निखळ विनोदी पुणेरी पाटी – पुणेरी पाट्या

Wednesday, July 18, 2012

1. आमच्याकडे सर्व भाषेतील झेरॉक्स काढून मिळतील.
2. रंग ओला आहे. विश्वास नसेल, तर हात लावून पहावे.
3. साने येथेच राहतात. उगीच भलतीकडे चौकशी करू नये.
4. आमच्या कडे हापूस आंबे, कोकम आणि परकर मिळतील.
5. कुत्र्यांपासून सावध रहा.नको तिथे चावल्यास साठे जबाबदार नाहीत.
6. वाचनालयात शांतता राखावी.अन्यथा कधीही आत न घेण्यासाठी बाहेर काढण्यातयेईल.
7. येथे एरंडेलाचा डोस देण्यात येईल.(पुढील क्रियामात्र घरी जाऊन करावी.)
8. मधुमेही व्यक्तीच्या दारावरील पाटी: "साखरेचे खाणार त्याला देव नेणार!"
9. एका शासकीय कार्यालयाच्या वाचनालयात म्हणे (वाचनालयाबाहेर पुस्तक नेण्यास बंदी असल्याने) प्रत्येक पुस्तकावर "हे पुस्तक मी अमुक अमुक कार्यालयातून चोरून आणले आहे" असे लिहिलेहोते.
10. एका खोपटवजा उपहारगृहावरील पाटी:
हॉटेल ओबेरॉय (आमची कोठेही शाखा नाही)

11. तीनदा दार वाजवूनही दार उघडले नाही, तर मालकाला आपणास भेटावयाचे नाही असे समजावे.
12. पुस्तक-वह्या-रद्दी खरेदी दुकानावरील फलक:
चित्रपटाला जायचे आहे? आई-बाबा पैसे देत नाहीत? मगवह्या पुस्तके आम्हाला द्या की.
13. एका जेवणालयातील पाटी:
जेवण झाल्यानंतर उगाच इथे गप्पा मारू नये.
14. एका जिन्यातील पाटी:
वर चढताना ५वी पायरी तुटलेली आहे.
15. एका घरासमोरील पाटी:
देशपांडे कुठे राहतात ते आम्हाला माहित नाही. उगाच घंटी वाजवून विचारू नका.
16. आणखी एका घरासमोरील पाटी:
उगाच घंटी वाजवू नका, आम्ही विजेचे बील भरतो.
कडीही वाजवू नका, कडी झिजेल.
17. आम्ही खाद्यपदार्थांचे पैसे आकारतो. जागेचे भाडे नाही.
18. उधार मागून आपला अपमान करून घेऊ नये, ही नम्र विनंती. (पुण्यात यालाच नम्र म्हणतात म्हणे...)
19. येथे वाचायचे चष्मे मिळतील, पण आपली अक्षरओळख आहे ना? मागाहून तक्रार चालणार नाही.
20. आम्ही आमच्या वस्तू विकत आणतो. कृपया उधार मागू नये.


21. केवळ पैसे दिले म्हणजे काहीही करता येईल असे समजू नये; त्यासाठी शहरात अजूनहीजागा आहेत. आमच्या सौजन्याला मर्यादा आहेत याचे भान ठेवावे.
22. हे कार्यालय आहे. आत पाहण्या सारखे काही नाही. आत येऊ नये.
23. गाडीमध्ये तंबाखू खाऊन बसू नये व बसून तंबाखू खाऊ नये
24. भिंती रंगवण्याची जबाबदारी कोणावरही दिली नसून ती जबाबदारी भिंतीवर थुंकून पार पाडू नये ही नम्र विनंती
25. अरे मी गाढव आहे. गेटासमोर लावतोय गाडी.
26. अनोळखी वस्तू दिसल्यास स्पर्ष करू नये(व्यक्तींसकट).
27. इतरांनी वाहने लावू नयेत लावल्यास हवा सोडून दिली जाईल.
28. फुंके (सिगारेट्स्), थुंके (तंबाखू) आणि शिंके (तपकीर) यांना रंगमंदिरात मज्जाव.

3 comments:

Pratik Dhengle said...

ha barobar ahe na lokana amhi purn vakya sangto ardh ardh sangun amhi lokana dukh det nasto

This comment has been removed by a blog administrator.

jagruti patkar said...

Kadhi kadhi aati hota paan atleast gairsamaj hot nahit.........So good..........Entetaining :)

Post a Comment