सुपरस्टार रजनीकांत काय काय करू शकतो ? बघा बरे

Monday, January 14, 2013



•रजनीकांत ज्यावेळी पुशअप्स मारतो, त्यावेळी तो स्वत:ला वर उचलत नाही, तर पृथ्वीला
खाली ढकलत असतो

•मोनालिसाच्या ज्या हास्याबद्दल जगभरात अजूनही गूढ आणि आकर्षण आहे, हे हास्य
साक्षात रजनीकांतनेच तिला दिलंय

•रजनीकांत कुठल्याही संख्येला शून्याने भागू शकतो

•रजनीकांत माशालाही पाण्यात बुडवून मारू शकतो

•रजनीकांतने एकदा एका घोडय़ाच्या हनुवटीला लाथ मारली होती. आज त्याच्या वारशांना
आपण जिराफ म्हणून ओळखतो

•रजनीकांतने एकदा मॅकडोनाल्डमध्ये इडलीची ऑर्डर दिली आणि.. त्याला ती मिळाली!

•बम्र्युडा ट्रँगल म्हणून ओळखला जाणारा भाग पूर्वी बम्र्युडा स्क्वेअर होता; पण
रजनीकांतने एका कोप-याला लाथ मारली आणि..रजनीकांत कॉर्डलेस फोनने तुमच्या
गळ्याभोवती फास आवळून तुमचा जीव घेऊ शकतो

•रजनीकांत श्वास घेत नाही. आसमंतातली हवा संरक्षणासाठी त्याच्या फुफ्फुसांमध्ये
लपून बसलेली असते

•रजनीकांत यापूर्वीच मंगळावर जाऊन आलाय; म्हणून तर तिथे सजीवसृष्टीचं अस्तित्व नाही

•रजनीकांत रोखून पाहतो, तेव्हा पाणी अधिक वेगाने तापतं

•गुगलवर रजनीकांतला शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. कारण कोणीच रजनीकांतला शोधू
शकत नाही; रजनीकांतच आपल्याला शोधून काढतो

•टेलिफोनच्या आन्सरिंग मशिनचा बीप वाजण्याआधीच रजनीकांत तिथे आपला संदेश नोंदवू
शकतो

• रजनीकांत न्यायालयात जातो आणि.. न्यायाधीशालाच शिक्षा सुनावून येतो

• रजनीकांतला लहानपणी देवी झाल्या होत्या. म्हणूनच आज देवीचं नामोनिशाण दिसत नाही

• रजनीकांतच्या कॅलेंडरमध्ये 31 मार्चनंतर एकदम 2 एप्रिलच येतो कारण.. त्याला
कोणीही 'एप्रिल फूल' बनवू शकत नाही

• रजनीकांत घडय़ाळ घालत नाही कारण.. किती वाजलेत ते तोच तर ठरवतो

• मृत्यूला कोणीही फसवू शकत नाही, हे विधान म्हणजे रजनीकांतला स्वत:चा अपमानच
वाटतं. कारण तो क्षणोक्षणी मृत्यूला फसवत असतो

• पुरातत्त्ववेत्यांनी 1236 सालची एक इंग्लिश डिक्शनरी शोधून काढली. त्यात
'व्हिक्टिम' या शब्दाचा अर्थ 'ज्याचा रजनीकांतशी सामना झाला आहे तो' असा आहे

• ग्लोबल वॉर्मिग नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाही. रजनीकांतला थंडी वाजत होती,
म्हणून त्याने सूर्याला थोडं पृथ्वीच्या जवळ आणलं
yanna Raskala...... माईंड इट!!!!!
READ MORE - सुपरस्टार रजनीकांत काय काय करू शकतो ? बघा बरे

कहर असा पुणेरी दुकानदार प्रियकर - Pune Love

Thursday, January 10, 2013


‎"एका तरुण आणि पक्का पुणेरी असलेल्या(म्हणजे ­?) दुकानदाराचे एका मुलीशी प्रेम जमले. पण त्याने त्याच्या प्रेयसीला पुढील अटींचे पालन करण्याची कडक सूचना केली:
१. दुकानात सारखे सारखे येवू नये
२. सारखा सारखा फोन करू नये
३. मिसकॉल देवू नये. मिसकॉल दिल्यास माझ्याकडून फोन येण्याची अपेक्षा ठेवू नये.
४. फोनवर अथवा प्रत्यक्षात बोलताना आपले म्हणणे थोडक्यात मांडावे, उगीच पाल्हाळ लावू नये. प्रेम व्यक्त करायला दोन शब्द पुरेसे असतात. अबोल प्रेम तर फारच चांगले.
५. दुपारी २ ते ४ या वेळेत फोन करू नये.माझी वामकुक्षीची वेळ असते. झोपमोड झाल्यास आपल्या संबंधात बिघाड निर्माण होवू शकतो.


६. आमच्याकडे पाणी देण्याची पद्धत नाही, तेंव्हा दुकानात आल्यावर पाणी मागू नये
७. सुट्टीच्या दिवशी आपण फिरायला व जेवायला बाहेर एकत्र जावू शकतो, पण खर्च TTMM (तुझा तू माझा मी ) करावा लागेल.
८. वरील अटी मान्य असतील तरच पुढील वाटचाल करावी.

गम्मत म्हणजे या अटी वाचून त्या मुलीस तो दुकानदार आणखीनच आवडायला लागला, कारण "तीही पक्की पुणेकर होती"

READ MORE - कहर असा पुणेरी दुकानदार प्रियकर - Pune Love

लोकांनी विचारलेले फालतू प्रश्न आणि त्याला दिलेले हटके उत्तर

Wednesday, January 2, 2013






अनेकदा लोकं असे प्रश्न विचारतात जे अतिशय मुर्खपणाचे असतात...
अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत. पहा काही मस्त नमुने दिले आहेत:-

▶1) हॉटेल मध्ये अनेक जण वेटरला'इथे जेवण कसं मिळतं'हे विचारतात....
आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाचएखादा
... इरसाल वेटर तर....गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?

वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...
कसला चांगला लागतोय................

▶2) प्रश्न- अरे वा! घरीच आहातवाटतं?
उत्तर- नाही माझ्या पश्चात ही इमारत"राष्ट्रिय वास्तु"घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय...............



▶3) सकाळी.प्रश्न - पेपर वाचताय वाटतं!
उत्तर- नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही......

▶4) सिनेमागृहा बाहेर प्रश्न:काय पिक्चर बघायला आलात वाटतं?
उत्तर: छे! फावल्या वेळात तिकिटे"ब्लैक" करुन अर्थार्जन करावं म्हणतोय! पण!
इथेही तुम्ही आमच्या"आधी"हजर! !............

▶5) सकाळी फिरायला निघाला आहात प्रश्न: काय"मोर्निंग वाक्"वाटतं??!!!
उत्तर: काही तरी काय! नगरपालिकेचं कंत्राट घेतलयमैलाचे दगड कुणी पहाटे
चोरून तर नेत नाही ना याची खात्री करतोय!!.............

▶6) प्रश्न- प्रवासाला निघालात वाटतं? (हातात लगेजबघून !!!!)
उत्तर- नाही हल्ली व्यायाम करायला सवड मिळत नाही ना!
शिवाय जिम चे पैसे ही वाचतात !!

READ MORE - लोकांनी विचारलेले फालतू प्रश्न आणि त्याला दिलेले हटके उत्तर