ज्या मुलांना मुली पटत नाही , त्या कोल्हांना 'द्राक्ष कायमच आंबट' असतात , याचे पुरावे देणारी, त्या 'कोल्हांची' काही वाक्ये -
१. आपल्या घरी असले काही चालणार नाही.
२. घरी समजले तर बाप चेंदा करेल.
३. पोरी चालू असतात.
४. मला पोरींपेक्षा स्पोर्टमध्येच जास्त इंटरेस्ट आहे.
५. पोरी काय , कधीही दगा देतात , त्यापेक्षा ४ हात लांबच बरे.
६. मुलींमुळे अभ्यासावर लक्ष देता येत नाही, त्यामुळे नको तसले काही.
७. कधीना कधी लग्न होवून पोरगी मिळणारच आहे, त्यामुळे मी पोरींपेक्षा काहीतरी आयुष्यात वेगळे करण्यावर भर दिला आहे.
८. काय पोरींमागे उगीचच फिरायचे ?
९. पोरी माठ्या असतात.
१०. पोरगी पटवल्यावर, तिच्याचमागे पळावे लागते, त्यापेक्षा नको ती थेरं !
११. आपल्याला कुणाच्या इशाऱ्यावर नाचायला नाही आवडत.
१२. मी माझ्या मनाचा राजा आहे आणि आपल्याला असेच आवडते.
१३. मी आयुष्यात ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आहे.
१४. मला पुढे मोठे होवून देशसेवा करायची आहे.
१५. आपण या समाजाचे देणे लागतो , त्यामुळे मला समाजसेवेतच रस आहे. पोरी-बिरी गेल्या उडत.
वगेरे वगेरे ......
0 comments:
Post a Comment