दादा कोंडके Dada Kondke शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न !!!!

Sunday, July 14, 2013

दादा कोंडके Dada Kondke Film


1. मुंबईची केळेवाली आणि कल्याणची आंबेवाली यातील तुलनात्मक फरक स्पष्ट करा !!!!
(१० मार्क)

2. चड्डीच्या नाडीचे महत्व या विषयावर सोळा ओळींची चारोळी करा !!
(८ मार्क)

3. "मी नाही त्यातली , कडी लाव आतली " या म्हणीचा वाक्यात उपयोग करा !!
(१६ मार्क)

4. राज्यकारभार "सुरळीत" चालू आहे म्हणजे नक्की कुठे चालू आहे.
सुरळीचा शोध कुणी लावला व वापर सर्वप्रथम कुणी केला ?
(२० मार्क)

5. "अकार्यक्षम" "सेन्सॉर बोर्ड" या विषयावर सविस्तर टीप लिहा !!
(१८ मार्क)

6. रेल्वेतली पेरुवाली आणि कोळीणबाई यांच्यात कोणत्या मुद्द्यांवरून भांडणे होऊ शकतात ?
कोणतीही ८ कारणे लिहा !!!
(१६ मार्क)

7. म्हमद्या, आये, गंगी, हौसा बाय आणि सावकार यांचे चित्रपटातील महत्व विशद करा !!
(१० मार्क)

8. स्वतःचं ठेवायचं ______ अन लोकांचं बघायचं _______ .... गाळलेल्या जागा भरा !!
(२ मार्क)

0 comments:

Post a Comment