आणि त्यांनी केले हा आहे मध्यप्रदेशातील राज बब्बर ढाबा … १२ रुपयात इतके भरपेट जेवण कि जेवण केल्यावर १ तास रपेट मारावी लागेल … आता हे राज बब्बर कोण हे शोधणे मजेशीर ठरेल … हे प्रसिद्ध अभिनेते नसले तरी लहान पणी शाळेत राजाचा पंखा धरणारे सेवक आणि एका नाटकात वडाचे झाड झाल्याचे ते अभिमानाने सांगतात …
Label
- CID Jokes
- Cricket
- Film - Cinema
- Video
- अष्टविनायक (Ashtavinayak)
- ऐतिहासिक
- कथाकथन
- काहीतरी मजेशीर
- कुठेतरी छानसे वाचलेले
- कुसुमाग्रज
- क्रीडा - Sport
- दिनविशेष
- पर्यटन
- पुणेरी पाटी - पुणेरी पाट्या (Puneri Pati - Puneri Patya)
- बातम्या - News
- मराठी कविता
- मराठी ग्राफिटी - Marathi Graffiti
- मराठी नाटक
- मराठी मुलगी
- मराठी विनोद Jokes
- रिकामटेकडेपणा
- विनोदी चित्र - Funny Images
- श्री गणेश - Shree Ganesh
राज बब्बर ह्यांनी सुरु केला १२ रुपयात भरपेट जेवण देणारा धाबा - Raj Babbar Dhaba 12 Rs
Monday, July 29, 2013आणि त्यांनी केले हा आहे मध्यप्रदेशातील राज बब्बर ढाबा … १२ रुपयात इतके भरपेट जेवण कि जेवण केल्यावर १ तास रपेट मारावी लागेल … आता हे राज बब्बर कोण हे शोधणे मजेशीर ठरेल … हे प्रसिद्ध अभिनेते नसले तरी लहान पणी शाळेत राजाचा पंखा धरणारे सेवक आणि एका नाटकात वडाचे झाड झाल्याचे ते अभिमानाने सांगतात …
Posted by Mr. NosyPost at 2:03 PM 1 comments
जर हे चित्रपट मराठी मध्ये dubbed केले तर यांची नावे काय असतील? वाचा..
Sunday, July 28, 2013कुछ कुछ होता है- कसतरी होतेय!
हॉलो मॅन- पोकळ माणुस!
डाय अनादर डे- नंतर कधीतरी मर!
गॉन विथ द वाइंड- गेला उडत!!
सुपरमॅन- लई भारी माणुस!!
स्कॉरपियन किँग- तात्या विँचु!!
द मम्मी रिटर्न्स- आई परत आली!
मिशन इम्पॉसिबल- नाही जमत!
मिशन इम्पॉसिबल II- एकदा सांगितला ना नाही जमत!
मेन इन ब्लॅक- काळे माणसं!
मेन इन ब्लॅक II- एकदम काळे माणसं!
Posted by Mr. NosyPost at 2:11 PM 1 comments
Labels: काहीतरी मजेशीर
Amruta Khanvilkar अमृता खानविलकर Photo फोटो फिचर
Posted by Mr. NosyPost at 1:48 AM 2 comments
Labels: Film - Cinema
बिल गेट्स बद्दल - हे वाचा झोप लागणार नाही...!! .
Saturday, July 27, 2013१) बिल गेट्स हा प्रत्येक सेकंदाला यु.एस.$ २५० कमावतो, म्हणजेच दिवसाला यु.एस.$ २० मिलियन, आणी यु.एस.$ 7.8 बिलीयन दर वर्षी…!
२) बरं जर समजा याच्या हातुन जर १ हजार डॉलर हरवले तर हा माहाभाग तेशोधण्याचाही प्रयत्न करणार नाही,कारण येत्या चार सेकंदांनी हा ते कमाउन बसलेला असेल…!
३) याने जर १५ डॉलर जगातल्या प्रत्येक व्यक्तीस देउन दिले, तरीही याच्या खिशात यु.एस.$ ५ मिलियन इतकी रक्कम उरलेली असेल.
४) अमेरिकेत मायकाल जॉर्डन हा सर्वात जास्त पैसे कमावणारा खेळाडु आहे. जर याने आयुष्यभर काही न खाता-पीता आपले वार्षीक उत्पन्न वाचवले जे की ३० मिलीयन डॉलर इतके आहे, तरिही त्याला बिल गेट्स इतके श्रीमंत होण्यासाठी, २७७ वर्षे वाट पाहवी लागेल.
५) समजा बिल गेट्स हा जर एखादा देशअसता, तर जगातला ३७ वा श्रीमंत देश होण्याचा मान याने पटकावला असता.
६) विचार करा जर बिल गेट्स ने आपलापैसा १ डॉलर च्या नोटांमधे रुपांतरीत केला, तर तो चंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनउ शकतो. तेही एक रस्ता नाही, असे २८ रस्ते तो बनउ शकतो. पण हा रस्ताबनवायला १४०० वर्ष लागतील, आणी तेही जवळपास ८००, बोइंग ७४७ विमानांचा वापर करावा लागेल पैसापोहचवण्यासा ठी.
७) बिल गेट्स आता जवळपास ५४ वर्षांचा झाला आहे, ग्रुहीत धरा तो आणखी ३५ आणखी जग़ेल, जर पुर्ण संपत्ती खर्च करायची असल्यास, वेळात त्याला दर दीवशी जवळपास ७ मिलियन डॉलर खर्च करवे लागतील.
आता शेवट:
८) मायक्रोसॉफ्ट ही प्रणाली वापरणार्या जगातल्या प्रत्येक माणसाने, जेव्हाही त्यांचा संगणककाम करायचा थांबल्यास(म्हणज ेच हॅंग झाल्यास) जर फक्त १ डॉलर इतका दावा मायक्रोसॉफ्ट या कंपनिवर केला, तर फक्त ३ दिवसांच्या कालावधीत बिल गेट्स चे दिवाळे नीघेल.
Posted by Mr. NosyPost at 2:32 PM 1 comments
Labels: कुठेतरी छानसे वाचलेले
एका फेसबुक प्रोफाईल असलेली अशी पण स्वता:ची ओळख आवरा ह्याला
Thursday, July 25, 2013Posted by Mr. NosyPost at 4:16 PM 0 comments
Labels: काहीतरी मजेशीर
ATM मधून मराठी मुलगी आणि मुलगा कसे पैसे काढता जरा वाचाच ! Marathi Girl Vs Marathi Boy
Wednesday, July 24, 2013>>मूलगा X मूलगी<<
..
मुलगा ATM मधुनपैसे कसे काढतो हे बघा
१) गाडी पार्ककरतो
२) ATM मशिनजवळ जातो
३) मशिनमध्ये कार्ड टाकतो
४) पिन टाकतो
५) पैसे काढतो
६) ATM कार्ड काढतो
७) गाडी घेवुनवापस जातो
..
आता मुलगी ATM मधुन पैसे कसे काढते हे बघा
१)गाडी पार्क करते
२) आधी make up चेक करते
३) गाडी बंद करते
४) make up चेक करते
५) ATM मध्ये जाते
६) पर्स मध्येATM कार्ड शोधते
७) कार्ड मशिनमध्ये टाकते
८) cancel च बटन दाबते
९) पर्स मध्येपिन कोड असलेला कागद काढते
१०) कार्ड पुन्हा टाकते
११) पिन टाकते
१२) पैसे काढते
१३) कार कडे जाते
१४) मेक अप चेक करते
१५) गाडी चालुकरते
१६) गाडी बंद करते
१७) वापस ATM कडे धावत जाते
१८) ATM कार्ड घेते
१९) वापस कार कडे जाते
२०) मेक अप चेक करते
२१) गाडी चालुकरते
२२) मेक अप चेक करते
२३) १/२ कीमी पर्यंत गाडी चालवते
२४) हँडब्रेंक सोडते
२५ ) मग गाडी चालवते
Posted by Mr. NosyPost at 7:31 PM 1 comments
Labels: काहीतरी मजेशीर, मराठी मुलगी
मराठी मुली लग्न का करतात ?
1) एकातरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी....?
2) गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणून......?
3) जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणूक म्हणून.........?
4) पुरूष किती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी.....?
5) आई-बापावर दया करण्यासाठी.....?
6) मैत्रिणीने केले मग मी का नको...........?
7) नवीन-नवीन डिज़ाइनची मंगळसूत्रे घालवयास मिळावी म्हणून.........?
8 ) नवराच्या जिवावर मुलांची हौस भागवता यावी म्हणून.........?
9) मुक्त होण्यासाठी लग्नच केले नाही तर मुक्ती कोनापासून मिळविणार.......?
10) आपल्या पाक कृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्या वर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा बकरा मिळण्यासाठी......?
11) लग्नानंतर मुली उजळतात म्हणे , फेअरनेस क्रीम फासून फासून थकल्यावर शेवटचा एक जालिंम उपाय ???
Posted by Mr. NosyPost at 12:12 AM 0 comments
Labels: काहीतरी मजेशीर, मराठी मुलगी
Marathi Mulgi - मराठी मुलगी कशी ओळखाल...??
Monday, July 22, 2013१) ओढणी (पदर) चुकून
थोडीशी जरी काही पडली तरी विजेच्या वेगाने लगेच
सावरणारी !!! ...
२) पुण्याच्या गर्दीने भरलेया बसमध्ये सुद्धा,
किवा मुंबईच्या गर्दीतसुद्धा आपले सत्व सांभाळणारी!!!
३) मुलगा कितीही आवडला तरी , भावना वक्त न
करणारी !!!
४) कॉर्पोरेट ऑफिस मध्ये कामाला असलीतरी छोटस
का होईना मंगल सूत्र घालणारी !!!
५) कितीही मोठ्या हुद्यावर कामाला असली तरी आपले
आई वडील , सासू सासरे,नवरा , भाऊ यांना मान देणारी !!!
६) समाज्यात वावरताना सगळ्यांना भाऊ, दादा म्हणून हाक
मारणारी !!!
Posted by Mr. NosyPost at 5:33 PM 0 comments
Labels: कुठेतरी छानसे वाचलेले, मराठी मुलगी
Dance Bar आता सुरु होणार त्या प्रित्यर्थ रमलेल्या बाबाची कहाणी... (संदिप खरे यांची माफी मागुन)
Sunday, July 21, 2013दणादणा वाजणारी रीमिक्सची गाणी
आणि मध्ये नाचणारी गोड परीराणी
ग्लासामध्ये दारू त्यात बर्फ आणि पाणी
एका डान्स बारची ही रोजची कहाणी
ऐकवतो ऐक माझ्या सानुल्या फुला
रमलेल्या बाबाची या कहाणी तुला....
आटपाट नगरात गर्दी होती भारी
राजा करी रोज एका डान्स बारची वारी
कधी अपराधी राजा फोनवर बोले
काल रात्री घरी यायचे राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला घरी
कुशीमध्ये होती माझ्या बारमधली परी
स्वप्नातल्या गावामध्ये मारून आलो फेरी
सांगू नको आईला ती पडेल येऊन घेरी
काल झाला होता माझा झुलणारा झुला
रमलेल्या बाबाची या कहाणी तुला !
ऑफिसात उशिरा मी असतो बसून
पार्ट्या येती तेव्हा माझा हफ्ता घेऊन
एक एक येतो जातो हळूच निघून
हळू हळू ड्रॉवर सारा जातो की भरून
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे
हलकेच हसू माझे ओठांतून दाटे
वाटे मला उठावे अन दुकानात जावे
तिच्यासाठी गळ्यातले महागडे घ्यावे
उगाचच रुसावे नी भांडावे तिच्याशी
हलक्या हाताने चेन बांधावी गळ्याशी
करावी सोन्याने वाटे मला तिची तुला
रमलेल्या बाबाची या कहाणी तुला !
नकळता कशी मला लागली चटक
गळ्यात पडली एक भवानी भटक
काय करू आता मला कळेनासे झाले
लफडे भलते माझ्या गळ्याशी की आले
अडकून पडलो मी मोठ्या भोवर्यात
हात पाय मारूनही निघालो खोलात
काही वर्षांनंतर बाळा, तू ही मोठा होशील
एक वचन मागतो मला आत्तापासून देशील?
खूप शीक, मोठा हो, नोकरी धंदा कर
याद राख डान्स बारात गेलास जरी तर
एवढा एक सल्ला माझा ऐक माझ्या मुला
रमलेल्या बाबाची या कहाणी तुला !
Posted by Mr. NosyPost at 8:29 AM 0 comments
Labels: मराठी कविता
कोंबडी कोणी पळवली…........ नेत्यांच्या स्टाईलने…....
Friday, July 19, 2013महात्मा गांधी – कोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्याला मोकळे सोडून दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.
लोकमान्य टिळक – कोंबडी पळविणाऱ्या चोराचे डोके ठिकाणावर आहे काय?
बाळासाहेब ठाकरे – जर कोंबडी वापस मिळाली नाही तर, त्या कोंबड्याला [चोराला] पहाटे आरवायला लावू. हे कोंबडी चोराने हे लक्षात ठेवावं.
राष्ट्रपती ताई – कोंबडी चोरीला जाणे ही अतिशय वेदानादेह घटना आहे. मी ह्या घटनेचा ‘तीव्र’ शब्दात निषेध नोंदवते.
मनमोहन सिंग – कोंबडी चोरीच्या घटनेची मी कठोर शब्दात निंदा करतो. सर्वांना मी शांततेचे आवाहन करतो.
पी. चितंबरम - यात परकीय शक्तींचा हात आहे का? याची तपासणी चालू आहे.
दिग्विजयसिंह – कोंबडी पळवण्याच्या मागे संघाचा हात आहे.
अण्णा हजारे – जर कोंबडी आणि कोंबडी चोर हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सापडले नाही तर, मी पुन्हा ‘आमरण उपोषणाला’ बसेन.
रामदेवबाबा – कोंबडी पळवणे म्हणजे देशद्रोह आहे. अरे! जर कोंबडी सापडली नाही. तर अंडी कोठून मिळणार? आणि देश स्वस्थ कसा राहणार?
अटलबिहारी वाजपेयी – कोंबडी पळवणे……… ही........ चांगली गोष्ट नाही...... मी सरकारला……. अनुरोध...... करेन की……. त्यांनी लवकरात लवकर……. त्या कोंबडी चोराचा छडा....... लावावा.
अजित पवार – मी कोंबडी पळवली नाही. माझ्या वाटेला जाल तर याद राखा.
लालू प्रसाद यादव – अरे मुर्गी थो चोरी हुई है न! मिल जायेगी| भेस थोडी है जो नीतीस के घर जायेगी||
राज ठाकरे – जर कोंबडी मराठी असेल तर, कोंबडी चोराला तंगडी धरून लंगडी घालायला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
उद्धव ठाकरे – गेल्या चाळीस वर्षापासून आम्हीच कोंबडी चोरीचा मुद्दा मांडत आलो आहोत. इतरांनी नाक खुपसू नये.
आर आर पाटील – मोठ्या शहरात अशा छोट् छोट्या घटना घडत असतात. परंतु, कुणीही कायदा हातात घेऊ नये.
राहुल गांधी – कोंबडी चोर कोण है? महाराष्ट्रीयन है|
बराक ओबामा – ओह नो! आय कांन्ट..
नारायण राणे – हिम्मत असेल तर कोंबडी चोराने मालवणात येऊन दाखवावे.
मायावती – कोंबडी पळवणे हे विरोधी पक्षांचे षडयंत्र आहे.
नितीन गडकरी – कोंबडी चोर हा काय सरकारचा जावई आहे?
सौजन्य : Parijat Juwatkar
Posted by Mr. NosyPost at 5:37 PM 1 comments
Labels: काहीतरी मजेशीर
Malwani Days मालवणी डे - Marathi Serial Funny Episode
Posted by Mr. NosyPost at 4:05 AM 0 comments
Labels: Video
ketaki mategaonkar केतकी माटेगावकर Wall Paper PART 2
Thursday, July 18, 2013Posted by Mr. NosyPost at 10:06 PM 0 comments
Labels: Film - Cinema
पुरूष असण्याचे फायदेच फायदे .... स्त्रियांनी नक्की वाचा
Wednesday, July 17, 2013*********************
१. तुमचं आडनाव बदलत नाही.
२. तुम्हाला गरोदर राहायची भीती नाही.
३. वॉटर पार्कमध्ये व्हाइट टी शर्ट घालून बागडू शकता.
४. वॉटर पार्कमध्ये टी शर्ट न घालताही बागडू शकता.
५. बाइक/कारचे मेकॅनिक तुमच्याशी खरं बोलतात.
६. स्क्रू कोणत्या बाजूला पिळायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत नाही.
७. बाईएवढेच काम करून तुम्हाला जास्त पगार मिळतो.
८. गालावरच्या सुरकुत्या तुम्हाला आदर मिळवून देतात.
९. लोक तुमच्याशी बोलताना तुमच्या चेह-याकडेच पाहतात.
१०. तुमचा एक मूड बराच काळ टिकतो.
११..तुमचा एक फोन अर्ध्या मिनिटाच्या वर चालत नाही.
१२.. सुटीसाठी बाहेर जाताना फक्त एका सुटकेसमध्ये सामान मावतं.
१३ .तुम्ही फडताळातून डबे स्वत:चे स्वत: काढू शकता.
१४ .कोणत्याही डब्याचं झाकण स्वत: उघडू शकता.
१५..पादत्राणांचे तीन जोड पुरतात.
१६ .बिनधास्त शॉर्ट वापरू शकता.
१७ .तुम्ही पाच जणांच्या कुटुंबासाठीची कपडेखरेदी केवळ पाच मिनिटांत उरकू शकता.
१८ . तुमचं पोट सुटलं तर कोणी काही बोलत नाही.
*****************************
Posted by Mr. NosyPost at 9:03 AM 1 comments
Labels: काहीतरी मजेशीर
Marathi Graffiti - मराठी ग्राफिटी : ह्या महिन्यात जिने धमाल माजविली अशी
Monday, July 15, 2013Posted by Mr. NosyPost at 7:22 AM 2 comments