ्यास
मतमोजणीच्या निकालाऐवजी घरचा फोन आधी येतो-‘‘आपल्या पत्नीस ‘तिळे’ झाले आहे.’’ नेता काही विचार न करता इलेक्शन मूडच्या धुंदीत उत्तरतो, ``Oh no! I demand a recounting!!''


२) एक अरेरावी नवरा ऑफिसमधून घरी येतो. नेहमी स्वच्छ दिसणारे घर आज अस्ताव्यस्त पसरलेले दिसते. बिछाना तसाच, किचनमध्ये खरकटी भांडी, मुलांचे कपडे, खेळणी इकडेतिकडे and what not.
‘‘तू दिवसभर करतेस तरी काय?’’- तो पत्नीस फटकारतो.
बायको हुशार. ती म्हणते- ‘‘त्या प्रश्नाचेच हे उत्तर आहे! आज मी खरोखर काही काम केले नाही. वाटले, त्यामुळे तरी तुम्हाला कळेल की मी दिवसभर रोज काय करते!’’
३) रंगेल नवरा- संशयी बायको एका पार्टीत एक स्त्री Event Manager ला विचारते-
``Excuse me please! ती beautiful तरुणी drinks serve करत होती ती कोठे गेली? दिसत नाही इथे ती?’’
मॅनेजर- ‘‘आपणास काय हवे आहे, मॅडम? That girl or the drink?''
पत्नी- ‘‘दोन्ही नाही. Neither girl nor drink! I am searching for my husband!! माझा नवरा शोधते आहे मी!’’


४)Hen pecked नवरा- एका जोडप्याचा वादविवाद जोरात चालू असतो. शेवटी ते प्रकरण
संपवावे म्हणून नवरा ‘बरं! राहील!!’ असं म्हणून आपले ‘स्थान’ ग्रहण करतो व पुटपुटतो- ``I am a man of few words!'
पण त्यानेही बायकोचे समाधान होत नाही. ती टोमणा मारतेच- ``Yes! But you keep repeating them! समजलं?’’-

५) नवीन नवरा-
नुकत्याच लग्न झालेल्या नवरदेवाची त्याचे मित्र खूप तारीफ करतात- ‘‘तू खरंच भाग्यवान आहेस! तुझी बायको, आमची वहिनी, हरिणाक्षी आहे, her lips are like rose buds, तिचा आवाज
कोकिळेसारखा आहे, ती गजगामिनी आहे, सिंहकटी आहे!! you're very fortunate!' त्यावर नवरदेव काय म्हणतात- ``I am not so sure! she does not seem to have a single characteristic of a HUMAN BEING! नुसती जनावरे काय कामाची?’’



६) शेवटी.. हा प्रेमळ नवरा- प्रिन्सिपॉलसाहेबांशी झगडा झाल्यामुळे चिडलेली, नव्र्हस झालेली शिक्षिका टेन्शन घेऊन सायंकाळी घरी येते. नवरा तिला गरमागरम कॉफी देतो, इकडल्यातिकडल्या गमतीदार
गोष्टींनी तिला हसवतो, तिचा मूड change करतो व तिला ‘‘असं चालतेच गं! cheer up!' वगैरे म्हणून तिचे सांत्वन करतो. ती स्त्री उत्साहित होते व म्हणते- ``Dear! you are really MY STRENGTH!' नवरा हसतो व तितक्याच प्रेमाने म्हणतो- ``And you are really MY WEAKNESS!''
READ MORE - नवऱ्यांच्या विविध छटा दाखविणारे किस्से

जर प्राणी पण FACEBOOK वर असते तर

Wednesday, December 5, 2012




जर प्राणी पण FACEBOOK वर असते तर, त्यांचे Status Updates काही असते :

झुरळ: यार काल रात्री एक बाई माझ्याकडे बघुन एवढ्या जोरात किँचाळली की पुर्ण घर माझ्या पिछेच पडल पण तुमचा हिरो वाचला!"

पाल: U R RITE झुरळ Handsome. आज माझ्याकडे पण बघुन एक मुलगी इतक्या जोरात ओरडली कि मीच घाबरले ना!

कुत्रा:"मला आज 17वा मुलगा झाला पण मला मुलगी पाहिजे होती But m happy"....

मच्छर:"I am HIV positive.. हे सगळ माझ्या हवरटपणामुळे झालय मला वेगवेगळ्या माणसांच रक्त प्यायला आवडायच"




डुक्कर:"Oh gosh या माणसांना काय म्हणाव gossips करतात कि flu पसरवतोय. मी इतका स्वच्छ राहणारा!!"

बकरी :"Friends, जास्त बाहेर फिरु नका, Eid जवळ आहे"

कोँबडी:"जर उद्या मी STATUS UPDATE केल नाहि तर FRIENDS समजुन जा मी KFC मधे शहिद झाले."
प्राण्यांच्या फेसबुकगिरीसाठी किती LIKES!
READ MORE - जर प्राणी पण FACEBOOK वर असते तर

निबंध लिहा - रावण

Sunday, December 2, 2012


रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे.
रावण १०-१० टोप्या घालायचा. 
शिवाय एकाच वेळेला १० प्रकारच्या मुखशुद्धी पावडरी पण खायचा.
लहानपणी रावणाच्या आईला त्याच्या नक्की कुठल्या तोंडात भडकावुन द्यायची हा प्रश्न असायचा.
कुठच्याही साध्या म्युझिकसिस्टिमवर गाणं लावलं तरी रावणाला ते डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड ऐकू यायचं.
रावण कधीच कुशीवर झोपू शकायचा नाही.
रावणाला कधीच टी शर्ट घालता आला नाही.
रावण एका तोडांने पान खायचा व सर्व तोंडे लाल व्ह्यायची.करण ती ईंटरकनेक्टेड होती अशी माहीती एका गाईडने सांगितली होती.
रावण दहा सिगारेटचे एक पाकिट एकदम संपवत असे.
रावण सलून मध्ये गेला कि न्हाव्याला त्याचे काम दिवसभर पुरत असे.
आणि सर्वात महत्वाचे रावण हा "पायाळु" होता.


मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे ठिपके लावीत होती.
रावण एकटाच समूह गीत म्हणायचा.
रावण एकटाच लंकन आयडॉल मध्ये भाग घ्यायचा आणि महाफायनलचा महाविजेता व्हायचा.
होळीला रावण एकटाच दहा वेगवेगळ्या स्टाईल्नं बोंबलायचा.
रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या वडिलानी 10 हारांची ऑर्डर नोंदवली होती.
रावणाला ढेकर आली की त्याला कुठल्या तोंडाने बाहेर काढावी हे समजत नसे.
रावण एक्टाच ग्रुप डिस्कशन करत असे.
रावणाला दहा ब्रान्डच्या सिगारेट लागायच्या
READ MORE - निबंध लिहा - रावण

ह्या प्रश्नांची उत्तरे द्या .. पळू नका !!

Saturday, December 1, 2012



१. मानुस जर माकडापासुन उत्क्रांत झाला असेल तर आजही माकडे माकडच का आहेत?

२. अनुभवी डॉक्टर ही कुठेतरी "प्रॅक्टीस" कसे करतात?

३. शेंगदाणा तेल - शेंगदाण्यापासुन, सुर्यफुल तेल - सुर्यफुलापासुन तर मग "बेबी - ओईल" बेबीपासुन बनवतात का? 

४. बरीच "कामे जुळवणा-याला" - ब्रोकर का म्हणतात?

५. "फ्रेंच किस"ला फ्रान्स मध्ये काय म्हणतात?


६. बांधकाम पुर्ण झालेल्या ईमारतीलाही "बिल्डींग" का म्हणतात?

७. प्रकाशाचा वेग माहिती आहे.... अंधाराचा किती असतो?

८. गोल पिझ्झा नेहमीच चौकोनी पॅकमध्ये का पाठवतात?

९. जंगली मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती?

१०. "फ्री गिफ्ट" म्हणजे काय? गिफ्ट फ्रीच असतात ना?

११. ५ मधील ४ लोक डायरियाने त्रस्त आहेत .... म्हणजे ५ वा डायरियाचा आनंद घेतोय काय?

१२. जर आपला जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर ईतर लोक कशासाठी जन्मलेत?

१३. "पार्टी" संपल्यानंतर येखादीतरी मुलगी रडताना का दिसते?

१४. कंप्युटर बंद करण्यासाठी "स्टार्ट" वर का क्लिक करावे लागते?

१५. २१ - ट्वेंटी वन , ३१ - थर्टी - वन मग, ११ - वन्टी वन का नाही?

मला आत पर्यंत ह्या प्रश्ना ची उत्तरे नाही मिळाली जर तुम्हाला मिळाली असेल तर मला सांगा..!


READ MORE - ह्या प्रश्नांची उत्तरे द्या .. पळू नका !!