भगवान श्री गणेश आपल्याला शिकवता व्यवस्थापन - Lord Ganesh is Management Guru

Saturday, July 7, 2012
व्यवस्थापनाचे कोर्स देणार्या क्लासेसच्या शाखा आज नाक्यानाक्यावर उघडलेल्या आहेत ...
किती कोर्सच्या ठिकाणी खर्या मेनेजमेंट गुरु असलेल्या गणपती बाप्पाचे फोटो किवा मूर्ती पुजली किवा नुसती ठेवली जाते का?
बघा खर्या व्यवस्थापन गुरु असलेल्या गणपती बाप्पाची वैशिष्ठे ........
मोठे डोके :- मोठे डोके हे बुद्धीचे सूचक आहे. व्यवस्थापनातील पहिले सूत्र हे आहे कि विचार करण्यासाठी तल्लख बुद्धी आवश्यक आहे. सदैव मोठ्ठ्या मनाने विचार करा. संकुचित मनोवृत्तीला कधीही यश मिळत नाही.
.
डोळे :- आपला दृष्टीकोन कसा असावा हे गणपतीच्या डोळ्यांवरून ध्यानात येते. व्यवस्थापनात प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर असणे गरजेचे असतेच .
.
सोंड :- दूरदृष्टी ध्यानात येते. लांब नाक म्हणजे दुरूनच येणार्या संकटांचा वास आधीच घेऊन त्यानुसार धोरणे निश्चित करणे व तशा योजना राबवणे.
.
मोठे कान :- मोठे कान हे दर्शवतात कि आपल्याशी संबंधित प्रत्येकाचे म्हणणे ऐका. एखादा सामान्य माणूसही तुम्हाला महत्वाचा सल्ला देऊ शकतो म्हणूनच सर्वांचे ऐकणे आवश्यक आहे.
.
मोठे पोट :- मोठे पोट म्हणजे आपल्या महत्वाच्या गोष्टी, योजना, या पचवण्याची ताकद असणारे एक मशीनच जणू. काही लोकांच्या पोटात काहीही राहत नाही. तुम्हाला यशस्वी टीम लीडर बनायचे असेल तर आपल्या काही गोष्टी गुप्त ठेवावाच लागतात.
.
उंदीर :- गणपतीचे वाहन उंदीर. तुम्ही कितीही बुद्धिमान असले तरी तुमच्याकडे तर्कशक्ती नसेल तर व्यवस्थापनात तुम्ही यशस्वी होऊच शकणार नाही. उंदीर हे तर्कशक्तीचे प्रतिक आहे. ज्ञानाला तर्काची जोड नसेल तर महाज्ञानी सुद्धा अयशस्वी होतो.
.
पत्नी रिद्धी सिद्धी :- गणपतीच्या दोन पत्नी आहेत रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी म्हणजेच कार्यकुशलतेत सहजता. सिद्धी म्हणजे कार्यकुशलता. तुमच्याजवळ बुद्धी असेल तर कार्यकुशलताही येईल आणि ती टिकूनही राहील.
.
पुत्र योग आणि क्षेम :- योग आणि क्षेम हे गणपतीचे दोन पुत्र. योग म्हणजे जोडणे. ही बाब आर्थिक लाभाशी जोडून पाहतात. थोडक्यात बुद्धी असेल तरच कार्यकुशलता आणि योग असेल तर आर्थिक लाभ होतो. क्षेत्र म्हणजे तुमचा आर्थिक लाभ सुरक्षित राहणे.

0 comments:

Post a Comment