मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले जातात.
अशा काही शब्दांची ही डिक्शनरी ( म्हणजेच त्यांचा अर्थ काय आहे ते बघा )
1) यंत्रणा : जाडजूड मुलगी
2) दांडीयात्रा : ऑफिसला सलग बुट्ट्या.
3) पेटणे : संतापणे
4) हुकलेला : मुद्दाच न कळालेला.
5) चैतन्यकांडी : सिगारेट
6) चैतन्यचूर्ण : तंबाखू
7) चेपणे : पोट भरून दाबून जेवणे
8) डोळस : बॅटरी.
9) बॅटरी : चष्मेवाला/ चष्मेवाली.
10) डब्बल बॅटरी : जाड भिंगांच्या चष्मेवाला/ ली
11) पुडी : तंबाखू, गुटखा.
12) पुडी सोडणे : थाप मारणे
13) खंबा : दारूची/ बीयरची फुल बॉटल
14) पेताड : बेवडा
15) डोलकर : दारू पिऊन डोलणारा
16) वकार युनूस : दारू पिऊन ओकाऱ्या करणारा
17) भागवत : इकडून तिकडून उधाऱ्या करून नडभागवणारा
18) सोपान : गावरान गडी
19) सांडला : पडला
20) जिवात जीव येणे : गरोदर राहणे
21) फणस लावणे : नस्त्या कुशंका काढणे
22) आज बसायचे का? : आज दारूची मैफल जमवायची का?
23) कल्ला : धम्माल
24) बुंगाट : (वाहनासंदर्भात) अतिशय वेगाने
25) गाडी : टू व्हीलर
26) थुक्का लावणे : फसवणे
27) टांगा पल्टी, घोडे फरार : दारू पिऊन आउट होणे
28) एलएलटीटी : लुकिंग लंडन, टॉकिंग टोकियो (तिरळा)
29) कर्नल थापा : थापाड्या माणूस
30) सत्संग : ओली पार्ट
3 comments:
ajun ek ahe TTMM tujh tu maz mi (chaha ghyala gelya var kinva ekhadi film baghayala gelyavar)
ABCD......MHANJE AGA BAI CHADDI DISALI
CHINA--->> Mhnaje chaddi...haravali...in...north...AMERIKA.
Post a Comment