कोंबडीवर ४ शब्द ...

Friday, July 27, 2012


१. मला सगळेच प्राणी आणि पक्षि आवडतात . प्राणी खूप चविष्ट असतात . "कोंबडी" विशेषतः जास्त चविष्ट असल्याने माझा आवडता पक्षि आहे.
२. कोंबडी खाल्ल्याने "बर्ड फ्लू" होतो.
३. कोंबडी "शाकाहारी " आहे , म्हणून मला तिचा आदर वाटतो .
४. कोंबडीला दगड मारला तर तिचा 'पक पकाक' असा आवाज येतो. मला तो फार आवडतो. नाना पाटेकरचा एक सिनेमाचे नाव 'पक पक पकाक ' असा आहे .
५. पूर्वीचे लोक कोंबड्या चोरत ,त्यांना कोंबडी चोर असे म्हणत,चोरी करणे गुन्हा आहे.
६. कोंबडी "अंडे" देते, प्रत्येक कोंबडीला नेहमीच जुळी (ट्विन्स) अंडी होतात...
७. कोंबडीचा बळी देतात. बळी देणे हि प्रथा वाईट आहे असे, "आदित्य" काल 'चीकेन तंदुरी' खातांना म्हणाला.
८. पूर्वी 'कोंबडा' आरवायचा आणि 'कोंबडी' झोपून असायची,,,,(आळशी कुठली )
९. कोंबडी कधी कधी 'सोन्या' चे अंडे देते. मला घरी लाडाने 'सोन्या' हाक मारतात .
गटारी चा दिवशीचा चार ओळी - कोंबडीच्या हातात हात घालून बोकड लागले नाचू, आषाढ गेला श्रावण आला आता महिनाभर तरी वाचू !! :)

READ MORE - कोंबडीवर ४ शब्द ...

मराठी ग्राफिटी – Marathi Graffiti (Part 3)

Thursday, July 26, 2012
Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

Marathi Graffiti मराठी ग्राफिटी

READ MORE - मराठी ग्राफिटी – Marathi Graffiti (Part 3)

आई मुलीचे विनोदी फोन संभाषण

Tuesday, July 24, 2012

मुलगी - हॅल्लो.... हॅल्लो...
मम्मी - हां हॅल्लो...
मुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय.
मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ?
मुलगी - बसलाय.
मम्मी - कशाने गं ?
मुलगी - आईसक्रिम
मम्मी - मग काही घेतलस की नाही ?
मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच
काटा काढावा.
मम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन
केलास ?
मुलगी - अग,'करेन करेन'म्हणत होते. जमलच नाही. तसं
आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून.
तसा केला फोन.
मम्मी - खरच की काय ?
मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.
मम्मी - बरं, तू कशी आहेस ?
मुलगी - कशी काय ? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग
गोरा...
मम्मी - अग कशी म्हणजे ... मजेत आहेस ना ?
मुलगी - अगदी मजेत.
मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत ?
मुलगी - कुठे काय म्हणतोय तो ? घरात असला तर म्हणेल
ना ?
मम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान
मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू ? मजेत
आहेत ना ?
मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक
प्रोब्लेमच झालाय.
मम्मी - काय ग, काय झालं ?
मुलगी - कसं सांगू ? लाज वाटते बघ सांगायला.
मम्मी - अरे देवा, अस झालय तरी काय ?
मुलगी - अग त्याला ना...... अॅसिडीटी झालीय.
मम्मी - अॅसिडीटी ?
मुलगी - हो ना.... त्याला हा प्रोब्लेम छोटाच
वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून
सांगू ?

मम्मी - तुला कसला ग प्रोब्लेम ?
मुलगी - अगं, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.
मम्मी - पण अचानक अॅसिडीटी कशी काय झालीय ?
मुलगी - काही नाही ग. हा सगळा बाहेरख्यालीपणाच
ा परिणाम
मम्मी - अग, काय बोलतेस काय तू ?
मुलगी - खरं तेच सांगतेय.
मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस ?
मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली ?
मम्मी - म्हणजे
तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो ?
मुलगी - नाईलाज आहे ग माझा. मी तरी काय करू ?
मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला...
डबा बनवायला..
मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच ?
मुलगी - अग, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर
तो...
मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं ? एवढ्याश्या कारणांमुळे
तो दुसर्या बायकांकडे जातो आणि तू...
मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.
मम्मी - तू ?
मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण
याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही ? रोज रोज
ती करी, बिरयाणी कशाला खायची ? असलं चमचमीत
खाल्ल्यावर होणारच ना अॅसिडीटी.
मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.
मुलगी - अग, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय
होणार ?
मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस ?
मुलगी - असं काय करतेस ? तुझं मराठी एकदम विक झालय
बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.
मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत
जा.
मुलगी - चल.... काहीतरीच काय ? दुध प्यायला तो काय
कुक्कुलं बाळ आहे ?
मम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने
अॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ?
मुलगी - नाही कसा ? हल्ली फारच आंबटशौकीन झालय
तो.

मम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन ?
मुलगी - हो ना. परवा कैर्या घेऊन आला, काल आवळे
आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ?
मला कुठे येतय ते ? आंबटशौकीन कुठचा !
मम्मी - माझ्याकडे पाठव.
मुलगी - त्याला ?
मम्मी - गधडे, कैर्या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन
लोणचं बनवून.
मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला ? आपल्याकडे तर
जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले
की काय ते ?
मम्मी - बाबा ? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली ?
विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ?
मुलगी - नाही. हो मी माधुरी..Sorry हं मधुराची मम्मी,
बहुधा राँगनंबर लागला. हि हि हि
ओळख असू द्यात .....
READ MORE - आई मुलीचे विनोदी फोन संभाषण

१४ विद्या आणि ६४ कलां

Sunday, July 22, 2012


१४ विद्या आणि ६४ कलां
प्राचिन कालापासुन आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कलां
चौदा विद्या
 चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदावेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद
सहा वेदांगे
  १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
२. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.
३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.
४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.
५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.
६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.७.१. न्याय,७.२. मीमांसा, ७.३. पुराणे ७.४. धर्मशास्त्र.
चौसष्ट कला
 १. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे.
२. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.
३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८. व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५. पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९. प्रहेलिका - कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०. प्रतिमाला - अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१. काव्यसमस्यापूर्ती - अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२. भाषाज्ञान - देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.
२३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.
२४. कायाकल्प - वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५. माल्यग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६. गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७. यंत्रमातृका - विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८. अत्तर विकल्प - फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९. संपाठय़ - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०. धारण मातृका - स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३. मणिभूमिका - भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४. द्यूतक्रीडा - जुगार खेळणे.
३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६. माल्यग्रथन - वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८. मेषकुक्कुटलावक - युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९. विशेषकच्छेद ज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०. क्रिया विकल्प - वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१. मानसी काव्यक्रिया - शीघ्र कवित्व करणे.
४२. आभूषण भोजन - सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३. केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४. नृत्यज्ञान - नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५. गीतज्ञान - गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६. तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७. केशमार्जन कौशल्य - मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८. उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९. कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०. नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१. उदकघात - जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२. उदकवाद्य - जलतरंग वाजविणे.
५३. शयनरचना - मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४. चित्रकला - नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५. पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६. नाटय़अख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे.
५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८. तुर्ककर्म - चरखा व टकळीने सूत काढणे.
५९. इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०. तक्षणकर्म - लाकडावर कोरीव काम करणे.
६१. अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२. सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे.
६३. म्लेंछीतकला विकल्प - परकीय भाषा ठाऊक असणे.
६४. रत्नरौप्य परीक्षा - अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.

READ MORE - १४ विद्या आणि ६४ कलां

निबंध :- माझा आवडता प्राणी : गाढव

Thursday, July 19, 2012


तसे मला सगळेच प्राणी आवडतात पण लांबुनच बघायला ते ठिक वाटतात. पण या सर्व प्राण्यांमध्ये “गाढव ” हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे.
गाढवाला २ डोळे, २ कान, ४ पाय व १ शेपूट असते. त्याच्या अंगावर काहि वेळा पट्टे मारलेले दिसतात. त्यावेळी ते मला झेब्र्यासारखे वाटते. आपण रस्ता नेहमी झेब्रा क्रोसिंग वरुनच क्रोस करवा. झेब्रा हा प्राणी प्रामुख्याने जंगलात आढळतो. पण आजकाल जंगल आढळत नाही. त्यामुळे झेब्रा कुठे असतो ते मला माहित नाही. कमल हसन च्या “हिदुस्थानी” नावाच्या सिनेमामध्ये खुप सरे झेब्रे दाखवले होते त्यामुळे सिनेमावाले झेब्रे पाळत असल्याची मला शक्यता वाटते.पण सलमान खान नावाचा नट हरणांच्या शिकारीबरोबरच झेब्र्याची सुध्धा शिकार करत असल्याची शक्यता असल्याने सध्या सिनेमात झेब्रे दाखवत नाहित. मला “किंगकॉग” नावाचा अस्वलाचा सिनेमा आवडतो.
ईसापनितीमध्ये गाढवाच्या खुप गोष्टी आहेत. माझी आज्जी मला रोज झोपताना गोष्टी सांगते. पण ईसापनितीमध्ये गाढवाला नेहमीच बावळट म्हणुन दाखविले आहे, हे चुकिचे आहे. त्यामध्ये सांगितल्या प्रमाणे गाढवाला पदार्थांची चव कळत नाही. पण मला गोड पदार्थांची चव खुप आवडते. माझे “बाबा” व “शाळेचे गुरूजी” पण मला नेहमी “गाढव आहेस” असे म्हणतात. त्यांच्यापेक्षा माझी आई माझा खुप लाड करते, म्हणुन ती मला खुप आवडते. ती मला गोड्-गोड पदार्थ खायला देते.

गाढवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते खुप लाथा मारते. “WWF” नावाच्या खेळात “BATISTA” नावाचा प्राणी सुध्धा खुप लाथा मारतो पण तो गाढव नसुन रेडा आहे. माझा दादा म्हणतो त्या खेळातिल सर्व काही खोटे असते त्यामुळे मला तोच गाढव असल्याची शंका येते. मी त्याला असे म्हटल्यावर त्याने मला गाढवासारख्या लाथा मारल्या.पण मला “WWF” पहायला खुप आवडते. अजुन १ गोष्ट म्हणजे गाढव रात्री खुप जोरात “ढोंच्यु …. ढोंच्यु” असे ओरडत बसते त्यामुळे माझी झोप मोड होते. मला तो आवज चांगला काढता येतो पण तो काढल्यावर माझी आई माझ्या कानाखाली आवज काढते. त्यामुळे कधिकधी मला खुप रडु येते.
माझे बाबा म्हणतात की “गाढवाच्या मागे व साहेबाच्या पुढे कधी उभे राहु नये” साहेब व गाढव यांच्यातिल संबंध मला काहि कळला नाही. कदाचित ते पण लाथा मारत असावेत. तसा माझा साहेब सुध्धा गाढवच आहे. म्हणुन मी त्यांच्या पुढे ऊभे न राहता शेजारी ऊभे राहतो.
गाढव शक्यतो रस्त्यावर राहते. भारतात रस्त्यावर भिकारी पण राहतात. काहि दिवसांपुर्वी भिकार्‍यांवर “ट्राफिक सिग्नल ” नावाचा सिनेमा आला होता. तो मला मुळीच आवडला नाही. खुप घाण सिनेमा होता. आपल्याकडे ” आडला हरि गाढवाचे प्पय धरी ” अशी १ म्हण आहे. पण तो पुढचे धरतो का मागचे ते मला माहित नाही. अजुन १ गोष्ट म्हणजे त्या म्हणीतिल “हरि” मी नसुन दुसरा कोनी तरी आहे. तो कोण आहे हे मला माहीत नाही.
“गाढवीच्या” अशी एक शिवी सुध्धा आहे. मला अजुन खुप शिव्या येतात पण माझे बाबा मला शिव्या दिल्यावर मारतात. पण एकंदरित शिवीगाळ चांगली नव्हे त्यामुळे मार बसतो. माझी ताई सकाळी पाणी “गाळ” आहे असे ओरडत होती, मी तिला गाढव म्हणतो.


READ MORE - निबंध :- माझा आवडता प्राणी : गाढव

निखळ विनोदी पुणेरी पाटी – पुणेरी पाट्या

Wednesday, July 18, 2012

1. आमच्याकडे सर्व भाषेतील झेरॉक्स काढून मिळतील.
2. रंग ओला आहे. विश्वास नसेल, तर हात लावून पहावे.
3. साने येथेच राहतात. उगीच भलतीकडे चौकशी करू नये.
4. आमच्या कडे हापूस आंबे, कोकम आणि परकर मिळतील.
5. कुत्र्यांपासून सावध रहा.नको तिथे चावल्यास साठे जबाबदार नाहीत.
6. वाचनालयात शांतता राखावी.अन्यथा कधीही आत न घेण्यासाठी बाहेर काढण्यातयेईल.
7. येथे एरंडेलाचा डोस देण्यात येईल.(पुढील क्रियामात्र घरी जाऊन करावी.)
8. मधुमेही व्यक्तीच्या दारावरील पाटी: "साखरेचे खाणार त्याला देव नेणार!"
9. एका शासकीय कार्यालयाच्या वाचनालयात म्हणे (वाचनालयाबाहेर पुस्तक नेण्यास बंदी असल्याने) प्रत्येक पुस्तकावर "हे पुस्तक मी अमुक अमुक कार्यालयातून चोरून आणले आहे" असे लिहिलेहोते.
10. एका खोपटवजा उपहारगृहावरील पाटी:
हॉटेल ओबेरॉय (आमची कोठेही शाखा नाही)

11. तीनदा दार वाजवूनही दार उघडले नाही, तर मालकाला आपणास भेटावयाचे नाही असे समजावे.
12. पुस्तक-वह्या-रद्दी खरेदी दुकानावरील फलक:
चित्रपटाला जायचे आहे? आई-बाबा पैसे देत नाहीत? मगवह्या पुस्तके आम्हाला द्या की.
13. एका जेवणालयातील पाटी:
जेवण झाल्यानंतर उगाच इथे गप्पा मारू नये.
14. एका जिन्यातील पाटी:
वर चढताना ५वी पायरी तुटलेली आहे.
15. एका घरासमोरील पाटी:
देशपांडे कुठे राहतात ते आम्हाला माहित नाही. उगाच घंटी वाजवून विचारू नका.
16. आणखी एका घरासमोरील पाटी:
उगाच घंटी वाजवू नका, आम्ही विजेचे बील भरतो.
कडीही वाजवू नका, कडी झिजेल.
17. आम्ही खाद्यपदार्थांचे पैसे आकारतो. जागेचे भाडे नाही.
18. उधार मागून आपला अपमान करून घेऊ नये, ही नम्र विनंती. (पुण्यात यालाच नम्र म्हणतात म्हणे...)
19. येथे वाचायचे चष्मे मिळतील, पण आपली अक्षरओळख आहे ना? मागाहून तक्रार चालणार नाही.
20. आम्ही आमच्या वस्तू विकत आणतो. कृपया उधार मागू नये.


21. केवळ पैसे दिले म्हणजे काहीही करता येईल असे समजू नये; त्यासाठी शहरात अजूनहीजागा आहेत. आमच्या सौजन्याला मर्यादा आहेत याचे भान ठेवावे.
22. हे कार्यालय आहे. आत पाहण्या सारखे काही नाही. आत येऊ नये.
23. गाडीमध्ये तंबाखू खाऊन बसू नये व बसून तंबाखू खाऊ नये
24. भिंती रंगवण्याची जबाबदारी कोणावरही दिली नसून ती जबाबदारी भिंतीवर थुंकून पार पाडू नये ही नम्र विनंती
25. अरे मी गाढव आहे. गेटासमोर लावतोय गाडी.
26. अनोळखी वस्तू दिसल्यास स्पर्ष करू नये(व्यक्तींसकट).
27. इतरांनी वाहने लावू नयेत लावल्यास हवा सोडून दिली जाईल.
28. फुंके (सिगारेट्स्), थुंके (तंबाखू) आणि शिंके (तपकीर) यांना रंगमंदिरात मज्जाव.
READ MORE - निखळ विनोदी पुणेरी पाटी – पुणेरी पाट्या

पुणेरी पाटी - पुणेरी पाट्या (Puneri Pati - Puneri Patya) भाग १

Monday, July 16, 2012
पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya


पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya


पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya


पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya


READ MORE - पुणेरी पाटी - पुणेरी पाट्या (Puneri Pati - Puneri Patya) भाग १

संत नामदेव पुण्यतिथी - १६ जुलै दिनविशेष


संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व हिंदुस्तानी भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या एकसष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.
‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक!
भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानदेवांच्या कालखंडात होऊन गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा असा त्यांचा बहिश्र्चर प्राण होता. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता. पंढरीच्या भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली.
दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सर, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे भूवैकुंठी, पंढरीमध्ये गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.
संत गोरोबांकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्र्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदि संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्र्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. (ह्या प्रसंगाचा उल्लेख तपशीलातील छोट्या-मोठ्या फरकांसह संतविषयक साहित्यात आढळतो.)
संत नामदेवांची पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा त्यांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वत:ला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे साठ अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपित घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्र्वरांचे चरित्र सांगितले आहे.
संत ज्ञानेश्र्वरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. सर्व संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्गग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्र्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लध्धा, विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही यांची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये ( शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी ) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले.
READ MORE - संत नामदेव पुण्यतिथी - १६ जुलै दिनविशेष

वेडात मराठे वीर दौडले सात...



वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥
"श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात"
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील"
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ३ ॥
"जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत"
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ८ ॥
READ MORE - वेडात मराठे वीर दौडले सात...

अक्षरांपासून तयार केलेली गणेश चित्रे

Saturday, July 14, 2012











READ MORE - अक्षरांपासून तयार केलेली गणेश चित्रे

१३ जुलै - वीर बाजी प्रभू देशपांडे स्मरण दिन (दिनविशेष)

Friday, July 13, 2012


बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. वयाच्या पन्नाशीतही दिवसातले २०-२२ तास काम करूनही न थकणाऱ्या बाजींचा पूर्ण मावळ पट्ट्यात मोठा दबदबा होता.

घोडखिंडीचा लढा

सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. (ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)
मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. .
READ MORE - १३ जुलै - वीर बाजी प्रभू देशपांडे स्मरण दिन (दिनविशेष)

अभिनेत्री गेहाना वशिष्ट ला तिरंग्याचा अपमान केला म्हणून देण्यात आला चोप (Actress Gehna Vashist beaten up !)

Wednesday, July 11, 2012


अभिनेत्री गेहाना वशिष्ट ला तिरंग्याचा अपमान केला म्हणून देण्यात आला चोप देण्यात आला असून हा तिचा पब्लिसिटी सतंत असल्याचा टीम अशक्य पाणचट ला संशय आहे ..
पण तरी जे झाले ते चांगले पण आणि वाईट पण .. तिरंग्याचा असा अपमान परत होणार नाही हे खरे पण एका स्त्री वर हाथ उचलला गेला हे योग्य का अयोग्य .. तुमचे मत पण मांडा ..
Actress Gehna Vashist beaten up for wearing bikini with Indian flag!
This was a sheer insult to our National flag, hence the people couldn't accept this,
Good Job Done Guys...these people deserve this kind of treatment.
A Soldier is dying for the safety ofNational flag and these bollywood morons insulting the nation flag.
fair treatement given by some unknown social activists, after she evoked anger amongst the masses over her controversial bikini photo shoot.

READ MORE - अभिनेत्री गेहाना वशिष्ट ला तिरंग्याचा अपमान केला म्हणून देण्यात आला चोप (Actress Gehna Vashist beaten up !)

दारू चढल्यावर पोरांची ची खास वाक्य.. तळीराम ..


१. तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
२.भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
३. गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग बसायच.
४. तु आपल्या बोलण्याच मनावर नाय घ्यायच.

५. भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो.
तु लै भारी
६. चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते बघुन घेउ....
६. आज फक्त तिच्या बरोबर बोलायला साठी रीचार्ज
केला आहे....
७ . तुला काय वाटत मला चढली आहे?
८. अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन बोलतो आहे...
९. अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय ना पडनार......
१०. मी लास्ट पेग बॉटम अप करणार....
११ . यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई है..
१२. य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण मनाला लागल...


१३ . कही पण आसो.. साला तु आपला भाऊ आहेस...
१४ . तु बोलना भाई, काय पाहीजे जान चाहिये
हाज़िर है ???
१५.अबे आपल्याला आज पर्यंतनाही चढली ,
चल साल्या बेट लाव आज..
१६. चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल , फोन
नंबर दे उस्का...
१७ य़ार आज उसकि बहुत याद आरहि है
१८. य़ार आता बस ,आत नाही प्यायच...
१९. य़ार तु आपला सर्वात जिगरी दोस्त... आज से हमारे बीच में कोइ पोरगी नहि अयेगि


READ MORE - दारू चढल्यावर पोरांची ची खास वाक्य.. तळीराम ..

जॅकी श्रॉफ ने दिल्या अर्वाच्य शिव्या बघा व्हिडीओ ..Jackie Shroff abusing behind the scenes

Tuesday, July 10, 2012
This video content abusive word and language.


The video is not property of faltupana.in. its third party display on our website.





READ MORE - जॅकी श्रॉफ ने दिल्या अर्वाच्य शिव्या बघा व्हिडीओ ..Jackie Shroff abusing behind the scenes

Top 10 must watch Hindi Movies of all time

Monday, July 9, 2012

This world is full of Gurus and knowledgeable people still i am showing some daring to give you my list .. i know lots of people will not agree on few of the names or may be argue on why this movie is their and this is not ...
My list is depend on following points
-Story
-Era in which it created and
-Production values like Music,Cinematography and all
Let come to the my world Top 10 Indian m
ovies must watch before you die

10.Taare Jamin Par

First time in Indian history such a sensitive issue is handled by courageous  actor the Amir Khan, Only who can handle and direct story like this...Most different film in Indian history. Child
actor Darshil won many award for this film..


9.Koshish (1972)

The number 9 spot for me is film Koshish (197
2).Directed by Guljar........

Koshish is considered a landmark movie in the history of Indian cinema. It stars Sanjeev Kumar and Jaya Bhaduri. The movie depicts a deaf and mute coupl
e and their conflicts, pain and struggle
to carve out a niche for themselves in a desensitized society.







8.Agni Path (1990)
'Vijay Dinanath Chavhan'...Only the name enough.. this film is one of the best performance by any gangster on the screen and real godfather movie of indian cinema with Amitabh Bachchan, Mithun Chakraborty, Madhavi, and Rohini Hattangadi, with Danny Dengzongpa as the villain. As we know Amitji were star of great movies like Deewar,Trishul,Janjeer and all but this is complete different Amitabh Bachchan.
The film is memorable for performance of Mithun Da also..

7.Do Bigha Zamin (1953)

Do Bigha Zamin directed by Bimal Roy and star Balraj Sahni and Nir
upa Roy in lead roles.
The film is known for its socialist theme, and is an important film in the early parallel cinema of India and is
rightly considered a trend setter.Bigha is measure of land area but is not same as acre though translating the title as such serves the purpose.
This film is old classic Bollywood and India showing the reality to extent.



6.Andaz Apna Apna(1994)
Andaz Apna Apna is without doubt King of all comedy films ever made in Indian History.directed by Rajkumar Santoshi, starring Aamir Khan, Salman Khan, Karisma Kapoor, Raveena Tandon, Paresh Rawal and Shakti Kapoor in t
he lead roles. Govinda and Juhi Chawla make guest
appearances.

Crime Master Gogo, Teja Sahab, Bajaj, Amar-Prem,Karishma-Ravina,
Shut Up Robert...ye teja teja kya h
ai,Gogo maai baap aapaka ghagara and Much more ...This film is part of history or you can say History...

5.Jaane Bhi Do Yaaro(1983)

Jaane Bhi Do Yaaro is directed by Kundan Shah and produced by NFDC. It is a dark satire on the rampant corruption in Indian politics,
bureaucracy, news media and business, and stars an ensemble cast
that includes the likes of Naseeruddin Shah, Ravi Baswani, Om Puri, Pankaj Kapur, Satish Shah and Bhakti Barve.
This film was revolution in Bollywood and show others that people in india are willing to watch other that Daku,Saas Bahu
and Gaon Ka babu stories..



4.Awaara(1951)
Awaara directed and produced by Raj Kapoor who also plays the leading role. His real-life father Prithviraj Kapoor stars as his on-screen father Judge Raghunath. Kapoor's youngest real-life brother Shashi Kapoor plays the younger version of his character. Prithiviraj's father Dewan Bashwanath Kapoor also played a cameo role in his only film appearance.
This film made Raj Kapoor and then he ruled decade of Indian Film Industry.

3.Sholay (1975)
Tera Kya honga K
aliya,Basanti in kutto ke saaamne mat naach ,Itna sannata kyun hai mere bhai and all this movie had it and it did it with sprinkling its Magic still on Indian..
Sholay produced by G.P. Sippy and directed by his son Ramesh Sippy. It is considered among the greatest classic hits in the history of Bollywood, India's Hindi film industry. Released
on 15 August 1975, it stars Dharmendra, Amitabh Bachchan, Hema Malini, Sanjeev Kumar, Jaya Bhaduri an
d Amjad Khan. The film, shot in the rocky terrain of Ramanagara, Karnataka,is the story of two petty criminals hired to capture a ruthless dacoit by the name of Gabbar Singh.


2.Lagaan(2001)
Lagaan directed by Ashutosh Gowariker
. Aamir Khan, who was also the producer for the film, stars with Gracy Singh in the lead roles; British actors Rachel Shelley and Paul Blackthorne play the supporting roles. the film was shot in an ancient village near Bhuj, India.It got oscar nomination
but will be remebered for its strong script music of a.r.rehmaan and thrilling story and screen play.



1.Anand(1975)
Anand is a Hindi film written and directed by Hrishikesh Mukherjee and released in 1971. It starred Rajesh Khanna and Amitabh Bachchan. The dialogue of the film was written by Gulzar.This film is must,
must and must watch film which so simply handled with classic music and the acting of Rajesh Khanna, Amitabh and other supporting cast.Its the best movie you can ever imagine in this industry. The story is original and very well implemented.



So thats is folks .. its my ranking your may be different but sorry to following films who are not in MY Top 10..
Mother India, Dilwale Dulhniya le jayenge, Maine Pyar Kiya, Deewar and all other great hits...
READ MORE - Top 10 must watch Hindi Movies of all time