निबंध लिहा विषय - 'गाय'...

Sunday, September 9, 2012




प्रश्न : निबंध लिहा
विषय - 'गाय'...
एका मुलाने लिहिलेला निबंध :
"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात. भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गाय तोंडे सरांसारखे असते.
गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात. मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात. ते टेस्टी असते. गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात. गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूधपितो.
गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात. शीला ताई शेणाच्या गौ-या करते. गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात. वसु बारसेला वासराचे बारसे करतात. गाईची पूजा होते.
पूजा मला आवडते. ती माझ्या शेजारी बसते. गाईला माता म्हणतात.
भारत माता की जय!!!! 

0 comments:

Post a Comment