-अष्टविनायक दर्शन- तिसरा गणपती- श्री सिद्धिविनायक (श्री क्षेत्र सिद्धटेक,अहमदनगर)
सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकामधील दुसरा गणपती.
-इतिहास-
पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असूरांशी भगवान विष्णु अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करन विष्णूने असुरांचा वध केला.
छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. 15 फूट उंचीचे व 10 फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. 3 फूट उंच व 2.5 फूट लांबीची ही मूर्ती स्वयंभू आहे.
हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास 21 प्रदक्षिणा घातल्या. त्यांतर 21 दिवसांनी त्यांची सरदारकी परत मिळाल्याची अख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.
-कसे जाल-
पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस
सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरुन शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते.
0 comments:
Post a Comment